न्युमोनायटीस - Pneumonitis in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 09, 2019

March 06, 2020

न्युमोनायटीस
न्युमोनायटीस

न्युमोनायटीस म्हणजे काय?

फुफूसाच्या टिश्यू मधील रोगप्रतिकारक संस्थेचे अनियमन व विना संसर्गाची कारणे म्हणजे न्यूमोनायटीस. काही पदार्थ जे दीर्घकालीन किंवा लघुकालीन परिणाम करू शकतात, यांच्या संपर्कात आल्यामुळे हे घडू शकते व फुफूसांच्या कार्यावर परिणाम करतात. वेळीच योग्य उपचार न केल्यास फुफूसांवर दीर्घकालीन परिणाम करू शकतात.

प्रमुख कारणे व लक्षणे काय आहेत?

न्युमोनायटीसची प्रमुख कारणे व लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

प्रमुख कारणे काय आहेत?

न्युमोनायटीस हे काही विशिष्ट पदार्थ वेळोवेळी आजूबाजूला असल्यास घडू शकते, जे पुढे जाऊन फुफूसांमध्ये जळजळ उत्पन्न करते. न्युमोनायटीस ला कारणीभूत ठरणारे घटक आजूबाजूच्या वातावरणात असल्यास शरीर अती प्रमाणात फुफूसांच्या जळजळीद्वारे उत्तर देतं, हे घटक पुढीलप्रमाणे आहे:

  • प्रथिने.
  • रसायन.
  • गवत.
  • प्राण्यांचे अन्न.
  • दूषित अन्न.
  • एअर कंडीशनर.
  • प्राण्यांचे फर.
  • पक्ष्यांची पिसे किवा विष्ठा.
  • लाकडाची धूळ.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

शारीरिक तपासणी केल्यावर डॉक्टर खालील निदानाच्या चाचण्या घेतात:

  • पांढऱ्या रक्त पेशींची उच्च पातळी व इतर पेशी पाहण्यासाठी रक्त तपासणी.
  • फुफूसाचा स्वच्छ फोटो मिळवण्यासाठी सी टी स्कॅन व छातीचे एक्स-रे काढणे.
  • फुफूसाचे कार्य तपासण्यासाठी कार्य चाचण्या.
  • पांढऱ्या रक्त पेशींच्या उपलब्धतेसाठी फुफूसातून घेतलेले द्रव्य तपासण्यासाठी ब्रोन्कोअल्व्हिओलार.

न्युमोनायटीस च्या उपचारांमध्ये खालील गोष्टी केल्या जातात:

  • कॉर्टिकोस्टेरॉईड आणि इतर इम्यूनोसप्रेसिव्ह ड्रग्स.
  • श्वासाची कमतरता मोजण्यासाठी ऑपिओड्स.
  • फुफूसातील स्नायूंच्या आरामासाठी ब्रोन्कोकोडायलेटर्स.
  • ऑक्सिजन चा पुरवठा वाढवण्यासाठी ऑक्सिजन थेरपी.

इतर नियमनाच्या उपचारांमध्ये आजूबाजूच्या परिसरातून अॅलर्जन घालवणे, अॅलर्जेन पासून लांब राहणे, कामाची जागा बदलणे हे उपाय स्थिती थांबवण्यासाठी केले जातात.

 



संदर्भ

  1. American Lung Association [Internet]: Chicago, Illinois. Hypersensitivity Pneumonitis Symptoms, Causes and Risk Factors.
  2. National Heart, Lung, and Blood Institute [Internet]: U.S. Department of Health and Human Services; Hypersensitivity Pneumonitis.
  3. OMICS International[Internet]; Lung Inflammation and Treatment.
  4. Gian Galeazzo Riario Sforza,Androula Marinou. Hypersensitivity pneumonitis: a complex lung disease. Clin Mol Allergy. 2017; 15: 6. PMID: 28286422
  5. National Cancer Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Pneumonitis.

न्युमोनायटीस साठी औषधे

Medicines listed below are available for न्युमोनायटीस. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Medicine Name

Price

₹449.0

Showing 1 to 0 of 1 entries