myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

प्रथिनांची कमतरता काय आहे?

प्रथिने हे मानवी शरीरातील महत्त्वाचा घटक आहेत. शरीरात प्रथिनांची कमतरता भासणे सामान्य स्थिती आहे, जी विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये जास्त दिसून येते. अंदाजे लाखो प्रौढ आणि मुलांमध्ये प्रथिनांची कमतरता दिसून येते कारण रोजच्या आहारात आवश्यक असलेले प्रथिनांचे पोषण त्यांना मिळत नाही. क्वाशीओरकर ही गंभीर प्रकारची प्रथिनांची कमतरता आहे जी सामान्यपणे मुलांमध्ये दिसून येते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षण काय आहेत?

मानवी शरीरात प्रथिने महत्त्वाची व पोषक घटक आहेत जे शरीरात हार्मोन्स आणि एंझाईम्स च्या उत्पादनासाठी आणि टिश्यू बनवण्यासाठी उपयोगी असतात. प्रथिनांच्या कमतरतेमुळे बाळांची आणि मुलांची वाढ खुंटू शकते. या परिस्थितीशी संबंधित काही सामान्य लक्षणे आणि चिन्हे खालील प्रमाणे आहेत:

 • तवचेखाली द्रवपदार्थ साठणे जे सुजल्यासारखे किंवा फुगलेले दाखवते. ही क्वाशीओरकर चे विशेष चिन्हं आहे.
 • शरीरात आवश्यक प्रथिन घेण्यास अयशस्वी झाल्याने लायपोप्रोटीनच्या उत्पादनावर परिणाम, ज्याचे कार्य चरबी वाहण्याचे आहे. आशा स्थितीमध्ये लठ्ठपणा आणि यकृतामध्ये चरबी साठणे असा होतो ज्यामुळे तीव्र स्थितीमध्ये यकृत खराब होऊ शकते.
 • प्रथिने हे शरीरातील त्वचा, केस, नख यांच्या संरचनेचा मुख्य घटक आहे. प्रथिनांच्या कमतरतेमुळे केसगळती आणि कोरडे होणे, त्वचा कोरडी होणे दिसून येते. नखांना पांढरे डाग पडणे या वरून प्रथिनांची कमतरता दिसून येते.
 • थकवा.
 • स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना.
 • स्नायू खराब होणे.

याची मुख्य कारण काय आहेत?

प्रथिनांची कमतरता असंतुलित आहारातून किंवा शरीरातील विशिष्ट आजारामुळे होऊ शकते. यामुळे प्रथिनांचे काम बिघडते आणि त्यांचे संश्लेषण आणि वापर नीट होत नाही. प्रथिनांची कमतरता किंवा हायपोप्रोटेनेमियाचे मुख्य कारण खालीलप्रमाणे आहे:

 • कुपोषण
  कुपोषण ही विकसित व विकसनशील देशातील प्रथिनांची कमतरता चे मुख्य कारण आहे, जिथे आहारात आवश्यक प्रमाणात प्रथिनांचा अभाव असून हवे तेवढे प्रथिने शरीराला मिळत नाहीत.
 • मूत्रपिंडाचे अकार्यक्षम होणे
  मूत्रपिंडाच्या आकार्यक्षमतेमुळे प्रथिने शरीरातून बाहेर काढले जातात कारण मूत्रपिंडातील नेफ्रॉन खराब होतात व प्रथिने मूत्रातुन बाहेर पडण्यापासून रोखू शकणयास अपयशी ठरतात.
 • अंतर्गत वैद्यकीय परिस्थिती
  इंफ्लामेट्री बाउल डिझीज जसे अल्सरेटिव्ह कोलायटीस किंवा क्रोन्स रोग असतील तर ते आतड्यांना नुकसान पोहचवतात आणि प्रथिने शोषून घेण्यापासून रोखतात.

याचे निदान आणि उपाचार काय आहेत?

एखाद्या माणसाला प्रथिनांच्या कमतरतेची चिन्हे दिसत असतील तर डॉक्टर शरिरातील प्रथिनांच्या पातळीचे निदान करण्यासाठी यकृत व मूत्रपिंडाच्या कामाचे परीक्षण करण्यासाठी रक्त तपासणी करायला सांगू शकतील.

शरीरात आवश्यक असलेले प्रथिने पुन्हा मिळवण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. त्या माणसाच्या वजन व स्थिती ची तिव्रता बघून रोजच्या आहाराची व खाण्याची यादी तयार केली जाते. ययामध्ये रोजचे खाण्यात येणाऱ्या वस्तू आणि त्याचे प्रमाण असते. मांसाहारी लोकांना मांस हे प्रथिनांचे प्रमुख सत्रोत आहे.  शाकाहारी लोकांसाठी शेंगदाणे, डाळी, सोयाबीन, दालचिनी, व बीन्स चा आहारात समावेश करण्याची शिफारस करण्यात येते. काही गंभीर प्रकरणात पूरक औषधे आणि स्प्लिमेंट्स दिली जातात.

काही  प्रकरणात आतील रोग प्रथिनांची कमतरतेचे प्रमुख कारण असते, प्रथिने पुरविणे व कामकाज सुधारणा ही एक पध्दत औ शकते.

 1. प्रथिनांची कमतरता साठी औषधे
 2. प्रथिनांची कमतरता साठी डॉक्टर
Dr. B.P Yadav

Dr. B.P Yadav

एंडोक्राइन ग्रंथियों और होर्मोनेस सम्बन्धी विज्ञान

Dr. Vineet Saboo

Dr. Vineet Saboo

एंडोक्राइन ग्रंथियों और होर्मोनेस सम्बन्धी विज्ञान

Dr. JITENDRA GUPTA

Dr. JITENDRA GUPTA

एंडोक्राइन ग्रंथियों और होर्मोनेस सम्बन्धी विज्ञान

प्रथिनांची कमतरता साठी औषधे

प्रथिनांची कमतरता के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Protinvit PlProtinvit Pl Powder187.0
AxbexAxbex Drop33.0
PrylaxPrylax Capsule129.0
Polyvitamin NFI TabletPolyvitamin (Prophylactic) Nfi Tablet6.01
3 Efa3 Efa Capsule85.0
L-Lysine + MultivitaminL Lysine + Multivitamins Syrup29.11
StimStim Tablet24.8

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...