Psoriasis - Psoriasis in Marathi

Psoriasis
Psoriasis

सारांश

सोरियासीस हा त्वचेचा एक गंभीर आजार आहे ज्याची सुरुवात त्वचेतील पेशींची संख्या असामान्य प्रमणात वाढते. या त्वचापेशी संख्येत झपाट्याने वाढतात आणि प्रभावीत भागावर सूज येण्याला सुरुवात होते. सोरियासीसमूळे बहुतेकवेळा त्वचेवर लालसर चट्टे उमटतात. लाल चट्टे वेदनादायी असतात आणि अती खाजेच्या चंदेरी-पांढऱ्या खवल्यांनी आच्छादीत असतात. हा आजार वाढायच्या व बरे होण्याच्या, अनेक चरणांमधून शारीरिक लक्षणं जातात, परंतू दुर्भाग्याने, या आजाराचे संपुर्ण निवारण होत नाही. तरीही, पुरेशा उपचारांनी लक्षणांवर नियंत्रण मिळवता येते. केंद्रित उपचार (स्थानीक मलमपट्टी, किरणोपचार, आणि पोटातून घेण्याची औषधं), सोबत जीवनशैलीतील बदल (जसे तणावांतून मुक्तता, मॉइस्चराइजरचा वापर, धुम्रपान व मद्यपान टाळणे) यामूळे बहुतेकदा लक्षणे दिसत नसलेला काळ वाढवता येतो.

Psoriasis symptoms

सोरियासीसची लक्षणं व्यक्तिशः आणि सोयारिसीसच्या प्रकारानुसार भिन्न असतात. हे चट्टे लहान लहान  डागांपासून ते मोठाल्या जखमांपर्यंत वेगवेगळे असतात. टाळू, ढोपर, गुढघे, हात व पाय हे अवयव अधिक प्रमाणात प्रभावित होतात. सोरियासीसची खालील लक्षणं आहेत:

 • त्वचेवर लालसर चट्टे दिसणे, जे चंदेरी जाड खवल्यांनी झाकलेले असतात.
 • या डागांवर खाज सुटते, जळजळ करणाऱ्या संवेदना आणि वेदना होतात.
 • कधीकधी त्वचा अधीकच वाळल्याने किंवा अती खाजवल्याने त्वचतून रक्तदेखील येते.
 • टाळू, ढोपर, गुडघे, किंवा शरीराचा वरचाभाग प्रभावीत होतो.
 • नखांच्या सोरियासीसने नखांना जाडपणा येतो, नखांचे रंग जातात व नखांवर अनेक छिद्रे पडतात. कधीकधी नखांच्या गादीपासून नखं वेगळी होतात.
 • पस्ट्युलर सोरियासीसने त्वचा खवलेयुक्त लालसर होते, त्वचेत भेगा जातात, सोबतच हातांवर व पायांवर पूयूक्त फुगवटे होतात.

बहुतेकदा, ठारावीक कालखंडात किंवा जाणाऱ्या-येणाऱ्या चक्रांच्या रुपात ही लक्षणं दिसतात. लक्षणं काही दिवस किंवा काही आठवडे गंभीर असतात आणि नंतर बरीं होतात किंवा कधीकधी ती निघुनही जातात आणि दिसत नाहीत. आणि नंतर पुन्हा, कोण्या एका आरंभीक घटकाने लक्षणे परत दिसायला लागतात.

 • सोरियाटीक आर्थराइटीसच्या लक्षणांमधे समावेश आहे:
 • शरीराच्या एका किंवा दोन्ही भागांतील सांधे प्रभावित होतात.
 • प्रभावीत सांधे वेदनादायक आणि सुजलेले असतात, आणि स्पर्श केल्यावर उब जाणवते.
 • हाताच्या आणि पायाच्या बोटांचे सांधे सुजेमूळे कबाब-सद्रुश दिसतात ज्याने अपंगत्व येऊ शकते.
 • कधीकधी,मणक्याचे सांधे प्रभावीत होतात आणि खालच्या भागातील पाठदुखीसारखी लक्षणे दिसतात ( लंबर स्पॉंडीलायटीस सारखी)
 • प्रभावीत अकिलीज स्नायुबंध आणि प्लांटर फासीया मूळे टाचेत किंवा तळव्याच्या मागच्या भागात तीव्र वेदना होतात. (अधिक जाणून घेण्यासाठी – वेदना कारणे आणी लक्षणे)

Psoriasis treatment

सोरायसीसपासून कयमची सूटका नाही. व्यक्तीचे जीवनमान उंचावण्यासाठी व लक्षणांपासून सुटका मिळविण्यासाठी उपचार केले जातात. सोरायसीसचे उपचार 3 भागात विभागले आहेत – स्थानीक उपचार, पद्धतशीरपणे केलेले औषधोपचार, आणि किरणोपचार (प्रकाश उपचार)

 • स्थानीक उपचार
  सौम्य सोरियासीसमधे, स्थानीक औषधोपचार करणे पुरेसे आहे. मध्यम किंवा गंभीर सोरियासीसमधे, स्थानिक उपचारांसह पोटातून दिले जाणारे औषधोपचार किंवा किरणोपचार संयूक्तपणे वापरले जातात. स्थानीक उपचारांमधे समाविष्ट उपचार आहेत: 
  • कॉर्टिकोस्टिरॉईड्स
  • व्हिटॅमिन डी अॅनॅलॉग्स
  • टॉपिकल रीटिनोइड्स
  • सेलिसिलिक एसिड
  • कोल टार
  • कॅल्सीनुरिन इनहिबिटर
  • अँथ्रालीन
  • मॉइस्चराइजर
 • पद्धतशीरपणे केलेले उपचार
  स्थानीक उपचाराना प्रतिसाद मिळत नसल्यास किंवा सोरियासीस गंभीर असल्यास पोटातून किंवा लसिकरणाच्या मध्यमातून औषधं घेण्याचा सल्ला दिला जतो. बहुतेकवेळा या औषधोपचारांनी गंभीर दुष्परीणाम होतात, म्हणून ते अल्पावधीसाठी दिले जातात आणि उपचरांच्या इतर प्रकरांसोबत वीकल्प म्हणून वापरतात. सोरियासीसच्या उपचारांसाठी खलील औषधं वापरतात:
  • मेथोट्रॅक्सेट
  • सायक्लोस्पोरिन
  • रेटिनोइड
  • इम्यूनोमोडायलेटर्स
  • हायड्रॉक्स्यूरस
  • प्रकाश उपचार
   ​किरणोपचारांच्या योग्य पद्धतीमधे खवलेयूक्त जखमांना अल्ट्रा-व्हॉइलेट किरणांच्या संपर्कात आणतात (नैसर्गीक किंवा क्रुत्रीम). बहुतेकदा मध्यम किंवा तीव्र सोरियासीसवर, किरणोपचार आणि स्थानीक उपचारांसोबतच पद्धतशीरपणे संयूक्त उपचार केले जातात. प्रकाश उपचारांच्या भिन्न रुपरेषांमधे समाविष्ट आहेत:
   • सुर्यप्रकाशांचा संपर्क
   • UVB किरणोपचार
   • गोएकर्मन उपचार
   • लेजर उपचार
   • सोरालेन अधीक अल्ट्राव्हॉइलेट A उपचार

जीवनशैली व्यवस्थापन

सोरियासीस व्यक्तीची जीवनशैली तसेच तीचे/त्याचे जीवनमान प्रभावीत करते. सोरीयासीसबद्दलची जागरुकता व्यक्तीला सोरियासीससोबत लढायला मदत करते. आजार अंगवळणी पाडायला व आजाराने उपस्थीत केलेल्या अव्हानांवर उपाय शोधायला त्याची मदत होते. या पद्धती पुढीलप्रमाणे आहेत:

 • खाजेचे नियोजन
  खाज विषारी चक्राप्रमाणे असते म्हणजे, तुम्ही अधिक खाजवले तर खाज अधिक वाढते. म्हणून, खाजवणे टाळणे हा पर्याय आहे विशेषतः खवलेयूक्त सोरायसीससाठी. मॉइस्चराइजरचा वापर खाज कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
 • वजनाचे नियोजन
  वजन कमी करणे किंवा लक्षीत BMI संपादीत करणे, सोरीयासीसच्या लक्षणांची तीव्रता कमी करण्यासाठी उत्तम उपाय आहेत. त्याव्यतिरीक्त, फळे, भाजीपाला, पुर्ण धान्य, चरबीरहीत मांस आणि मासे यांनी यूक्त आहार घेतल्याने सोरीयासीसवर सकरात्मक परीणाम होतात. दुसर्या बाजुला, उच्च चरबिचे प्रमाण असलेले लाल मांस, डेअरीचे खाद्यपदार्थ, प्रक्रिया केलेले खाद्य, आणि मद्य सोरीयासीसच्या वाढीला कारणीभूत ठरतात.
 • तणावांचे व्यवस्थापन
  तणाव सोरीयासीस आमंत्रण देणारा महत्वाचा घटक आहे. योगासने करून, श्वसनाचे योग्य तंत्र आणि ध्यान करून तणावांचे नियोजन केल्याने सोरीयासीसचे वाढणे थांबवीता येते.

What is psoriasis

मानवांवर परिणाम करणारे शेकडो त्वचा रोग आहेत. यापैकी बहुतेक परिस्थितीत लक्षणे समान असतात. या अवस्था लक्षणांनूसार भिन्न असू शकतात जसे वेदनादायक किंवा वेदनारहीत, खाज असलेले किंवा खाजरहीत. कारणे विविध आहेत आणि त्यात एलर्जी, संक्रमण, प्रतिरक्षा प्रणालीतील आणि जीन्समधील दोष यांचा समावेश असू शकतो. लक्षणे त्यांच्या तीव्रतेत बदलतात. काही लक्षणे सौम्य असतात आणि स्वतःच अदृश्य होतात तर काही गंभीर असतात आणि इस्पीतळात भरती होण्याची आवश्यकता असते. सोरायसिस हा सामान्यपणे आढळणारा त्वचेच्या अनेक आजारांपैकी एक आहे जो जगभरातील लोकसंख्येच्या 5% लोकांना प्रभावित करतो.

सोरीयासीस काय आहे?

सोरायसिस हा त्वचेचा असा आजार आहे ज्यात त्वचेच्या पेशी गुणाकाराने वाढतात. यामुळे त्वचेवर त्वचेच्या पेशी तयार होतात. पेशींचे हे गठ्ठे चट्ट्यांमधे एकत्र होतात जे खाजवणारे असतात, लालसर होतात आणि कधी कधी वेदनादायक देखील असतात. ही एक गंभीर स्थिती आहे जी नियमित स्वरूपात दिसून येते. या आजारातून मुक्ती नाही आणि म्हणून उपचारांचा प्राथमिक हेतू लक्षणे नियंत्रणात ठेवणे आहे.संदर्भ

 1. Merck Manual Consumer Version [Internet]. Kenilworth (NJ): Merck & Co. Inc.; c2018. Psoriasis.
 2. National Health Service [internet]. UK; Psoriatic arthritis
 3. National Health Service [Internet]. UK; Psoriasis
 4. National Psoriasis Foundation [Internet] reviewed on 10/23/18; Causes and triggers.
 5. American Academy of Dermatology. Rosemont (IL), US; Are triggers causing your psoriasis flare-ups?
 6. Whan B. Kim, Dana Jerome, Jensen Yeung. Diagnosis and management of psoriasis. Can Fam Physician. 2017 Apr; 63(4): 278–285. PMID: 28404701
 7. National Psoriasis Foundation [Internet] reviewed on 10/23/18; Life with Psoriasis.
 8. Gulliver W. Long-term prognosis in patients with psoriasis. Br J Dermatol. 2008 Aug;159 Suppl 2:2-9. PMID: 18700909

Psoriasis साठी औषधे

Psoriasis के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।