myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

पायोडर्मा गँग्रेनोसम काय आहे ?

पायोडर्मा गँग्रेनोसम (पीजी) हा त्वचेचा एक दुर्मिळ विकार संदर्भित करतो. हा वेदनादायी व्रण आल्याने ओळखला जातो. हे व्रण बरे होण्यात जास्त वेळ लागतो आणि क्वचित त्याचे डाग राहतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत ?

हे सामान्यतः पायांवर होतात, तरीही पायोडर्मा गँग्रेनोसम शरीराच्या इतर भागांवर होण्याची शक्यता असते. याची काही सामान्य चिन्हे आणि लक्षणे खालीलपैकी आहे:

 • लहान, लालसर किंवा जांभळ्या-रंगाचे, वेगाने पसरणारे बम्प किंवा फोड दिसू शकतात.
 • निळ्या किंवा गर्द जांभळ्या-रंगाचे कोपरू असलेले वेगवेगळ्या आकारांचे आणि खोली असलेले स्पष्टपणे दिसणारे अल्सर (सूजलेले, उघडे फोड).
 • कधीकधी अल्सर मोठ्या प्रमाणात वाढतात आणि अत्यंत वेदनादायी असतात. ते उपचारांशिवाय बरे होऊ शकतात किंवा अगदी अप्रभावी राहू शकतात.
 • संसर्ग असल्यास ताप येऊ शकतो.
 • सांध्यांमध्ये वेदना (आर्थरेग्लिया) किंवा स्थानिक कोमलता दिसून येते.
 • अशक्तपणा किंवा अस्वस्थता.

याची मुख्य कारणं काय आहेत ?

याचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट नाही आहे (ज्याला आयडिओपॅथीक म्हणतात). मात्र, ते खालील गोष्टींशी संबंधित असू शकते:

 • ऑटोइम्यून डिसऑर्डर (शरीरातील निरोगी टिश्युंविरूद्ध अँटीबॉडी तयार होतात)
 • इन्फ्लेमेटरी बॉवेल डिसीज, काही रक्त विकार आणि काही प्रकारचे संधिवात.
 • गौण ते ट्रॉमा (शरीराला झालेली जखम) किंवा शस्त्रक्रिया (पॅथर्जी).

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात ?

डॉक्टर तपशीलवार इतिहास घेतील आणि वैद्यकीयदृष्ट्या व्यक्तीचे मूल्यांकन करतील व इतर संभाव्य परिस्थितींना वगळण्याचा प्रयत्न करतात. काही नैदानिक चाचण्या ज्यांचा सल्ला दिला जाऊ शकतो त्या अशा आहेत :

 • प्रभावित टिश्यूंची बायोप्सी.
 • जखमेच्या संसर्गाची शक्यता वगळ्यासाठी स्वॅब चाचणी.
 • संबंधित स्थितींची माहिती मिळवण्यासाठी काही रक्त चाचण्या.
 • पॅथर्जी चाचणी (त्वचेवर छिद्र पाडून केलेली चाचणी ज्यामुळे घाव दिसून येतात).

पायोडर्मा गँग्रेनोसमचा उपचार करणे कठीण आहे आणि बरे होण्याची प्रक्रिया वेळ घेते आणि संपूर्ण पुनर्प्राप्तीसाठी एकापेक्षा अधिक उपचार पद्धती आवश्यक असू शकतात. उपाय पर्यायांमध्ये सामान्यतः, त्वचेची ग्राफ्टिंग आणि शस्त्रक्रिया उपचार टाळतात, कारण ते अल्सर वाढवतात. रोगाच्या तीव्रतेवर आधारित पीजीचा  स्थानिक किंवा टॉपिकल उपचार केला जाऊ शकतो किंवा सिस्टमिक थेरपीचा वापर केला जाऊ शकतो.

 • टॉपिकल थेरेपीसह उपचारांमध्ये हे समाविष्ट आहे:
  • वेदना कमी करण्यासाठी लहान अल्सरवर व त्याच्या सभोवती खालील औषधं लावणे:
   • मजबूत स्टेरॉइड प्रेपरेशन्स.
   • कॅल्सीन्युरिन इन्हिबिटर (टेक्रोलिमस).
 • सिस्टमिक उपचारांमध्ये समावेश होतो:
  • संसर्गाच्या प्रकरणात, मायोसायक्लीन किंवा डॅपसोन सारखे अँटीबायोटिक्स.
  • सूज कमी करण्यासाठी स्टेरॉइड्स, जसे की मिथाईलप्रेड्निसोलॉन आणि प्रेड्नीसोन, तोंडावाटे किंवा इंट्रामस्क्यूलर किंवा इंट्रालेश्नल इंजेक्शन म्हणून दिले जाऊ शकतात.
  • इम्यूनोसप्रेसिव्ह औषधे, जसे सायक्लोस्पोरिन, अझाथीओप्राइन, इंफ्लिक्झिमॅब, ॲडलीम्युमॅब आणि मायकोफेनोलेट मोफेटिल शरीराची प्रतिकार प्रतिक्रिया नियंत्रित करण्यात मदत करतात.
 • गंभीर प्रकरणांचा उपचार पुढील औषधांनी केला जातो:
  • सायक्लोफॉसफामाइड.
  • जैविक उपचार.
  • इंट्राव्हेनस स्टेरॉईड्स (शिरेच्या आत दिले जाणारे स्टेरॉईड्स).
  • इम्यूनोग्लोब्युलिन.
 • या स्थितीचा इतिहास असलेल्या लोकांमध्ये शस्त्रक्रियेपूर्वी कॉर्टिकोस्टिरॉईड्ससह प्रतिबंधक उपचारांचा विचार केला पाहिजे कारण शस्त्रक्रियेमुळे ही स्थिती पुन्हा उद्भवू शकते.
 • अल्सरवर उघड ओले ड्रेसिंग.
 1. पायोडर्मा गँग्रेनोसम साठी औषधे

पायोडर्मा गँग्रेनोसम साठी औषधे

पायोडर्मा गँग्रेनोसम के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Clop MG खरीदें
Fubac खरीदें
Clovate GM खरीदें
Cosvate Gm खरीदें
Dermac Gm खरीदें
Etan GM खरीदें
Azonate GC खरीदें
Globet Gm खरीदें
B N C (Omega) खरीदें
Cans 3 खरीदें
Lobate GM खरीदें
Dermowen खरीदें
Gentalene C खरीदें
Exotic खरीदें
Clobenate Gm खरीदें
QD 4 खरीदें
Provate Gc खरीदें
Soltec Gm खरीदें
Quadriderm AF खरीदें
Zincoderm GM खरीदें
Xtraderm खरीदें
Obet G खरीदें
Sterisone G खरीदें
Keziderm खरीदें
Hinate G खरीदें

References

 1. National Organization for Rare Disorders [Internet]; Pyoderma Gangrenosum.
 2. Brooklyn T, Dunnill G, Probert C. Diagnosis and treatment of pyoderma gangrenosum. BMJ. 2006 Jul 22;333(7560):181-4. PMID: 16858047
 3. National Health Service [Internet]. UK; Pyoderma gangrenosum.
 4. Schmieder SJ, Krishnamurthy K. Pyoderma Gangrenosum. [Updated 2019 Feb 28]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
 5. National Institutes of Health; [Internet]. U.S. National Library of Medicine. Safety and Efficacy Study of Humira in Treatment of Pyoderma Gangrenosum.
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें