myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

स्क्लेरोडर्मा म्हणजे काय?

स्क्लेरोडर्मा हा एक संयोजक ऊतक आणि त्वचेला प्रभावित करणारा एक ऑटोइम्युन रोग आहे.हे सामान्यतः ऑटोइम्यून रूमॅटिक रोगांसोबत होतो. स्क्लेरोडर्मा हा शब्द स्व-स्पष्टीकरणात्मक आहे, जेथे 'स्क्लेरो' म्हणजे कठोर आणि 'डर्मा' म्हणजे त्वचा.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

शरीराचा कोणता भाग प्रभावित आहे यावर स्क्लेरोडार्माचे लक्षणे अवलंबून असतात.

प्रारंभिक लक्षणांमध्ये खालील समाविष्ट आहे:

 • हात, बोट आणि चेहऱ्यावरील त्वचा जाड आणि कडक होणे.
 • बोटांवर सूज आणि उबदारपणा जाणवणे.
 • लालसर आणि सुजलेले हात.
 • वेदनादायक सांधे.
 • सकाळी उठल्यावर कठोरपणा.
 • थकवा.
 • वजन कमी होणे.
 • रेनॉड फिनॉमिना: अंगठा आणि बोटांच्या टोकांमध्ये परिसंचरण न झाल्याने ,ते थंड झाल्यावर पांढरे पडतात.

परिणामी लक्षणे जे नंतरून दिसतात त्यात खालील समाविष्ट आहेत:

 • ऊतक गमावल्याने त्वचा रंगीत दिसते.
 • कॅल्सीनोसिस: बोटांवर, हातांवर इतर दबावाच्या भागांवर लहान, स्थानिकृत, कठिण जनुक तयार होणे.
 • रेनॉड फिनॉमिना
 • इसोफगेलचे व्यवस्थित काम न करणे.
 • स्क्लेरोडॅक्टील: त्वचा पातळ, चमकदार आणि तेजस्वी दिसते, परिणामी हाताच्या आणि पायांच्या बोटांची कार्यक्षमता कमी होते
 • तेलगिटासिया: त्वचेच्या पृष्ठभागावर लाल डाग सारखे दिसणारे रक्तवाहिन्यांचे डायलेशन.
 • रेनॉड फिनॉमिना नंतरच्या टप्प्यात झाल्यामुळे परिणामी भागांमध्ये मुंग्या येणे, बधिर होणे किंवा वेदना होते.

डिफ्यूज स्क्लेरोडर्माचा हृदय, रक्तवाहिन्या, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल अवयवांवर परिणाम होतो.

याचे मुख्य कारणं काय आहेत?

स्क्लेरोडर्माचे कारणं अस्पष्ट आहे, पण असे मानले जाते की हे ऑटोइम्युन यंत्रणेमुळे होते.

हे अधिक सामान्यतः स्त्रियांना प्रभावित करते आणि दोन प्रकारांमध्ये दिसून येते, ते म्हणजे,

 • स्थानिकीकृत स्क्लेरोडर्मा.
 • डिफ्यूज स्क्लेरोडर्मा.

याचे निदान आणि उपचार कसे केले जाताण?

स्क्लेरोडर्मासाठी संधिवाताचे विशेषज्ञ किंवा त्वचाविज्ञानाशी सल्लामसलत आवश्यक आहे.

स्क्लेरोडर्माच्या निदानात वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक तपासणी मदत करते.

अनेक चाचण्या आणि तपासण्या या रोगाचे मूल्यांकन करण्यात डॉक्टरांना मदत करतात.

अन्वेषणांमध्ये हे समाविष्ट आहे:

 • रक्त चाचणी.
 • अँटिन्युक्लियर अँटीबॉडी चाचणी.
 • त्वचेची बायोप्सी.

अंतर्गत अवयवांच्या तपासणीसाठी इतर चाचण्यांची गरज भासू शकते.

स्क्लेरोडर्माचा उपचार लक्षणे हाताळायला आणि त्यांना कमी करायला केले जातात.

हृदयतील जळजळी पासून आराम मिळण्यासाठी आणि रक्त परिसंचरण सुधारण्यासाठी डॉक्टर औषधे लिहून देतील.

प्रतिरक्षा प्रणालीची क्रिया कमी करण्यासाठी औषधे स्क्लेरोडार्माची प्रगती मंदावतात.

जळजळ, वेदना आणि सूज कमी करण्यासाठी अँटी-इंफ्लॅमेटरी एजंट्स आणि ॲनाल्जेसिक उपयुक्त आहेत.

प्रभावित अंतर्गत अवयवांवर अवलंबून, त्यानुसार औषधे निर्धारित केली जातात.

स्वत: ची काळजी कशी घ्याल:

 • थंडीपासून वाचण्यासाठी हातात आणि पायात मोजे घाला.
 • शरीर स्वच्छ ठेवा आणि चांगली-मॉइस्चराइज्ड त्वचा राखणे महत्वाचे आहे.
 • फिजियोथेरेपी करून पहा.
 • ध्रूमपान टाळा.
 1. स्क्लेरोडर्मा साठी औषधे
 2. स्क्लेरोडर्मा चे डॉक्टर
Dr. Siva Subramanian

Dr. Siva Subramanian

डर्माटोलॉजी

Dr. Abhishek Mishra

Dr. Abhishek Mishra

डर्माटोलॉजी

Dr. Sheilly Kapoor

Dr. Sheilly Kapoor

डर्माटोलॉजी

स्क्लेरोडर्मा साठी औषधे

स्क्लेरोडर्मा के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
SBL Thiosinaminum Dilution खरीदें
SBL Thiosinaminum Trituration Tablet 3X खरीदें
Bjain Thiosinaminum Dilution खरीदें
Schwabe Thiosinaminum CH खरीदें
Dr. Reckeweg Thiosinaminum Dilution खरीदें
ADEL Thiosinaminum Dilution खरीदें
ADEL Thiosinamin Trituration Tablet 3X खरीदें

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Scleroderma Foundation, Danvers, MA. [Internet] What is scleroderma?
 2. National Institutes of Health; [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Scleroderma.
 3. healthdirect Australia. Scleroderma. Australian government: Department of Health
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Scleroderma
 5. National Institute of Arthritis and Musculoskeletal and Skin Diseases [Internet]. National Institute of Health; Scleroderma.
 6. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Scleroderma
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें