सीझर्स - Seizures in Marathi

सीझर्स
सीझर्स

सीझर्स म्हणजे काय?

सीझर्स ला सामान्यपणे फिट येणे किंवा झटके येणे म्हणतात. हे शारीरिक निष्कर्ष आणि वागण्यातील बदल मेंदूतील अचानक होणाऱ्या अनेक विद्युत विच्छेदनांमुळे होतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

फोकल आणि सामान्यीकृत सीझर्स हे सीझर्स चे दोन मुख्य प्रकार आहेत, जे पुढील लक्षणांनी वैशिष्टयकृत केले जातात:

फोकल सीझर्स हे मेंदूतील एका विशिष्ट भागापासून उद्भवतात. फोकल सीझर्स शी संबंधित लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

 • शरीराच्या एखाद्या भागाची अचानक हालचाल होणे.
 • चेतनक्षमतेतील बदल ज्यामुळे हालचाली आणि क्रियांची पुनरावृत्ती होते.
 • ऑराज चा अनुभवही येऊ शकतो.
 • अस्तित्वात नसलेल्या गोष्टी ऐकणे, वास घेणे आणि चव घेणे.

सामान्यीकृत सीझर्सशी संबंधित लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

 • अब्सेंस सीझर्स: हे लहान मुलांमध्ये सामान्य असते, ज्यामध्ये ते रिक्त जागेकडे भीती वाटत असल्यासारखे बघतात किंवा सूक्ष्म शारीरिक हालचालींसोबतच क्षणिक जागरूकता हरपण्याचीही शक्यता असते.
 • टॉनिक सीझर्स: स्नायूंमध्ये कडकपणा आल्याने पडणे. यामध्ये पाठीच्या, हातांच्या आणि पायांच्या स्नायूंवर परिणाम होणे सामान्य आहे.
 • क्लोनीक सीझर्स: यामध्ये चेहरा, मान आणि बाहूंच्या स्नायूंवर परिणाम होणे सामान्य आहे.
 • टॉनिक-क्लोनीक सीझर्स: यामध्ये टॉनिक आणि क्लोनीक सिझर्सच्या एकत्रित लक्षणांचा अनुभव येऊ शकतो.
 • मेक्लोनिक सीझर्स: स्नायू खेचले जाण्यासोबतच झटपट लघु हालचाली होणे.
 • अटॉनिक सीझर्स: स्नायूंवरील नियंत्रण सुटल्याने व्यक्ती कोसळते किंवा खाली पडू शकते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

अनेक न्यूरॉलॉजिकल परिस्थितींप्रमाणेच सीझर्सचे मुख्य कारण अद्याप माहित नाही. पण अपस्मार हे सामान्य कारण आहे.

इतर कारणांमध्ये पुढील कारणांचा समावेश होतो:

 • आनुवंशिक घटक: सीझर्स होण्यामध्ये गुणसूत्रांचे उत्परिवर्तन किंवा वारसा जप्त होणे हे महत्वाची भूमिका बजावतात.
 • ब्रेन ट्यूमर, डोके दुखणे, न्यूरोलॉजिकल विकासात्मक परिस्थिती, मेंदूचा दाह किंवा अल्झायमर आजार.
 • संसर्ग.
 • ह्युमन इम्म्युनोडेफिशियंसि व्हायरस (एचआयव्ही) संसर्ग.
 • मद्यपान किंवा ड्रग्सचा गैरवापर.
 • झोपेचा झटका, ताप.
 • अँटिडिप्रेसंट्स, ड्युरेटीक्स ॲनलजेसिक्स यांसारखे औषधोपचार.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

सीझर्सचे निदान करण्यासाठी अनेक तपासण्यांसोबतच वैद्यकीय इतिहासही तपासला जातो.

 • संसर्ग, अनुवांशीक विकृती आणि हार्मोनल किंवा इलेक्ट्रोलाईट असंतुलन शोधण्यासाठी रक्त चाचणी.
 • लंबर पंक्चर.
 • इलेक्ट्रोएन्सेफॅलोग्राम.
 • न्यूरॉलॉजिकल कार्यांची चाचणी.
 • मॅग्नेटिक रेझोनंन्स इमेजिंग (एमआरआय).
 • पोसिट्रॉन एमिशन टोमोग्राफी (पीईटी) स्कॅन.

सीझर्स कधीकधी एक घटना असू शकते आणि त्यास कोणत्याही उपचाराची गरज नसते.

जर सीझर्स च्या घटनांची पुनरावृत्ती होत असेल तर डॉक्टर अँटी अप्स्माराची औषधे सुचवू शकतात. काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेची गरज पडू शकते. सीझर्सच्या उपचारांमध्ये उच्च चरबी, कमी-कर्बोहायड्रेट, केटोजेनिक आहारासारखे आहारातील बदल मदत करतात.संदर्भ

 1. Johns Hopkins Medicine [Internet]. The Johns Hopkins University, The Johns Hopkins Hospital, and Johns Hopkins Health System; Epilepsy and Seizures: Conditions We Treat
 2. Oguni H. Diagnosis and treatment of epilepsy. . Epilepsia. 2004;45 Suppl 8:13-6. PMID: 15610188
 3. National Institute of Neurological Disorders and Stroke [Internet] Maryland, United States; The Epilepsies and Seizures: Hope Through Research.
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Seizures
 5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Epilepsy

सीझर्स साठी औषधे

Medicines listed below are available for सीझर्स. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.