ॲनाफिलेक्टिक शॉक - Anaphylactic Shock in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

January 17, 2019

October 28, 2020

ॲनाफिलेक्टिक शॉक
ॲनाफिलेक्टिक शॉक

ॲनाफिलेक्टिक शॉक काय आहे?

ॲनाफिलेक्सिस ही एक गंभीर ॲलर्जीक रिॲक्शन आहे जी जीव-घेणी ठरू शकते आणि ही ॲलर्जिनच्या संपर्कात आल्यावर लगेचच उद्भवते. यासाठी शेंगदाणे किंवा मधमाशी डंख सारखे ॲलर्जन्स जबाबदार असू शकतात. अशा परिस्थितीत, जेव्हा एकादी व्यक्ती ॲलर्जिनच्या संपर्कात येते तेव्हा रोगप्रतिकार शक्ती सक्रिय होते,ज्यामुळे मोठ्या प्रमाणात केमिकल्स रिलीज होतात. यामुळे अचानक रक्तदाब कमी होऊन (हायपोटेन्शन), श्वास नलिके मध्ये अडथळा येऊन श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो. वेळेत उपचार न केल्यास,  ॲनाफिलेक्टिक शॉक ची स्थिती निर्माण होते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

ॲनाफिलेक्टिक शॉकची चिन्हे आणि लक्षणे :

 • रक्तदाब कमी होणे.
 • गरगरणे किंवा चक्कर येणे.
 • कमकुवत आणि वेगवान पल्स.
 • अतिसार, मळमळ किंवा उलट्या.
 • श्वास नलिके मध्ये अडथळा तसेच जीभ आणि घशावर सूज आणि त्यामुळे घरघर (श्वास घेताना आवाज येणे) आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
 • हाईव्ज (एखादी ॲलर्जी किंवा अज्ञात कारणामुळे त्वचेची प्रतिक्रिया) जसे की त्वचा खाजवणे, फोडं येणे किंवा त्वचा लाल होणे.

ॲनाफिलेक्टिक शॉकची  मुख्य कारणं काय आहेत?

प्रतिकारशक्तीमुळे बाहेरच्या कणां विरूद्ध तयार झालेले अँटिबॉडीज महत्वाचे असतात कारण ते शरीराचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. पण, काही लोकांमध्ये, प्रतिकारशक्ती हानीकारक कणांना अति प्रोत्साहित करते ज्यामुळे निरुपद्रवी गोष्टींवर देखील ते हल्ला करतात. असे केल्याने ॲलर्जीक रिॲक्शन होते. सर्वसाधारणपणे, ॲलर्जीक रिॲक्शन जीव-घेणी नसते, पण, त्यामुळे गंभीर प्रकरणात ॲनाफिलेक्सिस होऊ शकते.

ॲनाफिलेक्सिसची सामान्य कारणे अशी आहेत:

 • विविध औषधे ज्यामध्ये डॉक्टरांचा सल्ला न घेता विकत घेतलेले पेन रिलीव्हर्स, अँटीबायोटिक्स, ॲस्पिरिन आणि इतर समाविष्ट असतं.
 • इमेजिंग टेस्ट च्या वेळी इंट्राव्हेनस (आयव्ही ) कॉन्ट्रास्ट डाईजचा वापर करणे.
 • मधमाश्या, फायर ॲण्ट्स, येल्लो जॅकेट्स, गांधीलमाशी यांचा डंख.
 • लॅटेक्स.

मुलांमध्ये ॲनाफिलेक्सिसच्या सामान्य कारणं याप्रमाणे दिसून येतात:

खाद्य पदार्थाची ॲलर्जी, ज्यामध्ये खालील पदार्थ असू शकतात:

 • दूध.
 • मासे आणि शेलफिश.
 • शेंगदाणे.
 • ड्राय फ्रुटस.

ॲनाफिलेक्सिसचे काही असाधारण कारणं:

 • ॲरोबिक व्यायाम, जसे की जॉगिंग.
 • विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर नंतर व्यायाम करणे.
 • गरम, आर्द्र किंवा थंड हवामानात व्यायाम करणे.
 • कधीकधी ॲनाफिलेक्सिसचे कारण अज्ञात असते; याला आयडियोपॅथिक ॲनाफिलेक्सिस असे म्हणतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर तुम्हाला जनरल हिस्टरी विचारुन आधीच्या ॲलर्जी रिॲक्शन बद्दल सविस्तर माहिती विचारतात. ॲलर्जी चे कारण जाणून घेण्यासाठी,आपल्याला प्रत्येक ॲलर्जीच्या स्रोता बद्दल  स्वतंत्रपणे विचारले जाऊ शकते ज्यामध्ये वरील कारणे असू शकतात. तसेच, निदानाची पुष्टी करण्यासाठी, ब्लड टेस्ट केली जाऊ शकते ज्यामुळे एंझाइम (ट्रिपटेझ) मोजण्यास मदत होते; ॲनाफिलेक्झीसनंतर तीन तासांपर्यंत ही लेव्हल  वाढलेली असण्याची शकत्या असते. ॲलर्जी ट्रिगर टेस्ट्स मध्ये विविध त्वचा किंवा रक्त तपासण्यांचा समावेश असतो.

ॲनाफिलेक्टिक अटॅकच्या वेळी, लक्षणे आणखी खराब न होण्याकरिता ताबडतोब आणि त्वरित  उपचार गरजेचे आहेत. नाडी (कमकुवत किंवा वेगवान), त्वचा (फिकट, थंड किंवा ओलसर), श्वास घेण्यास त्रास, गोंधळणे किंवा बेशुद्ध होणे या सारखे लक्षणे असतील तर त्वरित विद्यकीय उपचार गरजेचे असतात. ज्या व्यक्तींमध्ये श्वासोच्छवासाचा किंवा हृदयाचा ठोका थांबतो त्यांना, कार्डिओपल्मोनरी रीसससायटेशन (सीपीआर) दिले जाते ज्यामध्ये हे असू शकतं:

 • एपिनेफ्राइन (ॲड्रेनलाइन) जे ॲलर्जिनचा शरीरावरील प्रतिसाद कमी करते.
 • श्वास सुलभ करण्यासाठी ऑक्सिजन.
 • इंट्राव्हेनस (आयव्ही) अँटीहिस्टामाइन्स आणि कोर्टिसोनचा वापर करून वायुमार्गाची सूज कमी केली जाते; त्यामुळे श्वासोच्छवास सुरळीत होतो.
 • अल्ब्युरोल किंवा इतर बीटा-एगोनिस्ट्सच्या वापराद्वारे श्वासोच्छवासाचे त्रास कमी करतात
 • आपत्कालीन परिस्थितीत, रुग्णाने त्याचे किंवा तिचे पाय थोडे वर करून लेटावावे आणि ऑटोइन्जेक्टटरचा वापर करून एपिनेफ्राइन चे इंजेक्शन द्यावे (सिरिंजमध्ये एक कन्सिल्ड कॉम्बिनेशन असते जे औषधाचा एक डोस इतके इंजेक्शन देते). यामुळे ॲनाफिलेक्टिक  शॉकची लक्षणे टाळण्यास मदत होते.
 • दीर्घकालीन उपचारांमध्ये इम्युनोथेरपीचा समावेश होतो ज्यात अनेक ॲलर्जी शॉट्स असतात आणि जर  ॲनाफिलेक्झिस कीटकांचा डंख लागून ट्रिगर झाले असेल तर त्या शरीरात ॲलर्जी चा प्रतिसाद कमी करण्यास मदत करतात. हे भविष्यात गंभीर प्रतिक्रिया टाळण्यास मदत करते.संदर्भ

 1. Ministry of Health, Israel. Anaphylactic reaction. State of Israel
 2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Anaphylactic shock
 3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Anaphylaxis
 4. Department of health. Anaphylaxis. Government of Western Australia[internet].
 5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Anaphylaxis