पोटदुखी - Stomach Pain in Marathi

पोटदुखी
पोटदुखी

सारांश

पोटदुखी म्हणजे उदरक्षेत्रामधील( छाती आणि मांडींच्या सांध्यामधील क्षेत्र) वेदना. पोटामध्ये जठराशिवाय इतरही अवयवे असतात उदा. यकृत,स्वादुपिंड, पित्ताशय, आतडी, जननेंद्रिये,मूत्राशय इत्यादी असतात. म्हणून, या अवयवांपैकी कोणत्याच्याही बिघाड, इजा, संक्रमण किंवा जळजळ (सूज) यामुळे पोटदुखी होऊ शकते.

प्रत्येकजण, कोणत्या न कोणत्या वेळी, पोटदुखीला सामोरे गेलेलाच असतो. ती खूप सामान्य, साधारणपणें थोडा वेळ टिकणारी असते आणि बहुधा गंभीरही नसते. पण, काही वेळा ती एखाद्या गंभीर अंतर्निहित वैद्यकीय परिस्थितीचे सूचक ठरू शकते.

उपचार विशिष्ट अंतर्निहित  कारणावर अवलंबून, पोटदुखीवर केले जाते. त्यामध्ये औषधे, शरिरातील तरळ पदार्थांचे प्रत्यांतरण, स्वयंकाळजी उदा. विश्रांती आणि दुर्मिळरीत्या, शस्त्रक्रिया सामील असते.

पोटदुखी ची कारणे - Causes of Stomach Pain in Marathi

पोटदुखीचे सर्वांत सामान्य कारणांमध्ये गहन शारीरिक हालचालीमुळे स्नायू ताणले जाणे, खेळ किंवा अपघातात्मक इजा, विषबाधा, स्त्रियांमध्ये रजोस्रावासंबंधी क्रॅंप्स, पोटफुगी, बद्धकोष्ठता, अपानवायू, अल्सर, संक्रमण आणि जळजळीचे समावेश आहे. पोटदुखीचे, गाठी किंवा गळूही शक्य पण कमी सामान्य कारणे आहेत.

स्थानावर आधारित पोटदुखीची कारणे:

 • उपर्केंद्रीय (एपिगॅस्ट्रिक क्षेत्र):
  एपिगॅस्ट्रिक क्षेत्रामध्ये तुम्हाला वेदना होत असल्यास, तुम्हाला याचा त्रास असू शकतो:
  • आम्लीयता: एपिगॅस्ट्रिक क्षेत्रामध्ये वेदना होण्याचे हे सर्वांत सामान्य कारण आहे. हे अन्ननलिकेत पोटातील आम्ल परत गेल्यामुळे होते.
  • पेप्टिक अल्सर किंवा पेप्टिक अल्सर रोगः पोटाच्या आतील किनारींमध्ये खुल्या फोडी किंवा फट, ज्यामुळे अन्न खाल्ल्यानंतर जठरदुखी होते.
  • जीईआरडी (गॅस्ट्रोईसीफेगल रिफ्लक्स डिसीझ): पचनतंत्रातील रोग, ज्यामुळे पोटातील वस्तू अन्ननलिका किंवा पोटाला तोंडाशी जोडणार्र्या नलिकेत सारखे सारखे परत जातात. अधिक वाचाः( जीईआरडी उपचार)
  • मायोकार्डिअल आयस्केमिआहे हृदयामध्ये रक्ताभिसरणामध्ये घट झाल्याने होते, ज्यामुळे त्याला पर्याप्त प्राणवायू मिळू नसू शकते.
  • एब्डॉमिनल आओर्टिक अनॅउरिझमएक रोग ज्यामध्ये आओर्टा( शरिराला रक्त पुरवठा करणारी प्रमुख रक्तवाहिनी) हिच्या भिंती अशक्त होतात, सुजतात आणि छोट्या फुगासारख्या फुगतात
  • स्वादुपिंडात वेदना
  • अमाशय आणि सामान्य बाइल डक्ट यामध्ये अडसर
    
 • वरील उजवे भाग
  वरील उजव्या भागात तुम्हाला वेदना होत असल्यास, पुढील कारणे असू शकतात:
  • एक्युट कॉलिसाइस्टीसअमाशयाच्या किनारीच्या दाहामुळे वेदना.
  • बाइलिरी कॉलिकबाइल डक्टला अडवणार्र्या अमाशयातील खडांमुळे वेदना.
  • एक्युट हॅपिटायटीससंक्रमण, मद्यपान किंवा मादक पदार्थांचे वापर, काही औषधोपचाराचे विपरीत परिणाम, विषारी पदार्थ इ. किंवा पू बनल्याने यकृताचे दाह
  • हॅपॅटोमॅगली: मद्यपानामुळे यकृताचे आकार असामान्यपणें वाढणें, काही औषधांचे सहप्रभाव इ .
  • ड्युडोनल अल्सर: छोट्या आतडीच्या वरील भागातील क्षता.
  • हर्प्स झोस्टर(व्हॅरिसेला झॉस्टर विषाणूचे आधीचे संक्रमण असलेल्या रुग्णांमध्ये विषाणू परत सक्रीय झाल्यामुळे होते)
  • मायोकार्डिअल आयस्केमिआहा आजार होण्याची किंचित शक्यता असते.यामध्ये हृदयाला होणारा रक्त पुरवठा कमी होतो. रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर एक वसायुक्त पदार्थ जमा होतो, जो काही काळावधीनंतर कडक होतो आणि म्हणून हृदयाला होणारा रक्त पुरवठा कमी होतो.  जेव्हा ही “प्लाक” नावाची कडक झालेली चरबी संपूर्णपणें हृदयाला पुरवठा करणार्र्या रक्तवाहिनीला अडवून टाकते, तेव्हा त्यामुळे तीव्र वेदना होते. तुम्ही अनुभवू शकत असलेली इतर वैशिष्ट्ये म्हणजे श्वास छोटा पडणें, घसा, बाह किंवा खांदा यांतील वेदना, शारीरिक श्रमाशिवाय घामे येणें इ.
  • राइट लोअर लोब न्युमोनिआउजव्या बाजूच्या फुफ्फुसाच्या खालील भागामध्ये न्युमोनिआ.
  • उजव्या बाजूला मुतखडा: ही वेदना बहुतांशी पाठीच्या उजव्या बाजूची वेदना म्हणून ही संदर्भित केली जाते.
    
 • वरील डावे भाग:
  पुढील काही आरोग्य अवस्थांमुळे पोटाच्या वरील डाव्या भागात वेदना होऊ शकते:
  • एक्युट पॅंक्रिआयटीस (स्वादुपिंडाच्या दाहामुळे होणारी सौम्य ते मध्यम स्वरूपाची वेदना). जेवण केल्यानंतर वेदना अचानक आणि तीव्र होते आणि अनेक दिवस टिकू शकते.
  • गॅस्ट्रिक अल्सर (जिवाणूजन्य संक्रमण, अतिशय मद्यपान, तापामध्ये वापरली जाणारी काही औषधे, काही वेदनाशामके, तणाव, मसालेदार पदार्थ खाणें इ.)
  • गॅस्ट्रायटीस (पोटाच्या किनारीचे दाह)
  • स्प्लीनच्या आकारात वाढ, ती फाटणें किंवा तिच्यापर्यंत रक्त पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होणें
  • मायोकार्डिअल आयस्केमिआ
  • लेफ्ट लोअर लोब न्युमोनिआ
  • मुतखडा: ही वेदना बहुतांशी पाठीच्या डाव्या बाजूची वेदना म्हणून ही संदर्भित केली जाते.
    
 • खालील उजवे भाग:
  तुम्हाला पोटाच्या खालील उजव्या भागात वेदना होत असल्यास, ती पुढील आरोग्य अवस्थांमुळे असू शकते:
  • एपेंडॅसायटीसएपेंडिक्सचे दाह. एपेंडिक्स पोटाच्या खालील उजव्या भागात कॉलनपासून निघणारी एक बोटाच्या आकाराची नलिकामय पिशवी असते. ही वेदना खूप तीव्र असते आणि तिला आपत्कालीन उपचाराची गरज असते.
  • रप्चर्ड एक्टोपिक प्रेग्नॅंसीएक वैद्यकीय आपत्स्थिती, ज्यामध्ये उर्वरित अंड स्वतःला गर्भाशयापासून दुसर्र्या जागेवर स्थित करते, वाढते आणि फॅलॉपिअन ट्यूबमध्ये फट आणते.
  • लहान आतडीमध्ये अडसरपुनर्लाभ/स्कार तंतूचे क्षेत्र किंवा पट्टे, जे शस्त्रक्रियेनंतर होऊ शकतात.
  • रिझनल एंटरायटीस किंवा क्रोन्स डिसीझ: एक दीर्घकालिक अवस्था, ज्यामध्ये गटमध्ये दाह होतो. याचे साधारणपणें लहान आतडी आणि कॉलनवर प्रभाव पडते.
  • पेल्विक इंफ्लॅमेटरी डिसीझ/डिसॉर्डर: स्त्रीच्या प्रजनन अवयवांचे संक्रमण.
  • ट्विस्टेड ओव्हॅरिअन सिस्ट: गर्भाशय आणि फॅलॉपिअन ट्युब यांचे व त्यांना होणार्र्या रक्त पुरवठ्याचे आंशिक किंवा पूर्ण आवर्तन.
  • हर्निआ: एखादे अवयव उदा. लहान आतडी किंवा वसायुक्त तंतू त्याच्या भोवतीच्या स्नायू किंवा फॅशिआ नावाच्या संयोजक तंतूमध्ये अशक्त बिंदूच्या माध्यमातून ढकलल्यास हर्निआ होते
  • युरेटेरल कॅल्कुलीगर्भाशयात असणारे खडे
    
 • खालील डावे भाग:
  तुम्हाला पोटाच्या खालील डाव्या भागात वेदना होत असल्यास, ती पुढील आरोग्य अवस्थांमुळे असू शकते:
  • डायव्हर्टीक्युलायटीस: डायव्हर्टीक्युला नावाच्या लहान पिशवींचे दाह किंवा संक्रमण, ज्या आतडीच्या भिंतींवर विकसित होतात.
  • गळत असलेले अन्युरिझ्म: एक प्राणघातक प्रसंग, ज्यामध्ये अन्युरिझ्म फाटते आणि रक्तवाहिनीच्या भिंतीच्या आत रक्ताची गळती होते.
  • रप्चर्ड एक्टोपिक प्रेग्नॅंसी:
  • पेल्विक इंफ्लॅमेटरी डिसीझ/डिसॉर्डर:
  • ट्विस्टेड ओव्हॅरिअन सिस्ट: गर्भाशय आणि फॅलॉपिअन ट्युब यांचे व त्यांना होणार्र्या रक्त पुरवठ्याचे आंशिक किंवा पूर्ण आवर्तन.
  • हर्निआ: एखादे अवयव उदा. लहान आतडी किंवा वसायुक्त तंतू त्याच्या भोवतीच्या स्नायू किंवा फॅशिआ नावाच्या संयोजक तंतूमध्ये अशक्त बिंदूच्या माध्यमातून ढकलल्यास हर्निआ होते
  • युरेटेरल कॅल्कुलीगर्भाशयात असणारे खडे
  • रिझनल एंटरायटीस किंवा क्रोन्स डिसीझ: एक दीर्घकालिक अवस्था, ज्यामध्ये गटमध्ये दाह होतो. याचे साधारणपणें लहान आतडी आणि कॉलनवर प्रभाव पडते.
 •  मध्यकेंद्रीय (पेरियुंबिलिकल) क्षेत्र:
  • ट्रांसव्हर्स कॉलनचे रोग: कॉलनचे मध्य भाग पोटाच्या उजव्या भागातून डाव्या भागाकडे वाढते.
  • गॅस्ट्रोइंट्रायटीस: दाह झालेले पोट आणि आतड्या, याचे वैशिष्ट्य असते अतिसार, उलटी आणि पोटदुखी.
  • एपिंडेसायटीस
  • अर्ली बॉव्हेल ऑब्स्ट्रक्शन: पोटाची शस्त्रक्रिया हिची परिणामी गुंतागुंत म्हणून आतडीत अडसर. 
 • स्थलांतरित होणारी वेदना:
  जेव्हा पोटाच्या संपूर्ण भागात वेदना होत असेल किंवा निरंतर ती जागा बदलत असेल किंवा स्थानीयकृत करता येत नसेल, तेव्हा तिला स्थलांतरित होणारी वेदना असे म्हणतात. अशा प्रसंगांमध्ये, रुग्ण भ्रमात पडतो आणि वेदनेच्या उगमाचे स्थळ ओळखणें त्याला कठीण होऊन बसते. अशा वेदनेची संभाव्य कारणे म्हणजे:   
  • जनरल पॅरिटॉनायटीसपॅरिटॉनिअम म्हणजेच पोटाच्या आतील भिंतीच्या किनारीचे आणि बहुतांशी पोटातील अवयवांना झाकणार्र्या तंतूचे दाह, जे जिवाणूजन्य किंवा बुरशीजन्य संक्रमणामुळे होते.
  • एक्युट पॅंक्रिआयटीस
  • सिकेल सेल क्रायसिससिकेल सेल डिसीझ असलेल्या रोगांमध्ये होते. कुर्र्हाडीच्या आकाराचे आणि मोडलेल्या लाल रक्तपेशी लहान रक्तवाहिन्यांना अडवून टाकतात आणि त्यामुळे तीव्र वेदना होऊ शकते.
  • मेसेंट्रिक थ्रोंबोसिस: आतडींमधून रक्त शोषणार्र्या एक किंवा अधिक प्रमुख रक्तनलिकांमध्ये रक्ताचा थक्का जमणें.
  • गॅस्ट्रोएंट्रायटीस
  • चयापचय विकार
  • दुभाजलेले किंवा फाटलेले एन्युरिझ्म
  • आतडीत अडसर
  • मनोरोगजन्य  कारणे: तणाव, चिंता, अवसाद इ. यांमुळेही पोटदुखी होते. अंतर्निहित मनोवैज्ञानिक धक्क्यातून रुग्णाला पुनर्लाभ झाल्यानंतर ती शक्यतो निघून जाते.
 • रिफर्ड पेन:
  काही वेळा वेदनेच्या उगमाचे स्थळ आणि जाणिवेचे स्थळ वेगळे असते. अशा वेदनेला रिफर्ड पेन असे म्हणतात. काही श्वसनात्मक विकार उदा. न्युमोनिआ, पल्मनरी इंफेक्शन( फुफ्फुसाचे संक्रमण), आणि मायोकार्डिअल इंफार्क्शन ( हृदयविकाराचा झटका) यांसारख्या हृदयरोगांमुळे पोटाच्या वरील भागात रिफर्ड पेन या स्वरूपाची वेदना होऊ शकते.

आम्ही असा सल्ला देत आहोत की तुम्ही स्वतःच स्वतःला होणार्र्या पोटातील वेदनेच्या कारणाचे निदान करण्याचे प्रयत्न करू नये. हे कार्य नेमक्या आणि उचित पद्धतीने केवळ तुमचे डॉक्टर हेच करू शकतात. तुमच्या पोटातील वेदनेचे अंतर्निहित कारण शोधण्यासाठी विहित निदानात्मक चाचण्यांसह एक शारीरिक चाचणीचीही गरज पडू शकते.

पोटदुखी चा उपचार - Treatment of Stomach Pain in Marathi

सौम्य पोटदुखी साधारपणे एक किंवा दोन दिवस टिकते आणि पचनतंत्रातील कचर्र्याच्या सतत निःसारणामुळे स्वतःच थांबते. तरीही, दीर्घकालिक पोटदुखीची उपेक्षा करू नये आणि काही अंतर्निहित गंभीर समस्या नसल्याची खात्री करण्यासाठी वैद्यकीय मदत घेण्याचा विचार तरी केले पाहिजे. अशी समस्या असल्यास, तुमच्या शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य चांगले राहण्यासाठी संपूर्ण आणि सामायिक उपचार घेण्याची प्रार्थना करत आहोत.

पोटदुखीचे उपचार निदानावर आधारित असते.

सौम्य ते मध्यम स्वरूपाची वेदना वेदनाशामक गोळ्या, तरळ पदार्थ नियमित घेणें आणि एक निमठोस आहाराद्वारे एक ते दोन दिवसांत जाते.

औषधोपचार

वेदनाशामकांमुळे ठराविक स्तरापर्यंत वेदनेत आराम मिळतो. आम्लीयता असल्यास,सहज मिळणारी आम्लशामके दिल्यास लगेच वेदनेत राहत मिळू शकते. डॉक्टर उलट्या होणे कमी करण्यासाठी एंटी-एमेटिक( उलटी कमी करणारी) औषधे विहित करते. शरिरातील तरळ पदार्थाच्या गळतीच्या तीव्रतेप्रमाणें इंट्राव्हेनस तरळ पदार्थां(ड्रिप)द्वारे किंवा ओरल रिहायड्रेशन सॉल्ट(ओआरएस) द्रावण तोंडाद्वारे देऊन तरळ पदार्थांचे प्रत्यांतरण केले जाते.संक्रमण किंवा पू असल्यास, जंतूनाशक औषधे दिली जातात.

शस्रक्रिया

लक्षणे टिकून राहिल्यास, तुमचे डॉक्टर रुग्णालयात भरती होण्याचा किंवा पुढील चाचणी किंवा शस्त्रक्रिया करून घेण्याचा सल्ला देऊ शकतो, जे तुमच्या आरोग्य पूर्ववत करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितींमुळे असेल.

स्व-काळजी

तुम्हाला सौम्य पोटदुखी झाल्यास किंवा डॉक्टर उपलब्ध होईपर्यंत, तुम्ही खालील पद्धतीने टप्प्याटप्प्याने स्वतःचे साहाय्य करू शकता:

 • पडण्यासाठी आरामदायक स्थिती शोधा.
 • स्वतःला पर्याप्त उष्ण ठेवा(विशेषकरून रजोस्रावासंबंधी क्रॅंप्स आणि स्नायूमध्ये ताण पडणे)
 • पुरेपूर विश्रांती घ्या.
 • अतिसार असल्यास किंवा पातळ मल निघत असल्यास साधे पाणी पिऊ नका.
 • संक्रामित खाद्यपदार्थ खाऊ अथवा पिऊ नका.
 • दूध घेणे टाळा.
 • मसालेदार आणि जड पदार्थ घेणे टाळा.
 • कमी वेळेच्या अंतराळांवर कमी प्रमाणात हलका आहार घ्या.


संदर्भ

 1. Sherman R. Abdominal Pain. In: Walker HK, Hall WD, Hurst JW, editors. Clinical Methods: The History, Physical, and Laboratory Examinations. 3rd edition. Boston: Butterworths; 1990. Chapter 86
 2. Fields JM, Dean AJ. Systemic causes of abdominal pain.. Emerg Med Clin North Am. 2011 May;29(2):195-210, vii. PMID: 21515176.
 3. National Health Service [Internet]. UK; Stomach ache
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Abdominal pain
 5. Healthdirect Australia. Abdominal pain. Australian government: Department of Health

पोटदुखी चे डॉक्टर

Dr Devaraja R Dr Devaraja R Gastroenterology
7 Years of Experience
Dr. Abhay Singh Dr. Abhay Singh Gastroenterology
1 Years of Experience
Dr. Suraj Bhagat Dr. Suraj Bhagat Gastroenterology
23 Years of Experience
Dr. Smruti Ranjan Mishra Dr. Smruti Ranjan Mishra Gastroenterology
23 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

पोटदुखी साठी औषधे

पोटदुखी के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

पोटदुखी की जांच का लैब टेस्ट करवाएं

पोटदुखी के लिए बहुत लैब टेस्ट उपलब्ध हैं। नीचे यहाँ सारे लैब टेस्ट दिए गए हैं: