myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

टेंडनची इजा (टेंडिनोपॅथी) काय आहे?

टेंडनस, हाडे आणि स्नायूना जोडणारी लिंक आहे. ते मजबूत तंतुमय टिश्यूंचे बनलेले असतात. टेंडनची जळजळ होण्याला टेंडिनोपॅथी म्हणतात. टेंडीनोपॅथी सामान्यतः सांध्या (उदा. खांदे, गुडघा, कोपर, आणि अ‍ॅकल्स) जवळ असलेल्या टेंडन्सला प्रभावित करते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

टेंडिनोपॅथीची लक्षणे दुखापत आणि प्रभावित टेंडनच्या प्रमाणावर अवलंबून असतात. टेंडिनोपॅथीची चिन्हे आणि लक्षणे यात खालील समाविष्ट आहेत:

 • प्रभावित झालेल्या टेंडनभोवती वेदना आणि त्याच्या वापरामुळे अधिक त्रास होणे.
 • प्रभावित टेंडनजवळ किंवा जवळच्या सांध्यात कडकपणा, जो सकाळी किंवा विश्रांतीच्या वेळी अधिक त्रासदायी होतो.
 • प्रभावित टेंडनची ताकद कमी होणे.
 • टेंडनभोवतीच्या भागात लालसरपणा, जळजळ होणे आणि सूज येणे.  
 • प्रभावित टेंडनच्या हालचालींमधून आवाज येणे (क्लिक सारखा आवाज).

याची मुख्य कारणं काय आहेत?

टेंडिनोपॅथीचे मुख्य कारण म्हणजे टेंडनसचा जास्त उपयोग किंवा दुखापत. जखम तीव्र किंवा दीर्घकालीन असू शकते. सहसा, वय होणे, छीज होणे किंवा जास्त वापरल्यामुळे टेंडीनोपॅथी होऊ शकतो. कधीकधी स्नायुंमध्ये टोनच्या अभावामुळे देखील स्नायुंच्या टेंडनवर परिणाम होऊ शकतो आणि यामुळे टेंडीनोपॅथी होतो. जे लोक कष्टकरी शारीरिक काम करतात जसे शारीरिक श्रम करणारे, खेळाडू, व्यायाम शाळेचे शिक्षक किंवा प्रशिक्षक यांमध्ये अधिक वापरामुळे किंवा दुखापतीमुळे टेंडिनोपॅथी विकसित होऊ शकतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

सहसा, टेंडीनोपॅथीचे निदान करण्यासाठी वैद्यकीय इतिहासासह एक संपूर्ण क्लिनिकल तपासणी पुरेशी असते, आणि कोणते टेंडन प्रभावित झाले आहे हे ठरविण्यात देखील मदत करते परंतु उपचार पद्धती ठरवण्याकरिता काही तपासण्या महत्व्याच्या असतात. या तपासण्यांमध्ये खालील समाविष्ट आहे:

 • रक्त तपासणी - व्हिटॅमिन डी 3, कॅल्शियम आणि यूरिक अ‍ॅसिडची पातळी.
 • एक्स-रे - फ्रॅक्चर आणि डिस्लोकेशनसाठी त्या टेंडनच्या आसपासची हाडे तपासणे.
 • अल्ट्रासाऊंड - टेंडनसची जळजळ आणि दुखापत तपासण्यासाठी.
 • मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (एमआरआय) स्कॅन -  दुखापतीची पातळी तपासण्यासाठी सर्वाधिक अचूक तपासणी.

टेंडीनोपॅथीला मल्टिमोडालीटी उपचारांची आवश्यकता असते. सहसा, मौखिक औषधे, थंड संप्रेषण, विश्रांती आणि हळूहळू फिजिकल थेरेपी यांचे मिश्रण टेंडीनोपॅथीच्या उपचारात मदत करतात.

 • तोंडावाटे घेण्याची औषधे - सामान्यपणे, अँटी-इंफ्लॅमेटरी औषधे जसे ॲसीक्लोफेनॅक आणि डायक्लोफेनॅक प्रभावित झालेल्या टेंडनसवरील सूज आणि वेदना कमी करण्यात मदत करतात.
 • थंड संप्रेषण - टेंडनसच्या भोवतालची  जळजळ आणि सूज कमी करण्यास मदत करतात.
 • विश्रांती - जखमा लवकर बऱ्या करण्यात महत्वाची भूमिका बजावते.
 • फिजिकल थेरपी - विश्रांतीच्या प्रारंभिक कालावधीनंतर, सौम्य रेंज ऑफ़ मोशन (आरओएम) इम्प्रूव्हिंग पॅसिव्ह थेरेपी दिली जाते, शक्ती आणि स्नायूचा  टोन सुधारण्यासाठी अ‍ॅक्टीव्ह रॉम व्यायाम त्यानंतर करण्यास सांगितला जातो.
 1. टेंडनची इजा(टेंडिनोपॅथी) साठी औषधे

टेंडनची इजा(टेंडिनोपॅथी) साठी औषधे

टेंडनची इजा(टेंडिनोपॅथी) के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Bjain Ruta graveolens LMBjain Ruta graveolens 0/1 LM39
SBL Ruta graveolens Mother Tincture QSBL Ruta graveolens Mother Tincture Q 98
Espra XnESPRA XN 500MG TABLET 10S104
ADEL 40 And ADEL 86 KitAdel 40 And Adel 86 Kit 499
ADEL 40 Verintex DropADEL 40 Verintex Drop200
ADEL Ruta Graveolens Mother Tincture QADEL Ruta Graveolens Mother Tincture Q 184
ADEL 69 Clauparest DropADEL 69 Clauparest Drop200
ADEL 75 Inflamyar OintmentADEL 75 Inflamyar Ointment340
Schwabe Ruta graveolens CHSchwabe Ruta graveolens 1000 CH96
ADEL 86 Verintex N External DropADEL 86 Verintex N External Drop200
Bjain Ruta graveolens Mother Tincture QBjain Ruta graveolens Mother Tincture Q 199
Omeo Spondyheal DropsOmeo Spondyheal Drops 111
Omeo Injury Relief TabletsOmeo Injury Relief Tablets 599
Schwabe Ruta graveolens MTSchwabe Ruta graveolens MT 68
Schwabe Ruta graveolens LMSchwabe Ruta graveolens 0/1 LM80
Dr. Reckeweg Ruta grav QDr. Reckeweg Ruta grav Q 176
SBL Drops No. 5SBL Drops No. 5 For Cervical Pain112
MinadoMinado 500 Mg/10 Mg Tablet47
NaprodomNaprodom 250 Mg Tablet32
NaxdomNaxdom 250 Tablet44
PandexPandex 500 Mg/10 Mg Tablet56
XenadomXenadom 10 Mg/500 Mg Tablet69
SBL Orthomuv OintmentSBL Orthomuv Gel 60

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. University of Michigan, Michigan, United States [Internet] Tendon Injury (Tendinopathy)
 2. Brett M. Andres, George A. C. Murrell. Treatment of Tendinopathy: What Works, What Does Not, and What is on the Horizon. Clin Orthop Relat Res. 2008 Jul; 466(7): 1539–1554. PMID: 18446422
 3. HealthLink BC [Internet] British Columbia; Tendon Injury (Tendinopathy)
 4. Fan Wu, Michael Nerlich, Denitsa Docheva. Tendon injuries. EFORT Open Rev. 2017 Jul; 2(7): 332–342. PMID: 28828182
 5. Thomopoulos S, Parks WC, Rifkin DB, Derwin KA. Mechanisms of tendon injury and repair. J Orthop Res. 2015 Jun;33(6):832-9. PMID: 25641114
 6. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Achilles tendon rupture - aftercare
और पढ़ें ...