टेनिस एल्बो - Tennis Elbow in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

May 03, 2019

March 06, 2020

टेनिस एल्बो
टेनिस एल्बो

टेनिस एल्बो काय आहे?

टेनिस एल्बो, वैद्यकीयदृष्ट्या लॅटरल एपिकॉन्डिलाइटिस म्हणून ओळखला जातो. यामध्ये कोपरावर सतत आणि अधिक भार आल्यामुळे कोपऱ्याच्या स्नायूंना जोडणाऱ्या टेंडन्सला सूज येते आणि जळजळ होते. टेनिस किंवा इतर श्रमदायी खेळ खेळताना स्नायूंवर सतत ताण येतो त्यामुळे अशी स्थिती होऊ शकते. क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन आणि स्क्वॅशमधील खेळाडूंमध्ये हा एक सामान्य विकार आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

दुर्लक्ष केल्यास टेनिस एल्बोची लक्षणे हळूहळू वाढतात आणि अधिक त्रासदायक होतात. या स्थितीत विकसित होणारी सर्वात सामान्य चिन्हे ही आहेत:

  • कोपराच्या स्नायूंच्या आजूबाजूला आणि बाहेर सतत वेदना होणे.
  • पकड गमावणे.
  • कोपर वापरून करणाऱ्या हालचालींचा समावेश असलेली लहान कार्ये करण्यात वेदना आणि कडकपणा.
  • कोपराच्या स्नायू वर सूज आणि लालसरपणा.

याची मुख्य कारणे काय आहेत?

टेनिस एल्बो विकसित होण्याचे मुख्य कारण कोपऱ्याचे स्नायू वापरून सतत कष्टाची कामे करणे, ज्यामुळे स्नायुबंधकांना नुकसान होते. ही स्थिती विकसित होण्याची इतर कारणे अशी आहेत:

  • खेळ खेळणे, ज्यामध्ये वरील बाहूच्या शक्तीची आवश्यकता असते, उदा. टेनिस, स्क्वॅश.
  • इतर क्रिया जसे की जॅव्हलिन थ्रो, डिस्कस थ्रो आणि बागकाम करणे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर शारीरिक तपासणी करतात आणि कोणत्या कृतीमुळे लक्षणे दिसली याची विचारपूस करतात. टेंडन आणि स्नायूंना कोणतेही नुकसान झाले नाही ना याची पुष्टी करण्यासाठी डॉक्टर काही चाचण्या करण्यास सांगतात जसे:

  • एक्स-रे.
  • एमआरआय स्कॅन.
  • इलेक्ट्रोमोग्राफी (ईएमजी) कोणत्याही तंत्रिकेचे नुकसान तपासण्यासाठी.

या स्थितीसाठी शस्त्रक्रिया आणि गैर-शस्त्रक्रिया दोन्ही उपचार पद्धती उपलब्ध आहेत.टेनिस एल्बोची बहुतेक प्रकरणे शस्त्रक्रिया न करता नियंत्रित केले जाऊ शकतात. उपचार पर्यायांमध्ये खालील समाविष्ट आहे:

  • शारीरिक उपचार.
  • दाहकता कमी करणारी औषधे.
  • कोणतीही श्रमाची कामे टाळणे आणि विश्रांती.

जर स्थिती बिघडली तर अस्थिबंधांवर शस्त्रक्रिया केली जाते आणि खराब झालेले टेंडन दुरुस्त केले जातात. पण, शक्ती पुन्हा मिळविण्यासाठी पुनर्वसन आवश्यक आहे. एकूणच, ही स्थिती इतकी धोकादायक नसते आणि बहुतेकदा शस्त्रक्रिये शिवाय उपचार होऊ शकतात.



संदर्भ

  1. National Health Service [Internet]. UK; Tennis elbow.
  2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Tennis elbow
  3. Buchanan BK, Varacallo M. Tennis Elbow (Lateral Epicondylitis) . [Updated 2019 Jan 20] In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
  4. healthdirect Australia. Tennis elbow. Australian government: Department of Health
  5. HealthLink BC [Internet] British Columbia; Tennis Elbow

टेनिस एल्बो साठी औषधे

Medicines listed below are available for टेनिस एल्बो. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.