अपरिचित अंडकोष - Undescended Testicle in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

May 02, 2019

March 06, 2020

अपरिचित अंडकोष
अपरिचित अंडकोष

अपरिचित अंडकोष म्हणजे काय?

मुलाचे वय सहा महिने असताना जेव्हा अंडकोष वृषणापर्यंत पोहचले जात नाही तेव्हा उद्भवणाऱ्या परिस्थितीला अपरिचित अंडकोष असे म्हणतात. यास क्रिप्टोचिडीझंम असेही म्हणतात.या स्थितीत जन्माच्या वेळी एक किंवा दोन्ही अंडकोष गहाळ असू शकतात. तरुण मुलांमध्ये अपरिचित अंडकोष हे सामान्य आहे. 1% नवजात मुलांमध्ये आणि योग्य वेळेपूर्वी जन्मलेल्या 30% मुलांमध्ये कमीतकमी एक अंडकोष गहाळ असतो. 

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

अपिरिचित अंडकोष असलेल्या मुलांमध्ये प्रभावीत बाजूस लहान किंवा अविकसित वृषण असणे हे एकच लक्षण असते. काही वेळा वृषणात पुरुषांच्या वीर्योत्पादक ग्रंथी नसतात, याला रिक्त वृषण असे म्हणतात. काही मुलांमध्ये अपरिचित अंडकोष आवळल्या जातात किंवा उदरातील तीव्र वेदनेस कारणीभूत ठरतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

अपरिचित अंडकोशाची मुख्य कारणं पुढीलप्रमाणे आहेत:

  • योग्य वेळेपूर्वी जन्म होणे
  • रिट्राक्टिल टेस्टीस (वीर्योत्पादन ग्रंथी वृषण आणि मांडीच्या सांध्यादरम्यान मागे पुढे होणे. )
  • असामान्य वीर्योत्पादक ग्रंथी
  • गर्भाशयात बाळाची वाढ होत असताना अडचण येणे.

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

डॉक्टर सर्वात आधी वृषणाची तपासणी करून एक किंवा दोन्ही अंडकोष नसल्याची खात्री करतात. जर शारीरिक तपासणी अवघड होत असेल तर डॉक्टर नसलेल्या अंडकोशाचे स्थान निश्चित करण्यासाठी इमेजिंग टेस्ट जसे कि सीटी स्कॅन किंवा अल्ट्रासाऊंड यांसारख्या चाचण्या करायला सांगतात.

अपरिचित अंडकोशाच्या बहुतांश प्रकरणांमध्ये वयाच्या पहिल्या वर्षी अंडकोष वृषणात उतरते. जर वीर्योत्पादक ग्रंथी नैसर्गिकरित्या खालील बाजूस उतरत नसतील तर पुढील उपचार केले जातात:

  • हार्मोन इंजेक्शन्स: टेस्टोस्टेरोन किंवा बीटा-ह्युमन कोरियोनिक गोनाडोट्रॉपिन (बी-एचसीजी) हार्मोन इंजेक्शन
  • शस्त्रक्रिया: ओरिओपॉक्सी ही शास्त्रक्रियेसामान प्रक्रिया वृषणात ग्रंथी पुन्हा आणण्यासाठी केली जाते. या शस्त्रक्रियेमुळे भविष्यातील वंध्यत्व आणि वीर्योत्पादन ग्रंथींमधील बिघाड यांसारख्या समस्या टाळता येतात.
  • जर नंतरच्या काळात अपरिचित अंडकोष आढळले तर ते काढून टाकण्याची गरज भासू शकते. जर अंडकोशाचे सामान्यपणे कार्य होत नसेल किंवा कर्करोगाचा धोका असेल तरच अंडकोष काढून टाकले जाते.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Undescended testicle.
  2. Children's Hospital of Pittsburgh [Internet]: UPMC; Undescended Testicle (Testis): Cryptorchidism.
  3. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Undescended Testicle. Harvard University, Cambridge, Massachusetts.
  4. Children's Hospital of Philadelphia [Internet]; Undescended Testes.
  5. Jerzy K. Niedzielski et al. Undescended testis – current trends and guidelines: a review of the literature. Arch Med Sci. 2016 Jun 1; 12(3): 667–677. PMID: 27279862
  6. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Undescended testicles.

अपरिचित अंडकोष चे डॉक्टर