myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

यूरेथ्रल सिंड्रोम काय आहे?

युरीथ्रा एक नलिका आहे जी शरीरातून मूत्र विसर्जित करण्यास मदत करते. यूरेथ्रल सिंड्रोम ही संसर्गा विना  मूत्रमार्गात होणारी सूज किंवा जळजळ आहे. याला लक्षणात्मक अबॅक्टेरियुरिया म्हणूनही ओळखले जाते. हे कोणत्याही संसर्गाशी संबंधित नसते. सर्व वयोगटातील व्यक्ती या रोगजनक विकाराला बळी पडतात परंतु हा बहुतेक स्त्रियांमध्ये आढळतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

चिन्हे आणि लक्षणे युरेथ्रिटिससारखेच असतात. दोन्ही रोगात युरीथ्राची जळजळ होते. युरेथ्रिटिस हा जीवाणू किंवा व्हायरल संसर्गामुळे होतो परंतु यूरे

युरेथ्रल सिंड्रोमचे कारण इतके स्पष्ट नाही.पण  काही सामान्य चिन्हे आणि लक्षणे अशी आहेत:

 • लघवी करतांना वेदना होणे.
 • वारंवार मूत्रविसर्जन.
 • पोटदुखी.
 • लघवी करतांना आग होणे.
 • लघवीला जाण्याची घाई होणे
 • मांडीत सूज येणे.
 • संभोगादरम्यान वेदना होणे.

विशेषत: पुरुषांमध्ये आढळणारी काही चिन्हे खालीलप्रमाणे आहेत:

 • अंडकोषाला सूज.
 • वीर्यात रक्त.
 • जननेंद्रियातून स्त्राव.
 • उत्सर्गा दरम्यान वेदना.

याची मुख्य कारणं काय आहेत?

या रोगाच्या स्पष्ट पुराव्या अभावी यूरेथ्रल सिंड्रोमचे वास्तविक कारण योग्यरित्या ज्ञात नाही आहे. पण काही संभाव्य कारणे खालीलप्रमाणे आहेत:

 • यूरेथ्रल/मूत्रमार्गाला जखम.
 • किमोथेरपी.
 • रेडिएशन.
 • कॅफीन.
 • सुगंधित उत्पादने जसे परफ्यूम, साबण, सॅनेटरी नॅपकिन इ.चा वापर.
 • शुक्राणुनाशक जेलीज.
 • लैंगिक क्रियाकलाप.
 • बाईक चालवणे.
 • डायाफ्राम आणि टॅम्पॉन चा वापर.
 • व्हायरल किंवा जीवाणूजन्य संसर्ग.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

संभाव्य लक्षणांसाठी डॉक्टर ओटीपोटाच्या भागाची शारीरिक तपासणी करतात. रुग्णाचा वैद्यकीय इतिहास गोळा केला जातो. इतर काही चाचण्या देखील केल्या जातात:

 • मूत्राच्या नमुन्याची चाचणी आणि युरेथ्रल स्क्वॅब चाचण्या.
 • ओटीपोटाच्या भागाची अल्ट्रासाऊंड तपासणी.
 • मूत्रमार्गात घातलेल्या पातळ नळीने जोडलेला कॅमेरा वापरुन यूरेथ्रोस्कोपी.
 • लैंगिक संक्रमित रोग (एसटीडी) चाचण्या.

निदानानंतर, रुग्णावर वेगवेगळ्या पद्धतींनी उपचार केले जातात जसे की:

 • शस्त्रक्रिया - मूत्रमार्गात कचरा असला तर हे केले जाते. हे अडथळा दूर करण्यात मदत करते.
 • सुगंधित साबण, लांब बाईक चालवणे वगैरे टाळून काही जीवनशैलीत बदल सुचवले जातात.
 • नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी ड्रग्ससारखी योग्य औषधे निर्धारित केली जातात.
 • जलद सुधारणा आणि पुनरावृत्ती टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छताविषयक काळजी अत्यंत महत्वाची असते.


 

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...