अर्टीकारीया पिगमेंटोसा - Urticaria Pigmentosa in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

May 02, 2019

March 06, 2020

अर्टीकारीया पिगमेंटोसा
अर्टीकारीया पिगमेंटोसा

अर्टीकारीया पिगमेंटोसा काय आहे?

अर्टीकारीया पिगमेंटोसा त्वचेचा विकार असून याची तीव्र खरुज आणि त्वचेचे गडद पॅच ही लक्षणे आहेत.यात त्वचेवर घासल्यावर पित्ताच्या गाठी निर्माण होण्याची प्रवृत्ती असते, जी लाल रंगात वाढते. मुलांमध्ये सामान्यत: हे पाहिले जात असले तरी ते प्रौढांमध्ये देखील आढळू शकते.

याची मुख्य कारणे आणि लक्षणे काय आहेत?

जरी लक्षणे प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न असली, तरी त्वचेवर तपकिरी पॅच मुख्य लक्षण आहे. या एलिव्हेशन्समध्ये  हिस्टॅमिन असते, ज्यामुळे ट्रिगर घटक, पॅचेसला लालसर एलिव्हेशन्स किंवा अडथळ्यांमध्ये बदलतात (डारीर चिन्ह). त्वचेवर स्क्रॅच केल्यावर मुलांमध्ये द्रव-भरलेले फोड दिसून येतात. जलद विकसित होणारा, चेहऱ्याचा लालसरपणा पण दिसू शकतो.   

गंभीर प्रकरणांमध्ये खालील लक्षणे दिसून येतात :

याची मुख्य कारणं काय आहेत?

त्वचेवर अर्टीकारीया पिगमेंटोसाचा मुख्य कारक घटक दाहक पेशी आहे (मास्ट सेल्स - इम्यून सिस्टम सेल्स आपल्या शरीरात हिस्टॅमिन तयार करुन आणि हिस्टॅमिन सोडून संक्रमण करण्यास मदत करतात) . हिस्टॅमिनच्या प्रभावामुळे टिश्यूमध्ये जळजळ होते आणि सूज येते. खालील कारणांमुळे हिस्टामाइन ट्रिगर केले होऊ शकते:

  • व्यायाम.
  • सूर्यकिरणांशी किंवा थंडीशी संपर्क.
  •  मसालेदार अन्न किंवा गरम द्रवपदार्थ किंवा अल्कोहोलचा उपयोग.
  •  त्वचा घासणे.
  •  संसर्ग.
  •  नॉन स्टेरॉइडल अँटी-इंफ्लॅमेटरी ड्रग्स (अ‍ॅस्पिरिन), अ‍ॅनेस्थेटिक्स ड्रग्स, अल्कोहोल असलेली औषधे.

याचे  निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर त्वचेची संपूर्ण तपासणी करुन डारिअरच्या चिन्हाची तपासणी करतात. हे या चाचण्यांद्वारे केले जाऊ शकते:

  •  रक्त तपासणी.
  •  पूर्ण रक्त गणना.
  •  ब्लड ट्रीपटीस (मास्ट सेल्समध्ये उपस्थित असलेले एंझाइम) पातळी.
  •  यूरिन हिस्टॅमिन.
  •  मास्ट पेशींची संख्या तपासण्यासाठी स्किन बायोप्सी.

अर्टीकारीया पिगमेंटोसाच्या व्यवस्थापनात खालील उपचारांचा समावेश आहे:

  •  खाज आणि फ्लशिंगपासून मुक्त होण्यासाठी वैद्यकीय तज्ञाच्या अनुसार अँटीहास्टॅमिनिक औषधे
  •  त्वचेवर कॉर्टिकोस्टिरॉईड्सचे टॉपिकल अप्लिकेशन
  •  मास्ट पेशी स्थिर करण्यासाठी डायसोडियम क्रोमोग्लाइकेटचे व्यवस्थापन, ज्यामुळे शेवटी हिस्टॅमिन कमी होईल.
  •  लाइट किंवा लेसर थेरपी.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Urticaria pigmentosa
  2. British Association of Dermatologists. Urticaria pigmentosa. [Internet] Skin Support
  3. Macri A, Cook C. Urticaria Pigmentosa (Cutaneous Mastocytosis). [Updated 2019 Apr 11]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
  4. British Association of Dermatologists. URTICARIA PIGMENTOSA. [Internet]
  5. National Health Portal [Internet] India; Urticaria

अर्टीकारीया पिगमेंटोसा साठी औषधे

Medicines listed below are available for अर्टीकारीया पिगमेंटोसा. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.