myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

गर्भधारणेच्या दरम्यान योनीतून स्त्राव म्हणजे काय?

गर्भधारणेदरम्यान, योनीतून पांढरा किंवा दूधासारखा, पातळ, सौम्य-गंधयुक्त म्हणजे ल्युकोरोहिया नावाचा स्त्राव वाहतो. हा सामान्य मानला जात असला, तरी त्याचे प्रमाण, पुनुरावृत्ती आणि घनता वेगवेगळी असू शकते. योनीतून वाढलेला स्त्राव गर्भधारणेच्या सुरुवातीच्या चिन्हांपैकी एक असून तो संपूर्ण गर्भधारणेदरम्यान होत असतो. गर्भधारणेच्या शेवटच्या आठवड्यादरम्यान, हा स्त्राव घट्ट कफसारखा असून हे प्रसववेदनेचे लक्षण असते.

कधीकधी, योनीतून वाहणारा स्त्राव हा वेगळ्या रंगाचा आणि इतर लक्षणांसह दुर्गंधीयुक्त असू शकतो. यासाठी फिजिशिअनकडून उपचार करुन घेणे आवश्यक आहेत.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

सामान्य स्रावामध्ये खालील लक्षणांचा समावेश होतो:

 • पातळ किंवा घट्ट कफ.
 • पांढरा किंवा दुधाचा रंग.
 • सौम्य गंध.
 • गर्भधारणेच्या शेवटच्या काळात स्रावाला रक्ताची झाक.

संसर्गित किंवा असामान्य स्रावात खालील बाबींचा समावेश असू शकतो :

 • पिवळा, हिरवा किंवा करडा रंग असू शकतो.
 • तीव्र दुर्गंधी.
 • लाली किंवा खाज.
 • स्त्रीच्या बाह्य जननेंद्रियावर सूज.

याची मुख्य कारणं काय आहेत?

सामान्य योनीतून स्त्रावाच्या मुख्य कारणांमध्ये खालील बाबींचा समावेश होतो:

 • हार्मोनल पातळीत आणि गर्भाशयात बदल (बाळाच्या वाढीसाठी).
 • संसर्ग टाळण्यासाठी शरीरात बदल.
 • गर्भाशयाच्या विरूद्ध दिशेला बाळाच्या डोक्याचा पडणारा दाब (गर्भधारणेच्या शेवटचा काळ).

असामान्य स्त्राव यामुळे होऊ शकतोः

 • संसर्ग, सामान्यपणे बुरशीजन्य संसर्ग.
 • लैंगिक संक्रमित रोग (एसटीडी).
 • गर्भधारणे -संबंधित कॉम्प्लिकेशन, जसे प्लासेन्टा प्राव्हिया किंवा प्लेसेंटल व्यत्यय.
 • एखादी बाहेरची वस्तू शरीरात राहणे (टॅम्पॉन, कंडोम) किंवा सूज (जंतुनाशक, डिओडोरंट्स किंवा स्नेहकांमुळे).
 • गर्भाशयातील एक्टॉपी किंवा पॉलीप्स.
 • ट्यूमर.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

फिजिशियन लैंगिक आणि औषधोपच्या इतिहासासह संपूर्ण इतिहास घेईल. योनी आणि गर्भाशयाचा सखोल अभ्यास, ओटीपोट हाताने दाबून तपासतील आणि आतून आणि बाहेरून पूर्ण तपासणी करतील. शिवाय पुढील चाचण्यांचा  सल्ला दिला जाऊ शकतोः

 • योनि स्रावाची पीएच(पीएच) चाचणी.
 • हाय वेजीनल स्वाब (एचव्हीएस).
 • क्लॅमिडिया, गोनोरिया आणि ट्रायकोमोनिअसिस तपासण्यासाठी ट्रिपल नॅट (एनएएटी) (न्यूक्लिक ॲसिड ॲम्प्लिफिकेशन टेस्ट).
 • क्लॅमिडिया स्क्रीनिंग.
 • एसटीडी (एसटीडी)साठी स्क्रीनिंग.

योनीतून होणाऱ्या स्त्रावाच्या व्यवस्थापनामध्ये प्रतिबंधक तसेच उपचार उपायांमध्ये खालील प्रमाणे आहेत:

 • आरामदायक, सुती कापसी अंडरवेअर वापरुन आणि जननेंद्रियाच्या क्षेत्राला कोरडे ठेवून संसर्ग टाळण्याचा प्रयत्न करावा.
 • योनीचे आरोग्य राखण्यासाठी दही आणि इतर आंबवलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.
 • संसर्गा चा उपचार करण्यासाठी, व्हजायनल क्रीम्स  किंवा सपोझिटरीजचा सल्ला दिला जातो, ज्यामध्ये हे समाविष्ट असू शकतात:
 • फ्लुकोनाझोल.
 • क्लोट्रिमेझोल.
 • मेट्रोनिडाझोल.
 • क्लिंडॅमायसिन 2% क्रीम.
 • इट्राकोनाझोल.

 

 1. गर्भधारणेच्या दरम्यान योनीतून स्त्राव साठी औषधे

गर्भधारणेच्या दरम्यान योनीतून स्त्राव साठी औषधे

गर्भधारणेच्या दरम्यान योनीतून स्त्राव के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Azibact खरीदें
Atm खरीदें
Azibest खरीदें
Azilide खरीदें
Zithrox खरीदें
Azee खरीदें
Azithral खरीदें
Ritolide 250 Mg Tablet खरीदें
Zomycin खरीदें
Azitag खरीदें
Zybact खरीदें
Zycin(Cdl) खरीदें
Zycin खरीदें
Zyro खरीदें
Maxithral खरीदें
Mazz खरीदें
Megamac खरीदें
Miomycin खरीदें
Morzit खरीदें
Nanogram खरीदें
Nazi खरीदें
Nazith खरीदें
Nelzith खरीदें
Atm A खरीदें
Neumazo खरीदें

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Office of Population Affairs. Vaginal Discharge. U.S. Department of Health & Human Services [Internet]
 2. Tânia Maria M. V. da Fonseca et al. Pathological Vaginal Discharge among Pregnant Women: Pattern of Occurrence and Association in a Population-Based Survey . Obstet Gynecol Int. 2013; 2013: 590416. PMID: 23843798
 3. Ross SM, Hoosen AA, Sheik AI. Diagnosis and treatment of vaginal discharge in pregnancy.. S Afr Med J. 1980 Nov 8;58(19):757-9. PMID: 7423322
 4. National Health Service [Internet]. UK; Vaginal discharge in pregnancy.
 5. Bishop GB. Vaginal Discharge. In: Walker HK, Hall WD, Hurst JW, editors. Clinical Methods: The History, Physical, and Laboratory Examinations. 3rd edition. Boston: Butterworths; 1990. Chapter 172.
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें