व्हिटॅमिन बी ची कमतरता - Vitamin B Deficiency in Marathi

Dr. Anurag Shahi (AIIMS)MBBS,MD

May 02, 2019

October 28, 2020

व्हिटॅमिन बी ची कमतरता
व्हिटॅमिन बी ची कमतरता

व्हिटॅमिन बी ची कमतरता म्हणजे काय?

व्हिटॅमीन बी (बी कॉम्प्लेक्स) हा व्हिटॅमिन्सचा समूह आहे ज्यात खालीलचा समावेश आहे :

  • बी 1 (थायामिन).
  • बी 2 (रिबोफ्लॅविन).
  • बी 3 (नियासीन).
  • बी 5 (पॅन्टोथेनिक ॲसिड).
  • बी 6 (पायरीडॉक्सिन).
  • बी 7 (बायोटिन).
  • बी 9 (फॉलीक ॲसिड).
  • बी 12 (कोबालामाइन).

पेशींचे कार्य, मेंदूचे कार्य आणि सेल्युलर चयापचय यासाठी हे सर्व महत्वाचे आहेत. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सिची कमतरता कॉम्प्लेक्स समस्या निर्माण करू शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

अनेक घटकांच्या कमतरतेमुळे व्हिटॅमिन बी ची कमतरतेची लक्षणे मोठ्या प्रमाणात बदलतात. तरीही, बी कॉम्प्लेक्स कमतरतेची काही सामान्य लक्षणं आहे ज्यात खालील समाविष्ट आहेत:

याची मुख्य कारणं काय आहेत?

व्हिटॅमिन बीची कमतरता ही व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये समृद्ध असलेले खाद्यान्न पदार्थ न खाल्यामुळे होऊ शकते. याला प्राथमिक कमतरता असे म्हटले जाते. सेलिआक रोग, क्रोनिक डायरिया, अग्नाशयाचा अपुरेपणा, लिव्हर सिरोसिस, जिआर्डियासिस, स्करियासिस, क्रॉन्स रोग आणि अल्सरेटिव्ह कोलायटिस इत्यादि सारख्या काही रोगांमुळे देखील व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सची कमतरता होऊ शकते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

नैदानिक इतिहासासह एक संपूर्ण वैद्यकीय तपासणी निदान ठरविण्यात मदत करते. त्याचबरोबर, उपचारात्मक मार्ग (लक्षणांसाठी व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स पूरक देणे) व्हिटॅमिन बीच्या कमतरतेचे निदान करण्यात मदत करू शकतात. सीरम व्हिटॅमिन बी1, बी2, बी6, बी9, बी12 ची पातळी, होमोसिस्टीनची पातळी यासारख्या काही रक्त तपासणीसह रक्त पूर्ण तपासणी (CBC) सारख्या काही रक्त चाचण्या   व्हिटॅमिन बीच्या कमतरतेचे निदान करण्यात मदत करण्यास मदत करू शकतात.

व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स युक्त आहार वाढवून किंवा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या तोंडी किंवा इनजेक्टेबल पूरक घेऊन व्हिटॅमिन बी ची पातळी नियंत्रित करून व्हिटॅमिन बीच्या कमतरतेचा उपचार केला जातो.

  • व्हिटॅमिन बी साठी अन्न - अंडी, मासे, लिव्हर इ. व्हिटॅमिन बी चे मांसाहारी स्रोत आहेत; दूध, चीज, हिरव्या पालेभाज्या (जसे पालक, मेथी, काळे इत्यादी), फळे (जसे संत्री, केळी, टरबूज, स्ट्रॉबेरी इ.), द्विदल धान्य, दाणे, बीट आणि ॲव्होकॅडो हे शाकाहारी स्त्रोत आहेत.
  • पूरक: तोंडी किंवा इंजेक्टेबल व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स पूरक कमतरता सुधारण्यासाठी मदत करू शकतात.

 



संदर्भ

  1. healthdirect Australia. B12 deficiencies. Australian government: Department of Health
  2. National Institutes of Health; Office of Dietary Supplements. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Vitamin B12.
  3. Fiona O’Leary, Samir Samman. Vitamin B12 in Health and Disease . Nutrients. 2010 Mar; 2(3): 299–316. PMID: 22254022
  4. National Health Portal [Internet] India; Vitamin B12 Deficiency
  5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Vitamin B

व्हिटॅमिन बी ची कमतरता चे डॉक्टर

Dr. Narayanan N K Dr. Narayanan N K Endocrinology
16 Years of Experience
Dr. Tanmay Bharani Dr. Tanmay Bharani Endocrinology
15 Years of Experience
Dr. Sunil Kumar Mishra Dr. Sunil Kumar Mishra Endocrinology
23 Years of Experience
Dr. Parjeet Kaur Dr. Parjeet Kaur Endocrinology
19 Years of Experience
डॉक्टरांचा सल्ला घ्या

व्हिटॅमिन बी ची कमतरता साठी औषधे

Medicines listed below are available for व्हिटॅमिन बी ची कमतरता. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.