मनगटाचे दुखणे - Wrist Pain in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

April 26, 2019

July 31, 2020

मनगटाचे दुखणे
मनगटाचे दुखणे

मनगटाचे दुखणे म्हणजे काय?

मनगटात दुखणे अंतर्भूत स्थिती किंवा दुखापती चे एक लक्षण असू शकतो.

याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

मनगट दुखण्याचे लक्षणे पुढीलप्रमाणे आहे:

  • सूजणे.
  • नाजूक होणे.
  • जळजळ होणे.
  • पकड शक्ती गमावणे.
  • हाताची हालचाल करतांना आवाज येणे.
  • त्वचेवर घाव होणे.
  • मनगट हलवण्यात अडचण.

याचे मुख्य कारणं काय आहेत?

मनगट खालील कारणांमुळे दुखू शकते:

  • यांत्रिक कारणं.
  • लिगामेंट फाटणे.
  • हाड फ्रॅक्चर होणे.
  • न्यूरोलॉजिक कारणं.
  • कार्पल टनल सिंड्रोम आणि गयोन्स कॅनल सिंड्रोम सारख्या मज्जातंतूला दुखापती. 
  • प्रणालीचे काही कारणं:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

सुमारे 70% प्रकरणात मनगटाच्या वेदनांचे कारण ठरवण्यासाठी व्यक्तीचा तपशीलवार वैद्यकीय इतिहास उपयोगी ठरतो. निदानाची पुष्टी करण्यासाठी अनेक विशेष चाचण्या उपलब्ध आहेत. डॉक्टर औषधोपचार करण्यापूर्वी त्याच्या स्वभाव, वेदना, प्रकृती आणि वेदनानच्या तीव्रतेची तपासणी करण्याचा प्रयत्न करतात. निदान खालील प्रकारे केले जाते:

  • अचानक वेदना झाल्यास, आघात किंवा कामाचा इतिहास ज्यामध्ये एकच प्रकारे हालचाल करणे आवश्यक असते.
  • इमेजिंग तंत्र देखील सुचविले जाऊ शकतात ज्यात हे करावे लागू शकते:
    • सिटी स्कॅन.
    • एमआरआय स्कॅन.
    • अल्ट्रासोनोग्राफी.
    • निदानाची पुष्टी करण्यासाठी डॉक्टर काही विशेष चाचण्या करू शकतात जसे मॅकमुरे चाचणी, वॉटसन चाचणी, सुपिनेशन लिफ्ट चाचणी आणि ग्राइंड चाचणी.

मनगटाच्या वेदनांचे उपचार कारणावर अवलंबून असतात. डॉक्टर खालील गोष्टी सांगू शकतातः

  • दुखापत झाल्यास, मनगटाला विश्रांती देणे सांगितले जाते. सूजलेल्या भागावर बर्फाचे पॅक लावणे आणि मेडिकल दुकानातून औषध घेतल्यावर आराम मिळू शकतो.
  • संक्रामक संधिवात नसल्यास, वेदना कमी करण्यासाठी नियमित मजबुतिचे आणि लवचिकतेचे व्यायाम करण्यास सांगितले जाऊ शकते. पण, सूज असल्यास कोणत्याही प्रकारचे व्यायाम करणे टाळावे.



संदर्भ

  1. Todd A. Forman et al. A Clinical Approach to Diagnosing Wrist Pain. Am Fam Physician. 2005 Nov 1;72(9):1753-1758. American Academy of Family Physicians
  2. Ramsey Sheab et al. Evaluation and Diagnosis of Wrist Pain: A Case-Based Approach. Am Fam Physician. 2013 Apr 15;87(8):568-573. American Academy of Family Physicians.
  3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Wrist pain
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Wrist Injuries and Disorders
  5. Akhondi H, Panginikkod S. Wrist Arthritis. [Updated 2019 Jun 4]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
  6. National Institute of Neurological Disorders and Stroke [Internet] Maryland, United States; Carpal Tunnel Syndrome Fact Sheet.

मनगटाचे दुखणे साठी औषधे

Medicines listed below are available for मनगटाचे दुखणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Medicine Name

Price

₹599.0

Showing 1 to 0 of 1 entries