यॉज - Yaws in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

April 26, 2019

March 06, 2020

यॉज
यॉज

यॉज काय आहे?

यॉज हा संक्रामक रोग आहे जो ट्रिपोनेमा पर्टेन्यू नावाच्या जिवाणूमुळे होतो. हा रोग त्वचा, हाडे आणि सांधे यांना प्रभावित करतो. लागण झाल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर लक्षणं दिसून येतात. कोरड्या हवामानापेक्षा उष्णकटिबंधीय हवामानात यॉजचा धोका जास्त असतो. जिवाणू त्वचेतून शरीरात प्रवेश करतात. यॉजचे जिवाणू सिफिलीस रोगाच्या जीवाणूसारखे दिसतात. यॉज लैंगिकरित्या संक्रमित होत नसला तरी संक्रमित व्यक्तीच्या संपर्काने पसरतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

त्वचेच्या ज्या जागेतून बॅक्टेरिया प्रवेश करतो त्या ठिकाणी एक फोड दिसून येतो. हा सामान्यतः फारसे वेदनादायक नसतो आणि व्यक्तीला खाजवते. मुख्य फोड बरे होण्याआधी किंवा नंतर अनेक फोड विकसित होतात. सुरुवातीच्या काळातील इतर सामान्य चिन्हे आणि लक्षणे खालील प्रमाणे आहेतः

  • हाडांमध्ये वेदना.
  • हाडांना आणि बोटांना सूज.
  • त्वचेवर व्रण.
  • अल्सरचे व्रण आणि वेदनादायक तडे.

सुरुवातीच्या टप्प्यात योग्यरित्या उपचार न केल्यास, हा फोड नंतरच्या टप्प्यावर हाडांच्या रचनेला आणि कार्याला गंभीरपणे प्रभावित करू शकतो.

याची मुख्य कारणं काय आहेत?

यॉज ट्रिपोनेमा पर्टेन्यू नामक सर्पिल आकाराच्या जीवाणूमुळे होतो. जो थेट त्वचेच्या संपर्कांद्वारे एखाद्या संक्रमित व्यक्तीकडून एका निरोगी व्यक्तीकडे प्रसारित होतो. क्वचितप्रसंगी, या जिवाणूने संक्रमित कीटक चावल्याने देखील हा त्रास होऊ शकतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

निदानांमध्ये सामान्यतः शारीरिक तपासणी केली जाते. त्यानंतर डॉक्टर निदानाची पुष्टी करण्यासाठी विविध चाचण्यांची शिफारस करतात. प्रभावित त्वचेच्या आणि जखमांच्या टिश्यूचे सूक्ष्मदर्शी निरीक्षण पहिल्या टप्प्यातील  स्थितीचे निदान करण्यासाठी उपयुक्त ठरते. व्हीडीआरएल चाचणी (VDRL) आणि ट्रॅपेनेमल अँटीबॉडी चाचण्या तिसऱ्या टप्प्याचे निदान करण्यात मदत करतात.

उपचारासाठी डॉक्टर सामान्यत: खालील औषधांची शिफारस करतात:

  • जागतिक आरोग्य संघटनेद्वारे "यॉज निर्मूलन कार्यक्रम" यॉजसाठी मान्यताप्राप्त थेरेपी आहे ओरल अझिथ्रोमायसीन 30 मिलीग्रॅम / किग्रॅम.
  • अझिथ्रोमायसीनला प्रतिसाद न देणाऱ्या व्यक्तीला नसांतून बेंजाथिन पेनिसिलिन दिले जाते.

रोग पूर्णपणे बरा झाला आहे किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी डॉक्टर अँटीबायोटिक थेरपीनंतर चार आठवड्यापर्यंत परीक्षण करतात. यॉज काही काळानंतर परत होणे दुर्मिळ आहे.



संदर्भ

  1. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; Yaws.
  2. National Organization for Rare Disorders [Internet], Yaws
  3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Yaws
  4. National Health Portal [Internet] India; Yaws
  5. Michael Marks et al. Yaws . Int J STD AIDS. 2015 Sep; 26(10): 696–703. PMID: 25193248
  6. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Outcome Predictors in Treatment of Yaws