गरोदरपणात स्तनात वेदना होणे - Breast pain in pregnancy in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 28, 2018

March 06, 2020

गरोदरपणात स्तनात वेदना होणे
गरोदरपणात स्तनात वेदना होणे

गरोदरपणात स्तनात वेदना होणे म्हणजे काय?

ज्या क्षणी तुम्ही गर्भवती होता, तेव्हापासून तुमच्या शरीरात लक्षात न येणारे बदल होऊ लागतात. बहुतेक बदल अंतर्गत स्वरुपाचे असले तरी काही बदल लक्षात येणारे असतात आणि काही बदल अशे असतात जे फक्त अनुभवू शकतो. गरोदरपणात पोट दिसणे शेवटचे चिन्ह असले तरी स्तनाच्या वेदना किंवा संवेदना प्रथम लक्षणीय चिन्हे आहेत.

वेदना व्यतिरिक्त, हे मासिक पाळीच्या अगोदरच्या स्तनातील वेदना सारखेच असते. शिवाय दुखणे, नाजुकपणा आणि जडपणाचा अनुभव होतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

शरीरामध्ये असंख्य बदल पाहता तुम्ही फक्त स्तनात दुखणे ही एक गोष्ट अनुभवाल असे नाही. तुमच्या छातीमध्ये इतर बदल देखील दिसून येतीलः

  • स्तन वाढणे, स्तनाग्र पुढे येणे आणि स्तनमंडळचा भाग विस्तृत होणे.
  • स्तन आणि बाजूचा भाग,त्यातील नसा, स्तनाग्र आणि स्तनमंडळ गडद होणे.
  • स्तनमंडळावर लहान ट्युबरक्लस किंवा ग्लँड्स बनणे. यांना मॉंटगोमेरी ट्युबरक्लस म्हणतात.
  • फार नाजूक आणि संवेदनशील स्तन.
  • गरोदरपणा च्या शेवटच्या महिन्यांमध्ये स्तनाग्रामधून घट्ट, पिवळसर पदार्थाचा स्त्राव होणे.
  • स्तनावर आणि त्याच्या आजूबाजूला स्ट्रेच मार्क्स आणि खाजवणे.

(अजून वाचा: गरोदरपणाच्या पहिल्या आणि शेवटच्या महिन्यातील स्तनामधील बदल)

याची मुख्य कारणं काय आहेत?

बहुतेक गर्भावस्था चिन्हे आणि लक्षणे महिलांमध्ये संप्रेरकांच्या बदलांशी संबंधित असतात जे बाळाच्या काळजी, संरक्षण आणि वाढीसाठी तयार होण्यासाठी दुप्पट कष्ट करतात.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्तनच बाळाच्या जन्माच्या काही महिन्यांनंतर बाळांना पोषण पुरवते. काही किंवा सर्व लक्षणांसाठी पुढील काही कारणे जबाबदार आहेत:

  • प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजेनच्या पातळीमध्ये वाढ.
  • स्तनांमधील रक्त प्रवाह वाढल्यामुळे नसा दिसणे, स्तनाग्र आणि स्तनमंडल गडद होते.
  • चरबीच्या पेशी स्तनामध्ये जमा होतात ज्यामुळे स्तन मोठे होतात आणि म्हणूच स्ट्रेटच मार्क्स होतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

वेदना आणि अस्वस्थतेवर आधारित निदान करता येते. अशा परिस्थितीत डॉक्टर नेहमी औषधोपचार टाळतात आणि स्तनांवर स्थानिक अनुप्रयोगांबद्दल देखील सावधगिरी बाळगतात. धीर धरायचा सल्ला दिला जातो आणि सहनशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करायला सांगतात. यातील काही पद्धती पुढील प्रमाणे आहे:

  • प्रामुख्याने नैसर्गिक, श्वास घेण्यायोग्य कपड्याने बनवलेले ब्रा, जे मापाने मोठे, त्रास न होणारे आणि आरामदायक असतील ते वापरणे.
  • डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच, स्ट्रेटच मार्क्स किंवा खाजपासून टाळण्यासाठी व्हिटॅमिन ई  किंवा इतर सशक्त तेलांचा वापर करणे.
  • चिडचिड आणि नाजुकपणासाठी बर्फ वापरणे.
  • जोडीदारामध्ये संभोगच्यावेळी बदल आणि गरज समजण्याची वृत्ती असावी.



संदर्भ

  1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Breast pain
  2. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Breast pain
  3. The Eunice Kennedy Shriver National Institute of Child Health and Human Development. What are some common signs of pregnancy?. United States Department of Health and Human Services. [internet].
  4. Office on women's health [internet]: US Department of Health and Human Services; Getting a good latch
  5. Family health service. Breast Changes During Pregnancy. Department of health, government of Hong Kong

गरोदरपणात स्तनात वेदना होणे साठी औषधे

Medicines listed below are available for गरोदरपणात स्तनात वेदना होणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Medicine Name

Price

₹56.11

Showing 1 to 0 of 1 entries