गर्भधारणे मधील उच्च रक्तदाब म्हणजे काय?
गर्भधारणेमधील उच्च रक्तदाब (रक्तदाब 140 एम एम एचजी पेक्षा जास्त) गर्भवती स्त्रीच्या (गर्भधारणेच्या 20 आठवडे आधी) लघवीमध्ये प्रोटीन आढळत नसताना 140/90 एम एम एचजी पेक्षा जास्त रक्तदाब असणे. गर्भधारणेच्या 20 आठवड्यानंतर जर लघवीमध्ये प्रोटीन उच्च रक्तदाबासह आढळत असेल तर त्या स्थितीला प्रीक्लॅंपसिया म्हणतात.
याची प्रमुख चिन्हे व लक्षणे काय आहेत?
गर्भधारणेमधील उच्च रक्तदाबाची चिन्हे व लक्षणे प्रत्येक गर्भवती स्त्री नुसार बदलतात, पण त्यातील सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:-
- अचानक वजनात वाढ.
- सूज (एडेमा).
- जास्त काळ डोकेदुखी.
- मळमळ व उलट्या.
- कमी मूत्र विसर्जन.
- पोटदुखी, पोटाच्या वरील उजव्या भागात दुखणे.
- दृष्टी दोष, ज्यामध्ये अंधुक किंवा एक गोष्ट दोनदा दिसते.
याची प्रमुख कारणे कोणती आहेत?
गर्भधारणे मधील उच्च रक्तदाबाची कारणे पुढीलप्रमाणे आहेत:-
- आधीच्या गर्भधारणेमधील उच्च रक्तदाब किंवा गर्भधारणेपूर्वी उच्च रक्तदाब.
- वर्तमान स्थितीत मधुमेह व किडनी चा आजार.
- आफ्रिकन किंवा अमेरिकन किंवा वयाने 20 पेक्षा लहान किंवा 40 पेक्षा जास्त.
- जुळे किंवा तीन मुलांच्या गर्भधारणेच्या वेळेस
याचे निदान व उपचार कसे केले जातात?
डॉक्टर आधी तुमच्या लक्षणांचा इतिहास जाणून घेतात, तसेच तुमचा रक्तदाब मोजला जातो. याचे कारण शोधण्यासाठी पुढील चाचण्या केल्या जातात.
- वारंवार वजन व सूज तपासणे
- रक्त तपासणी
- मूत्र तपासणी प्रोटीन चे प्रमाण तपासण्यासाठी केली जाते.( प्रोटीन च्या उपलब्धतेवर किडनीच्या कार्यातील अडचणी समजू शकतात.)
- यकृत व किडनी यांच्या कार्याच्या चाचण्या
गर्भाच्या आरोग्याची तपासणी खालीलप्रमाणे केली जाते:-
- गर्भाच्या हालचाली च्या चाचणी मध्ये गर्भाच्या हालचाली चे परीक्षण व तपासणी केली जाते.
- ताण विरहित चाचणी ही गर्भातील हालचालींनुसार बाळाच्या हृदयाचे ठोके मोजण्यासाठी केली जाते.
- अल्ट्रासाऊंड सह ताणविरहित चाचणी घेतली जाते, ज्यामुळे गर्भाची वाढ समजून घेणे सोपे होते.
- डॉपलर फ्लो अल्ट्रासाऊंड हा एक अल्ट्रसाऊंड चाचणी चा प्रकार असून यामुळे रक्ताच्या शिरांमधून होणारा रक्तप्रवाह मोजू शकतो.
गर्भधारणेमधील उच्च रक्तदाबाचे उपचार खालीलप्रमाणे केले जातात:-
हे उपचार रुग्णाचा वैद्यकीय इतिहास व संपूर्ण आरोग्य लक्षात घेऊन डॉक्टरांकडून तयार केले जातात. प्राथमिक ध्येय हेच असते की स्थिती अजून बिघडू नये म्हणून प्रयत्न करणे व कॉम्पिकेशन्स टाळणे.
यासाठी खालील उपचार केले जातात:-
- पूर्ण विश्रांती (घरी किंवा हॉस्पिटल मध्ये)
- अँटी हायपर टेंसिव्ह औषधे देणे ज्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट किंवा इतर ड्रग्स असतात जी उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांमध्ये आढळतात.
- गर्भधारणेमधील उच्च रक्तदाबाची बिघडणारी स्थिती किंवा प्रीक्लॅंपसिया ची स्थिती तयार होणे यासाठी वारंवार रक्त व मूत्र चाचण्या करणे.
- फुफ्फुसांची अनियमित वाढ हे अकाली जन्माला आलेल्या बाळांमध्ये दिसून येणारा विकार असू शकतो. फुफ्फुसांच्या वाढीमध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड औषधे वापरली जातात.