मळमळ आणि ओकारी/ उल्टी - Nausea and Vomiting in Marathi

Dr. Nadheer K M (AIIMS)MBBS

December 27, 2018

March 06, 2020

मळमळ आणि ओकारी/ उल्टी
मळमळ आणि ओकारी/ उल्टी

मळमळ आणि ओकारी/ उल्टी काय आहे?

मळमळ आणि ओकारी हे साधारणपणे पोटाच्या रोगाशी संबंधित दिसणारे लक्षणं आहे, काही वेळा जास्त त्रास होतो आणि काही हे औषधाच्या साईड इफेक्ट्समुळे होते. बरेचदा,ही लक्षणं पूर्ण शरीराला भूल /बधिरीकरण केल्यानंतर त्याच्या नंतरचे परिणाम म्हणून दिसून येतात. ओकारी म्हणजे तोंडावाटे पोटातील अन्न बाहेर पडणे तर मळमळ म्हणजे ओकारी होण्याच्या आधी वाटणारी अस्वस्थ भावना. दोन्ही गोष्टी बऱ्या होऊ शकतात, आणि सहसा, त्यामुळे काही गंभीर आरोग्य समस्या उद्भवत नाहीत.

त्याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

मळमळ आणि ओकारी काही रोगांची लक्षणे दाखवतात, पण, मळमळ आणि ओकारी सोबत खालील लक्षणे देखील दिसतात:

याची मुख्य कारणं काय आहेत?

खालील कारणांमुळे मळमळ आणि ओकारी होऊ शकते:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

मळमळ आणि ओकारीसाठी खूप कारणे असू शकतात,म्हणून या लक्षणांचे योग्य कारण शोधून त्याच्यावर योग्य ते उपचार करायला मदत होईल. पूर्ण वैद्यकीय आणि वैयक्तिक इतिहास ही लक्षणं आढळण्याची संभाव्य कारणे शोधायला मदत होते. इतर काही विशेष लक्षणसुद्धा रोगाचे मूळ कारण समजायला मदत करतात. रोगाची स्थिती जाणून घेण्यासाठी इमेजिंगचाअभ्यास, ब्लड टेस्ट किंवा रोगासंबंधित विशिष्ट टेस्ट करून घेतल्या जातात.

बऱ्याच वेळेस, ओकारी आपोआप कमी होते आणि पोटातील सर्व अन्न बाहेर पडल्यावर थांबते परंतु काहीवेळा उपचार घेणे आवश्यक आहे. फक्त मळमळ आणि ओकारीवर उपचार न करता मूळ कारणावर उपचार करावा. खालील उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे.

  • मळमळ आणि ओकारी निवारक औषधे. जर तुम्ही गर्भवती असाल तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे घ्या.
  • वेगामुळे होणाऱ्या मळमळीसाठी प्रतिबंधक औषधे घ्यावी.
  • रिहायड्रेशन उपचारपद्धतीने शरीरातील कमी झालेले पाण्याचे प्रमाण भरून काढणे एकतर तोंडावाटे द्रव पदार्थ देणे किंवा शिरेमधून देणे.
  • काही घरघुती उपचार जसे तोंड़त आल्याचा तुकडा किंवा लवंग ठेवल्याने मळमळ कमी होते.

कमी जेवणे आणि जेवल्यानंतर लगेचच पाणी न पिता थोड्या वेळाने पाणी पिल्याने मळमळ टाळण्यास मदत होऊ शकते. जर ओकारी औषध घेऊन सुद्धा थांबली नाही आणि बऱ्याच वेळपर्यंत होत राहिली, तर लगेचच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.



संदर्भ

  1. Prashant Singh et al. Nausea: a review of pathophysiology and therapeutics. Therap Adv Gastroenterol. 2016 Jan; 9(1): 98–112. PMID: 26770271
  2. Chepyala P,Olden K. Nausea and vomiting. Curr Treat Options Gastroenterol, 2008;11: 135–144. PMID: 18321441
  3. E.Collis. Nausea and vomiting in palliative care. Clinical Review, BMJ 2015; 351. PMID: 26635303
  4. Frese et al. Nausea and Vomiting as the Reasons for Encounter in General Practice. J Clin Med Res. 2011 Feb;3(1):23-9. PMID: 22043268
  5. National Cancer Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Nausea and Vomiting Related to Cancer Treatment .

मळमळ आणि ओकारी/ उल्टी साठी औषधे

Medicines listed below are available for मळमळ आणि ओकारी/ उल्टी. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.