भगंदर (फिस्ट्युला) - Anal Fistula in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

November 21, 2018

March 06, 2020

भगंदर
भगंदर

भगंदर म्हणजे काय?

भगंदर एक लहान चॅनेल  जो कोलन आणि गुदाद्वाराच्या त्वचेच्या दरम्यान तयार होतो. गुदा ग्रंथीमधील पस मुळे भगंदर होतो. गुदाशय ही कोलन आणि गुदा यांच्या दरम्यानची एक नळी आहे ज्यात अनेक गुदा ग्रंथी असतात. या ग्रंथींमधील संसर्गामुळे पस निर्माण होऊ शकतो, जो चॅनल मधून बाहेर पडून गुदात जातो आणि चॅनल तसाच उघडा राहतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

गुदाशयाच्या तोंडाभोवती वेदना आणि जळजळ ही प्रमुख लक्षणे आहेत.आपण खूप वेळ बसून राहिल्यास किंवा आपल्या मलाच्या हालचालीदरम्यान  खूप त्रास होतो. गुदाशयाच्या त्वचेजवळ खराबघाणवास येतो;  पस किंवा शौचात रक्त जाणे; गुदाशयाच्या तोंडावर सूज येणे आणि ती जागा लाल होणे; ताप, थंडी, थकवा आणि आजारपणाची भावना ही इतर काही लक्षणे आहेत.

याची मुख्य कारणं काय आहेत?

सामान्यतः गुदाशयावर फोड आल्याने भगंदर होतात. पस निघून गेल्यानंतर जर हे फोड योग्य प्रकारे बरे झाले नाहीत तर भगंदर होतात. कमी प्रमाणात, क्रॉन रोग, क्षय रोग, डायव्हर्टिक्युलिटिस, संसर्गीत लैंगिक रोग, आघात किंवा कर्करोग यामुळे देखील भगंदर होऊ शकतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

ॲनोरेक्टल लक्षणांचे विस्तृत निरिक्षण आणि वैद्यकीय इतिहास जाणून घेऊन याचे निदान होऊ शकते.ताप, हळवेपणा, सूज आणि लालसरपणा या लक्षणांसाठी डॉक्टर तुमची तपासणी करतात. काही फोडं गुदाशयाच्या त्वचेवर दिसून येतात. शारीरिक तपासणीच्या वेळी फोडाला दाबून पस किंवा रक्ताचा स्त्राव होत आहे का हे तपासले जाते. फिस्ट्युला प्रोब,ॲनोस्कोपी आणि इमेजींग पद्धती (अल्ट्रासाऊंड,एमआरआय किंवा सीटी स्कॅन) चा वापर देखील केला जाऊ शकतो. डिजीटल रेक्टल तपासणी त्रासदायक असूनती करताना पस निघू शकतो. फिस्ट्युला ताबडतोब बंद होऊ शकतात पण त्यातून जर स्त्राव होत असेल तर निदान करणे अवघड आहे.

या उपचारासाठी अद्याप एकही औषध उपलब्ध नाही आहे. भगंदरचा उपचार सहसा शस्त्रक्रियेनेच

केला जातो. ते आपोआप बरे होत नाहीत. उपचारासाठी शस्त्रक्रियेसोबत अँटीबायोटिक्सचा वापर

देखील केला जातो. उपचारासाठी शस्त्रक्रियेचे खालील पर्याय उपलब्ध आहेत:

  • फिस्ट्युलोटोमी
    या प्रक्रियेत संपूर्ण भगंदर कापून त्याला स्वच्छ केले जाते ज्याने तो सपाट भेगे प्रमाणे दिसायला लागतो.
  • सेटन प्रक्रिया
    सेटन नावाचे पातळ सर्जिकल रबर भगंदर मध्ये ठेवले जाते आणि ते दुसर्‍या टोकाशी जोडून एक गोलाकार तयार केला जातो. फिस्टुलाच्या उपचारातील इतर आवश्यक शस्त्रक्रिये सोबत ते बरे होण्यासाठी हा रबर काही आठवडे ठेवला जातो.
  • इतर तंत्र
    इतर पद्धती जसे की डिंकाने भगंदर भरुन काढने, टिश्यू किंवा विशेष प्लगने बरे करणे देखील उपयुक्त ठरतात.
  • पुनर्संरचनात्मक शस्त्रक्रिया
    पूर्णपणे भगंदर बंद करण्याची प्रक्रिया.



संदर्भ

  1. National Health Service [Internet]. UK; Anal fistula
  2. American Society of Colon and Rectal Surgeons [Internet] Columbus, Ohio; Abscess and Fistula Expanded Information.
  3. Cleveland Clinic. Anal Fistula. [internet]
  4. University of Rochester Medical Center Rochester. Anal Fistula. University of Rochester Medical Centre. [internet]
  5. Ramsay Health Care UK. Surgery for Anal Fistula. [internet]

भगंदर (फिस्ट्युला) साठी औषधे

Medicines listed below are available for भगंदर (फिस्ट्युला). Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.