कॅन्सर - Cancer in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS

February 03, 2020

March 06, 2020

कॅन्सर
कॅन्सर
कधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो

कॅन्सर काय आहे?

कॅन्सर पेशींची अवास्तव वाढ सूचित करतो, ज्या स्वतंत्रपणे आणि लवकर वाढतात तेही कोणतेच काम न करता. बहुतेक प्रकारच्या कॅन्सरचे कारण रँडम डीएनए फेरफार असल्याचे मानले जाते.

पण, ट्यूमरमधील सर्व प्रकारच्या पेशी सारख्या नसतात. एका छोटाश्या भागा - सुमारे 1% - मध्ये कॅन्सरच्या स्टेम सेल्स (सीएससी) असतात. सीएससी मानवी शरीराच्या बऱ्याच सामान्य स्टेम पेशींसारखे असतात कारण त्या प्रचंड मोठ्या संख्येने आढळतात आणि स्वत:चे पुनरुज्जीवन करण्याची क्षमता देखील त्यांच्यात असते. या पेशी शरीरात कॅन्सरचा प्रसार करायला आणि विभाजन आणि फरक करून नवीन ट्यूमर पेशी बनवायला मदत करतात.

डब्ल्यूएचओने प्रसारित केलेल्या अहवालानुसार कॅन्सर हे जगातील मृत्यूचे दुसरे सर्वात मोठे कारण आहे.

 

कॅन्सरचे प्रकार

मूळ टिश्यूनुसार, कॅन्सरचे खालीलप्रमाणे वर्गीकरण केले जाते:

 • कार्सिनोमस: कार्सिनोमस हा एपिथेलियल टिश्यूमध्ये मूळ असलेला कॅन्सर आहे. एपिथेलियल टिश्यू म्हणजे त्वचा, आतड्याची आतील बाजू, तोंडातील आतील बाजू किंवा नाकाची आतील बाजू यासारख्या बाह्य किंवा अंतर्गत वातावरणाचा सामना करणार्‍या कोणत्याही अवयवाचे आवरण. हा कॅन्सरचा सर्वात सामान्यपणे नोंदवला जाणारा प्रकार आहे. कार्सिनोमाच्या काही उदाहरणांमध्ये प्रोस्टेट कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर आणि त्वचेचा स्क्वामस सेल कार्सिनोमाचा समावेश आहे.

 • सारकोमस: ही संयोजी टिश्यूच्या उत्पत्तीच्या विकृती आहेत. संयोजी टिश्यू शरीराच्या विविध भागांना आधार देतात आणि जोडतात. उदाहरणार्थ, चरबीयुक्त टिश्यू, एरिओलार टिश्यू, स्नायुबंध, अस्थिबंध आणि हाडे इतरांमधला  कॅन्सर.

 • ल्युकेमिया: ल्युकेमिया म्हणजे पांढर्‍या रक्तपेशींच्या अनियंत्रित वाढीच्या परिणाम स्वरूप होणारा रक्ताचा कॅन्सर. ल्युकेमियाचे चार मुख्य प्रकार म्हणजे लिम्फोसायटिक (तीव्र आणि क्रोनिक) आणि मायलॉईड (तीव्र आणि  क्रोनिक). लिम्फोसायटिक आणि मायलॉईड ल्यूकेमिया या शब्दांमध्ये अस्थिमज्जेत पांढऱ्या रक्त पेशी तयार होण्याच्या परिपक्वताच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असलेल्या पेशींचा कॅन्सरशी संबंद असतो.

 • लिम्फोमा: हे लिम्फ नोड्स आणि लिम्फॅटिक अवयवांचे कॅन्सर असतात. लिम्फ हे मधल्या जागांमध्ये तयार होणार्‍या द्रवपदार्थाचा संदर्भ देते. त्याच्यात लिम्फ वाहिन्यांचे स्वतंत्र जाळे तयार होते आणि शरीराच्या एकापेक्षा जास्त भागात लिम्फ नोड्सचे छोटे पुंजके तयार होतात. लिम्फमध्ये लिम्फोसायट्स असतात, जे इन्फेक्शनशी लढायला मदत करतात. या अवयवांचा कॅन्सर  किंवा लिम्फोमा दोन प्रकारचा आहे - हॉजकीन आणि नॉन-हॉजकिन लिम्फोमा.

या व्यतिरिक्त, शरीराच्या अवयवावर किंवा शरीराच्या भागावर अवलंबून कॅन्सरचे वर्गीकरण खालीलप्रमाणे केले जाऊ शकते:

 • स्तनाचा कॅन्सर

 • गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर

 • तोंडाचा कॅन्सर

 • प्रोस्टेट कॅन्सर

 • गर्भाशयाचा कॅन्सर

 • अंडाशयाचा कॅन्सर

 • रक्ताचा कॅन्सर

 • फुफ्फुसांचा कॅन्सर

 • पोटाचा कॅन्सर

 • हाडांचा कॅन्सर

 • गुदाशयाचा कॅन्सर

 • घश्याचा कॅन्सर

 • यकृताचा कॅन्सर

 • त्वचेचा कॅन्सर

 • मुत्राशयाचा कॅन्सर

 • मेंदूचा कॅन्सर

 • मूत्रपिंडाचा कॅन्सर

 • अंडकोषाचा कॅन्सर

 • स्वादुपिंडाचा कॅन्सर

 • गर्भाशयाच्या अंतःस्तराचा कॅन्सर

 • योनीचा कॅन्सर

कॅन्सरची लक्षणे

प्रभावित अवयवानुसार कॅन्सरची लक्षणे मोठ्या प्रमाणात बदलतात. काही विशिष्ट चिन्हे आणि लक्षणे आहेत जी कॅन्सरच्या प्रकार आणि अवयव यांवर अवलंबून नसून ती कोणत्याही प्रकारात अनुभवले जाऊ शकतातः

 • प्रमाणापेक्षा जास्त वजन वाढणे किंवा कमी होणे

 • अशक्तपणा आणि थकवा जाणवणे

 • त्वचेवर वारंवार जखमा होणे

 • त्वचेखाली एखादी गाठ जाणवणे

 • श्वासोच्छवासाला त्रास होणे आणि एका महिन्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे

 • त्वचेतील बदल, जसे की अस्तित्वात असलेल्या मस किंवा तीळाच्या आकारात बदल होणे किंवा व्रण दिसणे

 • त्वचेवर सहजपणे खरचटणे

 • जुलाब  किंवा बद्धकोष्ठता यासारख्या पचनाच्या समस्या जाणवणे

 • गिळायला त्रास होणे

 • भूक न लागणे

 • आवाजात बदल जाणवणे

 • वारंवार ताप किंवा रात्री घाम येणे

 • स्नायू किंवा सांधे दुखणे आणि जखम भरून निघण्यास उशीर लागणे

 • वारंवार होणारे इन्फेक्शन

 

तुम्हाला यापैकी कोणतेही लक्षण दिसल्यास तुमच्या डॉक्टरांशी बोलले पाहिजे कारण लवकरात लवकर कॅन्सरवर उपचार करून त्यावर नियंत्रण मिळवणे चांगले असते. तुम्ही हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की ही सर्व लक्षणे प्रत्येक जणाला दिसतीलच असं नाही आणि प्रत्येकाला याचा अनुभव अगदी सुरुवातीलाच येईल असेही नाही, अनेकवेळा त्याची तीव्रता वाढल्याशिवाय हे लक्षात येत नाहीत. खरंतर, अनेकांना याची कोणतीही लक्षणे अजिबात जाणवत नाहीत, काही विशेष तपासण्या केल्यानंतरच कॅन्सर असल्याचे लक्षात येते. यात महत्वाचा मुद्दा असा की कोणत्याही अगदी क्षुल्लक लक्षणांकडे देखील दुर्लक्ष होता कामा नये.

 

कॅन्सरची कारणे आणि धोक्याचे घटक

पेशींच्या डीएनएमध्ये काही बदल किंवा फेरफार झाल्यामुळे कॅन्सर होतो. पेशींचा मेंदू मानला जाणारा डीएनए पेशींची वाढ आणि फेरफारासंबंधी सूचना देतो. या सूचनांमधील दोष अनियंत्रित वाढ आणि प्रजनन कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात.

कॅन्सरच्या विकासाला कारणीभूत ठरणाऱ्या पदार्थांना कार्सिनोजेन असे म्हटले जाते, जे कॅन्सरच्या मुख्य कारणांसह इतर धोक्याचे घटक देखील आहेत. ते रासायनिक घटक असू शकतात, उदाहरणार्थ, तंबाखूच्या धुरात आढळणारे पदार्थ; भौतिक, जसे कि अतिनील किरणे; किंवा ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस सारख्या जैविक. कॅन्सरला कारणीभूत ठरण्यासाठी एकाच कार्सिनोजेनला जबाबदार धरले जाऊ शकत नाही. आरोग्य आणि आहार यासारख्या इतर घटकांसह एकाधिक कार्सिनोजेनमुळे एखाद्या व्यक्तीमध्ये कॅन्सरचा प्रादुर्भाव होतो.

धोक्याचे घटक

कॅन्सरचे सर्वसामान्य धोक्याचे घटक पुढीलप्रमाणे आहेत:

 • धूम्रपान किंवा चघळण्याच्या स्वरूपात तंबाखू आणि तंबाखूशी संबंधित उत्पादनांच्या सेवनामुळे फुफ्फुस आणि तोंडाचा कॅन्सर होतो.

 • अल्कोहोलचे वाढते प्रमाण यकृताचा कॅन्सर होण्याच्या धोका अनेकांमध्ये वाढवतो.

 • अस्वास्थ्यकारक आहार आणि फायबर कमी असलेले परिष्कृत पदार्थ खाल्ल्याने कोलन कॅन्सर होतो.

 • टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेनची पातळी वाढवणारे हार्मोन्स अनुक्रमे प्रोस्टेट कॅन्सर आणि स्तनाचा कॅन्सरचा धोका वाढण्याचे घटक आहेत.

 • वाढत्या वयानुसार कोलन कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर, प्रोस्टेट कॅन्सर आणि इतर अनेक प्रकारचे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

 • अनुवांशिक दोष किंवा फेरफारांमुळे कॅन्सरची शक्यता बरीच वाढते उदा. बीआरसीए 1 आणि बीआरसीए 2 जीन्समध्ये झालेल्या फेरफारामुळे स्त्रियांमध्ये स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

 • कुटुंबात कोणाला कॅन्सर झाला असेल तर स्तनासारख्या विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो.

 • रंग, डांबर आणि अँनिलिनसारख्या रसायनांच्या संपर्कात येण्यासारख्या व्यावसायिक धोक्यांमुळे मूत्राशयाच्या कॅन्सर सारख्या विशिष्ट कॅन्सरचा धोका वाढतो.

 • बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे प्रणालीगत विकार उद्भवतात, जे कॅन्सरच्या पूर्वस्थितीत घटक म्हणून काम करतात, उदाहरणार्थ, एच. पायलोरी संसर्गामुळे पोटाच्या कॅन्सर ची वाढ होऊ शकते; हेटायटीस बी आणि सी च्या इन्फेक्शनमुळे यकृताचा कॅन्सर आणि ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस संसर्ग गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते.

 • वारंवार क्ष-किरण किंवा सूर्यप्रकाशापासून किरणोत्सर्गाचे विकिरण झालेल्या हानिकारक अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळेही कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

 • लठ्ठपणा, चरबीचे अत्याधिक सेवन आणि मर्यादित शारीरिक हालचाली हे पुरुष आणि महिला दोघांमध्ये अनेक प्रकारच्या कॅन्सरच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण धोक्याचे घटक आहेत.

 • ताणतणावाच्या दूरगामी परिणामांमुळे कॅन्सरचा धोका अग्रगण्यतेने जाणवत असल्याचे निश्चित केले जाते. व्यतिरिक्त, भूतकाळातील किंवा सध्याच्या वैद्यकीय परिस्थितीमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीला कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.

तुमच्या लक्षात आलेच असेल की यापैकी बहुतेक धोक्याचे घटक, जनुकीय किंवा वय-आधारित असले तरी ते योग्य जीवनशैली आणि इन्फेक्शन आणि प्रदूषकांपासून पुरेसे अंतर राखून टाळता येऊ शकतात. तुमच्या पूर्वजांमध्ये कोणाला कॅन्सर झाला असल्यास किंवा सामान्यत: कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरचा धोका असल्यास, तुम्ही धोका कमी करायला तुमच्या राहणीमानात बदल करणे आवश्यक आहे

कॅन्सरचे निदान

कॅन्सरच्या प्रकारचा संशय, अनुभवलेल्या लक्षणांची तीव्रता आणि मागील तपासणीच्या कोणत्याही निष्पत्तीचा विचार केला जातो. कॅन्सरची शक्यता ठरवायला सर्वसामान्य खालीलप्रमाणे निदान वापरले जाण्याची शक्यता आहे:

 • कोणतीही विकृती शोधण्यासाठी शारीरिक तपासणी 

 • त्या व्यक्तीच्या रक्ताच्या नमुन्याचे प्रयोगशाळेत विश्लेषण (कंप्लीट ब्लड काउंट(CBC ), एरिथ्रोसाइट सेंडिमेंटेशन रेट, सी-रिॲक्टिव प्रोटीन, यकृत आणि मूत्रपिंडाच्या फंक्शन टेस्ट्स आणि बरेच काही).

 • विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरचा संशय असल्यास कॅन्सर अँटिजेन (सीए)19.9, कार्सिनो एम्ब्रिऑनिक अँटिजेन (सीईए) किंवा प्रोस्टेट-स्पेसिफिक अँटिजेन (पीएसए) यासारख्या विशिष्ट तपासण्या डॉक्टरांकडून सुचविल्या जाऊ शकतात.

 • एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय, बेरियम मिश्रित अन्न देऊन केलेली तपासणी, हाडांचे स्कॅन, पीईटी स्कॅन, एसपीईसीटी स्कॅन, यूएसजी इत्यादी इमेजिंग तंत्राचा सल्ला देखील दिला जाऊ शकतो. संदिग्ध ट्यूमरमधून गोळा केलेल्या टिश्यूची बायोप्सी सूक्ष्मदर्शकाखाली ट्यूमरची अवस्था, त्याच्या प्रजननाची तीव्रता आणि ट्यूमरच्या पेशींचे प्रकार ओळखायला केली जाते.

कॅन्सरचे उपचार

कॅन्सरच्या उपचार प्रामुख्याने दोन प्रकारांनी केला जातो:

सर्जिकल पद्धती

यात अनैसर्गिक वाढ किंवा पेशींचा गोळा काढून टाकण्याचा समावेश असतो त्यानंतर वाढलेला भाग काढायला बायोप्सी केली जाते. जेव्हा ट्यूमर शोधून त्याला सहजासहजी काढणे शक्य असते तेव्हा हे उपयोगी ठरते.

शस्त्रक्रिया नसलेली पद्धत

त्यात किमोथेरपीचा समावेश असतो, ज्यामध्ये मूलत: असामान्यपणे वाढलेल्या पेशींच्या गाठी औषधांच्या मदतीने नष्ट करणे आणि रेडिओथेरपीचा समावेश असतो, ज्यात वाढत्या ट्यूमरवर केंद्रितपणे सोडलेल्या गामा किरणांसारख्या किरणांचा वापर करतात.

कधीकधी शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रिया नसलेली पद्धत दोन्हींचा वापर केला जातो. आधी, रेडिओथेरपी किंवा किमोथेरपीद्वारे ट्यूमरचा आकार कमी करण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यानंतर कॅन्सरच्या जखमांचा भाग कापला जातो. शस्त्रक्रियेनंतर, इतर ठिकाणी त्याचा प्रसार टाळायला पुन्हा किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी केली जाते.

इतर उपचार पर्याय हार्मोनल थेरपी, इम्यूनोलॉजिकल ट्रीटमेंट्स, बिस्फॉस्फोनेट्स इ. विशिष्ट कॅन्सरच्या आवश्यकतेनुसार वापरले जातात. उदा. स्तन आणि पुर:स्थ कॅन्सर हार्मोनल थेरपीद्वारे उपचार केल्यास उपयोगी असतात.

कॅन्सरशी संबंधित लक्षणे वाढण्यापासून रोखायला औषधे देखील दिली जातात. यात वैयक्तिक लक्षणे रोखण्यासाठी पेनकिलर, अँटासिडस्, अँटीपायरेटिक्स यांचा समावेश असू शकतो.

बहुतेकदा, वेदनाशामक घेणे हा एकमेव उपचार शक्य असतो, जिथे कॅन्सरमुळे सतत होणारी वेदना आणि अस्वस्थता दूर करण्यासाठी मॉर्फिन किंवा इतर वेदनाशामक औषधांचे पॅच वापरले जातात, कारण कॅन्सर स्वत:च्या व्यापक स्वरूपामुळे नियंत्रित होऊ शकत नाही.

नवीन प्रकारचे उपचार

कॅन्सरच्या उपचाराचे क्षेत्र अत्यंत उदयोन्मुख क्षेत्र आहे. खर्च कमी करायला आणि पुन्हा कॅन्सर होण्याचे टाळायला जवळजवळ दरवर्षी नवनवीन उपचार पद्धती वापरल्या जात आहेत. त्याच्या प्रकारानुसार कॅन्सरचा वारंवारता दर सुमारे सात ते 100 पर्यंत आहे. नवीन संशोधन कॅन्सरच्या पेशींचे कार्य समजून घ्यायला त्यांचे मार्ग शोधण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत जेणेकरुन त्यांची वाढ आणि प्रसार रोखण्याचे सर्वोत्तम मार्ग शोधता येतील. यामध्ये सीएससी मार्कर ओळखायला आणि कॅन्सरच्या विकासामागील विशिष्ट डीएनएतील फेरफार आणि अनुवंशशास्त्र शोधायला सीएससी लक्षित करायला आणि मारून टाकायला विशिष्ट टी पेशी विकसित करण्याच्या कॅन्सरच्या स्टेम सेल्सवरील अभ्यासांचा समावेश आहे.

राहणीमानात बदल

प्रभावित व्यक्तीने फक्त राहणीमानात किरकोळ बदल केल्यास त्याचे जीवन सुधारायला आणि लक्षणे नियंत्रित ठेवायला मदत मिळू शकते. यात खालील बाबींचा समावेश असू शकतो:

 • घरी बनवलेले पौष्टिक अन्न खा

 • नियमितपणे व्यायाम करा. आठवड्यातून 5 दिवस 30 मिनिटांच्या मध्यम जोमदार व्यायामाने मदत होऊ शकते. तुम्ही अति कष्टदायक क्रिया करायला अक्षम असाल तर, 30 मिनिटांच्या झटपट चालण्याने मदत होऊ शकते.

 • तंबाखू आणि मद्यपान टाळा.

 • तुमचे पुढचे मूल्यांकन करायला नियमित आरोग्य तपासणीला जा.

 • योगा करून, ध्यान करून किंवा आवडीने किंवा छंदानुसार ताणतणावावर व्यवस्थित नियंत्रण ठेवा.

 • नेहमी आनंदी, प्रसन्न आणि सकारात्मक रहा. सर्व कॅन्सर असाध्य आणि प्राणघातक नसतात.संदर्भ

 1. National Cancer Institute [Internet]. Bethesda (MD): U.S. Department of Health and Human Services; Risk Factors for Cancer
 2. American Cancer Society [Internet] Atlanta, Georgia, U.S; What Causes Cancer?.
 3. American Cancer Society [Internet] Atlanta, Georgia, U.S; Cancer Staging.
 4. Harsh Mohan: Harshmohan’s textbook of pathology [Internet]
 5. Stuart Ralston Ian Penman Mark Strachan Richard Hobson. Davidson's Principles and Practice of Medicine E-Book. 23rd Edition: Elsevier; 23rd April 2018. Page Count: 1440

कॅन्सर चे डॉक्टर

David K Simson David K Simson Oncology
11 वर्षों का अनुभव
Dr. Nilesh Ranjan Dr. Nilesh Ranjan Oncology
3 वर्षों का अनुभव
Dr. Ashok Vaid Dr. Ashok Vaid Oncology
31 वर्षों का अनुभव
Dr. Ashu Abhishek Dr. Ashu Abhishek Oncology
12 वर्षों का अनुभव
डॉक्टरांचा सल्ला घ्या

कॅन्सर साठी औषधे

कॅन्सर के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।