myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

फोड म्हणजे काय?

एखाद्या अवयवामध्ये किंवा ऊतींमध्ये पस तयार होऊन जमा होण्याला फोड म्हणतात. यात सूक्ष्मजीव, मृत पेशी, द्रव आणि इतर कचरा असतो. हे फोडं शरीराच्या कोणत्याही भागावर होऊ शकतात जसे की चेहरा, तोंड, दात आणि मूत्रपिंड आणि पोटासारखे अवयव, पण त्वचेवरचे फोड सर्वात जास्त कॉमन आहेत.

फोडाचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

 • त्वचेच्या फोडाची सामान्य लक्षणे लालसरपणा, वेदना, सूज आणि पिवळ्या द्रवपदार्थाने भरलेला त्वचेवरील लहान चट्टा आहे.
 • जर तुम्हाला अंतर्गत अवयवांमध्ये फोड असेल तर तुम्हाला त्या भागात वेदना होण्यासोबत संसर्ग झाल्याने ताप येऊ शकतो.
 • जर फुफ्फुसांमध्ये फोड असेल तर व्यक्तीला श्वास घेण्यात त्रास होतो, थकवा जाणवतो आणि खोकला होतो. फोड कुठे झाला आहे त्यानुसार तो विशिष्ट अवयवाच्या कार्यामध्ये व्यत्यय आणू शकतो.
 • तसेच, टॉन्सिल्स जवळ फोड झाल्यास व्यक्तीला बोलायला आणि गिळायला त्रास होतो.

याची मुख्य कारणं काय आहेत?

 • जीवाणू, फंगी आणि परजीवी यांसारख्या इतर सूक्ष्मजीवांमुळे संसर्ग झाल्यास सामान्यतः फोड होते.
 • अवयवांमध्ये एखादी बाहेरील वस्तू शिरल्यामुळे देखील फोड होऊ शकतो.
 • कमकुवत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना फोड होण्याची अधिक शक्यता असते. प्रतिकार शक्ती कमकुवत होण्याची कारणं पुढील प्रमाणे आहेत:
 • फोड इतर कोणत्या रोगाच्या उपस्थितीच होते असे नाही आहे. निरोगी व्यक्तीलासुद्धा फोड होऊ शकतो.
 • त्वचेच्या आतील केस ग्रंथी संक्रमित होऊन त्याच्या भोवती फोड बनू शकतो, याला माणिक असे म्हणतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

 • साध्या वैद्यकीय तपासणीद्वारे तुमचे डॉक्टर त्वचेच्या फोडाचे निदान करू शकतात. पण शरीराच्या इतर भागांवर फोड झाल्यास, त्यांचे कारण जाणून घ्यायला संपूर्ण वैद्यकीय इतिहासाचा अभ्यास आणि तपासणी करणे आवश्यक आहे.
 • जर एखाद्या संसर्गाचा संशय असेल तर, डॉक्टर फोडच्या मध्यभागातील द्रवाची किंवा रक्त तपासणी करायला सांगू शकतात.
 • प्रभावित अवयवाचा एक्स-रे किंवा सीटी स्कॅन त्यावरील डोळ्यांना न दिसणाऱ्या फोडाची उपस्थिती तपासण्यासाठी मदत करते.
 • उपचार फोडाच्या आकार आणि स्थानावर अवलंबून असतो. जर एक लहान त्वचेचा फोड असेल तर अँटीबायोटिक्स आणि हॉट कॉम्प्रेस सारखे घरगुती उपाय पुरेसे असते.
 • अवयवांमध्ये मोठे फोड असल्यास, शस्त्रक्रिया हा उपायचा पर्याय असू शकतो. अ‍ॅनेस्थेशिया देऊन, डॉक्टर फोड फोडून त्यामधील पूर्ण पस काढतात. यासोबत, संसर्ग पूर्णपणे साफ करण्यासाठी अँटीबायोटिक्स दिले जातात.
 • पारंपरिक इन्सेशन आणि ड्रेनेज शस्त्रक्रियामध्ये खूप सुधार झाले आहेत. डॉक्टर शरीराचा भाग आणि फोडाचा आकार यांनुसार शस्त्रक्रिया करतात.
 1. फोड साठी औषधे

फोड साठी औषधे

फोड के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
Schwabe Silicea TabletSchwabe Silicea Biochemic Tablet 200X560
Bjain Silicea LMBjain Silicea 0/1 LM39
SBL Silicea DilutionSBL Silicea Dilution 1000 CH86
ADEL 40 And ADEL 86 KitAdel 40 And Adel 86 Kit 499
ADEL 40 Verintex DropADEL 40 Verintex Drop200
ADEL 61 Supren DropADEL 61 Supren Drop200
Bjain Silicea DilutionBjain Silicea Dilution 1000 CH63
Bjain Silicea TabletBjain Silicea Tablet 12X479
SBL Staphylococcinum DilutionSBL Staphylococcinum Dilution 1000 CH86
Bjain Staphylococcinum DilutionBjain Staphylococcinum Dilution 1000 CH63
ADEL BC 4ADEL BC 4 128
Omeo Dentition TabletsOmeo Dentition Tablets 111
SBL Tarentula hispana DilutionSBL Tarentula hispana Dilution 1000 CH86
SBL Denton SyrupSBL Denton Syrup 52
Schwabe Silicea CHSchwabe Silicea 1000 CH96
ADEL BC 18ADEL BC 18 128
Omeo Calcium TabletsOmeo Calcium Tablets 599
ADEL BC 25ADEL BC 25 128
Bjain Tarentula hispana DilutionBjain Tarentula hispana Dilution 1000 CH63
SBL BC 4SBL BC 4 72
SBL Silicea TabletSBL Silicea 12X Tablet68
Schwabe Silicea LMSchwabe Silicea 0/1 LM80
Schwabe Staphylococcinum CHSchwabe Staphylococcinum 1000 CH96

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Eric vanSonnenberg, Gerhard R. Wittich, Brian W. Goodacre, Giovanna Casola, Horacio B. D'Agostino. Percutaneous Abscess Drainage: Update. March 2001, Volume 25, Issue 3
 2. Antony S1, Cooper RNL. Spontaneous chest abscess caused by Salmonella enterica subspp. arizonae; a rare cause of skin and soft tissue infection in the Desert Southwest. Case report and review of the literature. Infect Disord Drug Targets. 2018 Nov 4. PMID: 30394218
 3. J. Craig Baumgartner, TianXia. Antibiotic Susceptibility of Bacteria Associated with Endodontic Abscesses. Volume 29, Issue 1, January 2003, Pages 44-47
 4. DD Stark, MP Federle, PC Goodman, AE Podrasky. Differentiating lung abscess and empyema: radiography and computed tomography Read More: https://www.ajronline.org/doi/abs/10.2214/ajr.141.1.163. American Journal of Roentgenology. 1983;141: 163-167. 10.2214/ajr.141.1.163
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Abscess
और पढ़ें ...