सारांश

वैश्विकरीत्या, महिलांना ग्रासणारे सर्वांत सामान्य प्रकारचे कर्करोग म्हणजे स्तनांचे कर्करोग. याचे सर्वांत सामान्य लक्षण म्हणजे स्तनामध्ये ढेकूळ निर्माण होणें. तथापी, स्तनाचा कर्करोग असलेल्या प्रत्येक स्त्रीच्या स्तनात ढेकूळ निर्माण होत नाही. स्तनाच्या कर्करोगाची इतर लक्षणे म्हणजे स्तनाच्या त्वचेची पापुद्रे निघणें, स्तनाग्रातून तरळ पदार्थ वाहणें, आणि गळ्यात व काखेत ढेकूळ होणें. वैद्यकीय व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे, स्तनाच्या कर्करोगाचे लवकर निदान होण्याकरिता खूप नाविन्यपूर्ण निदानकारक उपकरणे उपलब्ध आहेत. स्तनाच्या कर्करोगाची चार प्रगतीची चरणे असतात, म्हणून आजाराचे वेळीच निदान योग्य उपचार सुलभ करून, वाचण्याची शक्यता वाढवते. निदानकारक पद्धतींमध्ये मॅमोग्राफीद्वारे स्तनांची छाननी, मॅग्नेटिक रिसॉनॅंस इमेजिंग( एमआरआय) स्कॅन आणि स्तनांमध्ये असलेली द्रव्ये व तंतूची चाचणी सामील असते. जैव तंत्रज्ञानातील नवीन संशोधनांमुळे स्तनाच्या कर्करोगासाठी जनुकीय दोषांना जवाबदार ठरवलेले आहे. प्रोटीन मार्करवरील अभ्यासांनी स्तनाच्या कर्करोगासाठी योग्य उपचाराची दिशा ठरवणें सोपे करून टाकले आहे .

या रोगाचे उपचार पारंपरिक कीमोथेरपी, प्रकाश विकिरण पद्धत आणि हार्मोन थेरपीपासून नाविन्यपूर्ण नॅनो तंत्रज्ञानआधारित पद्धतींद्वारे केले जात आहे. स्तनाचे कर्करोग नियमित व्यायाम, वजनवाढीवर नियंत्रण आणि जन्मापासून कमीत कमी सहा महिने बाळाला स्तनपान करवून टाळले जाऊ शकते. तथापी, स्तनाच्या कर्करोगाचे कुटुंबात पूर्वापार इतिहास असल्याने पुढील पिढींमध्ये त्याचा धोका वाढतो. म्हणून, अशा वेळी, नियमित आरोग्य चाचणी स्तनाच्या कर्करोगाच्या निदानासाठी मदतीची असू शकते. कर्करोगमय तंतूंनी शरिराच्या सामान्य तंतूंमध्ये अतिक्रमण केल्यास गुंतागुंती होतात उदा. शेजारील तंतूंवरील दबावामुळे वेदना होणें, शेजारील रक्तवाहिन्यांमध्ये अडसर होणें इ. तथापी, अधिकतर गुंतागुंती स्तनाच्या कर्करोगावरील उपचाराच्या प्रतिकूल प्रभावांमुळे होतात उदा. केसगळती, उलटी, पांढर्र्या रक्तपेशींच्या संख्येत घट इ. वेळीच निदान आणि योग्य उपचार या घातक आजारातील वाचण्याचे दर वाढण्याची कुंजी आहे. विकिरण, औषधांद्वारे कीमोथेरपी आणि शस्त्रक्रिया उपचाराच्या अजूनही तीन सर्वांत प्रचलित पद्धती आहे, ज्या कर्करोगाच्या पसाराची तीव्रता व प्रमाणावर अवलंबून आहे. 

ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) ची लक्षणे - Symptoms of Breast Cancer in Marathi

स्तनाच्या कर्करोगाचे सर्वांत आधीचे लक्षण स्तनामध्ये ढेकूळ असल्याचे जाणवणें असले, तरी स्तनाच्या कर्करोगाची इतर लक्षणेही असू शकतात. या लक्षणांचे वर्गीकरण स्तनातील ढेकूळाची लक्षणे, स्तनातील ढेकूळाशी संबंध नसलेली लक्षणे आणि स्तनाशी संबंध नसलेली लक्षणे असे केले जाऊ शकते. 

स्तनातील ढेकूळाची लक्षणे  

  • दृश्य किनारी असलेली कडक वाढ.
  • मऊ व गोलाकार वाढ.
  • असामान्य वाढ म्हणून निदान केलेली लहान आकाराची ढेकळे.

स्तनातील ढेकूळाशी संबंध नसलेली लक्षणे  

  • संपूर्ण स्तन किंवा त्याच्या एका भागामध्ये सूज
  • स्तनाग्रे आतमध्ये वळणें
  • दुधाशिवाय इतर पदार्थांची व गर्भावस्था हल्लीच्या काळात नसूनही, स्तनाग्रातून गळती
  •  स्तनाचा लालसरपणा, ढलपेपणा आणि पापुद्रे निघणें.

स्तनाशी संबंधित नसलेली लक्षणे  

  • थकवा
  • श्वास उखडणें.
  • गळ्यात ढेकूळ होणें.
  • भूक व वजनामध्ये निष्कारण घट.

ब्रेस्ट कॅन्सर (स्तनाचा कर्करोग) चा उपचार - Treatment of Breast Cancer in Marathi

स्तनाच्या कर्करोगावर उपचार शक्य आहे, आणि वेळीच निदान व योग्य उपचाराद्वारे, गुंतागुंतींमध्ये मोठा घट येऊ शकतो. ग्रामीण भारतामध्ये आजाराशी मृत्यूचा अनुपात खूप अधिक आहे, म्हणून बेहत्तर आरोग्य जागरूकता आणि वेळीच निदान मृत्यूदर कमी करण्यास साहाय्यकारक आहे.

पारंपरिक उपचार

स्तनाच्या कर्करोगावरील पारंपरिक उपचार म्हणजे स्तन संरक्षण शस्त्रक्रिया, विकिरण पद्धत, कीमोथेरपी आणि हार्मोन थेरपी.

  • स्तन संरक्षण शस्त्रक्रिया
    यामध्ये केवळ स्तनाचे कर्करोगाने प्रभावित भाग काढून कर्करोग कोशिकांचा पुढील पसार टाळला जातो. ते स्थानिक गाठीच्या संदर्भात केले जाऊ शकते, जे शेजारील तंतूंमध्ये पसरले नसेल. म्हणून, स्तनाचे प्रभावित भाग शस्त्रक्रियेद्वार काढणें कर्करोगाची पुढील वाढ  टाळण्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. या प्रकारच्या शस्त्रक्रियेमध्ये, स्तनातील निरोगी तंतू न काढले जाऊन स्तनाचे संरक्षण होते. कर्करोगाचा व्यापक पसार असलेल्या बाबतीत, स्तन संपूर्णपणें काढणें आवश्यक असू शकते. अशा बाबतीत, स्तन प्रत्यारोपणाच्या वापराद्वारे, स्तन पुनरुत्थान शस्त्रक्रिया करून शारीरिक पाहणी पुनर्प्रस्थापित केली जाऊ शकते.
  • विकिरण पद्धत
    शस्त्रक्रियेनंतर, त्या भागावर विकिरणाद्वारे कर्करोगाच्या कोशिका नष्ट करून उपचार केले जाते.तथापी, त्याचे विशिष्ट सहप्रभाव असून, उपचार केलेले भाग संवेदनशील, लाल आणि आर्द्र होऊ शकते
  • कीमोथेरपी
    यामध्ये तोंड किंवा इंजेक्शनद्वारे विविध कर्करोगरोधी औषधांची पद्धतशीर मात्रा दिली जाते. उपचाराचा काळावधी स्तनाच्या कर्करोगाची तीव्रता व टप्प्यावर अवलंबून असतो.

सहायक पद्धत

यामध्ये कर्करोगाच्या वाढीस संप्रेरक हार्मोनचे संतुलन किंवा निवारण करण्यासाठी अंतःस्रावसंबंधी उपचार केले जाते.

स्तनाच्या कर्करोगामधील नाविन्यपूर्ण पद्धती

  • नॅनो तंत्रज्ञान योग्य औषधाची नॅनो आकारात मात्रा देऊन अपार अचूकेतेने कर्करोग कोशिका लक्षण करण्यासाठी एक यशस्वी तंत्रज्ञान ठरलेले आहे.
  • न्युक्लिक आम्ल तंत्रज्ञान एक अन्य पद्धती आहे, ज्यामध्ये कर्करोगकारक जनुकांचे कार्य विशिष्ट औषधे वापरून नगण्य केले जाते.

इम्युनोमॉड्युलेशन

यामध्ये कर्करोग कोशिकांविरुद्ध प्रतिरोधप्रणाली सशक्त करण्यासाठी सायटोकिनचे( प्रतिरोधप्रणालीद्वारे उत्सर्जित रसायने) वापर केले जाते.

नैसर्गिक औषधे

विशिष्ट भाज्यांमधून मिळवलेल्या सर्कुमिन, गॅलॅट्स, लायकोपीन सारख्या वनस्पतीजन्य नैसर्गिक पदार्थांचे वापर स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारामध्ये लाभकारक ठरले आहे. 

जीवनशैली व्यवस्थापन

भारतातील जवळपास 45% प्रकरणांची माहिती स्तनाच्या कर्करोगाच्या मॅटास्टॅटिक चरणात होते. जीवनशैलीतील काही बदल स्तनाच्या कर्करोगाच्या व्यवस्थापनामध्ये फायद्याचे ठरतात, उदा.:

  • वजन व्यवस्थापन.
  • वसा असलेले खाद्य पदार्थ टाळणें.
  • नियमित व्यायाम
  • मद्यपान टाळणें.
  • जन्मापासून एका वर्षापर्यंत बाळाला स्तनपान देणें
  • स्तनाचे नियमित परीक्षण
  • ऍंटिऑक्सिडेंट पदार्थ प्रचुर असलेले निरोगी व संतुलित आहार घेणें.
myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Energy & Power Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for problems like physical and sexual weakness and fatigue, with good results.

Dr. Akash Dhuru

Oncology
10 Years of Experience

Dr. Anil Heroor

Oncology
22 Years of Experience

Dr. Kumar Gubbala

Oncology
7 Years of Experience

Dr. Patil C N

Oncology
11 Years of Experience

Medicines listed below are available for ब्रेस्ट कॅन्सर. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

OTC Medicine NamePack SizePrice (Rs.)
Letoval Tablet5 Tablet in 1 Strip193.69
Mexate 7.5 Tablet4 Tablet in 1 Strip45.7152
Schwabe Badiaga Dilution 200 CH30 ml Dilution in 1 Bottle89.25
Schwabe Badiaga Dilution 30 CH30 ml Dilution in 1 Bottle76.5
Armotraz Tablet10 Tablet in 1 Strip657.2
SBL Badiaga Dilution 1000 CH30 ml Dilution in 1 Bottle128.25
Schwabe Badiaga Dilution 1000 CH30 ml Dilution in 1 Bottle102.0
Altraz Tablet14 Tablet in 1 Strip769.5
SBL Badiaga Mother Tincture Q30 ml Mother Tincture in 1 Bottle255.0
Fertolet Tablet5 Tablet in 1 Strip39.84
Read more...
Read on app