चँडलर सिंड्रोम काय आहे?

चँडलर सिंड्रोम ही डोळ्यांची एक असा विकार आहे ज्यात कॉर्नियाला सूज येतो, बुबुळात विद्रूपता आणि डोळ्यांत असामान्य उच्च दाब निर्माण होतो. इरिडोकॉर्नल सिंड्रोम नावाच्या डोळ्याच्या विकृतींमध्ये याचा समावेश होतो. यात कॉर्नियल एन्डोथेलियम (कॉर्नियाचा पातळ ऊतक) अब्नॉर्मल होतो आणि 'ठोकलेल्या चांदी' सारखा दिसतो. हे पुरुषांपेक्षा महिलांना अधिक प्रभावित करते आणि ते तरुण व मध्यमवयाच्या प्रौढांमध्ये सामान्य आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे पुढील प्रमाणे आहेत:

  • अंधुक दृष्टी.
  • कॉर्नियाला आलेली सूज.
  • असामान्य बुबुळ.
  • प्रकाशाच्या सभोवताली इंद्रधनुषी तेजोवलय दिसणे.
  • अरुंद दृष्टी.

डोळ्याचे बुबुळ (प्युपिल) त्याच्या सामान्य स्थितीपासून विस्थापित होतो आणि ते माप आणि आकारात विकृत दिसते. इतर डोळ्याच्या विकारांच्या तुलनेत यात आयरिस ची ही विकृती माइल्ड असते. असामान्य कॉर्नियल एन्डोथेलियम मध्ये कॉर्नियाचा मागील भाग ठोकलेल्या चांदीच्या पृष्ठभागासारखा दिसतो.

आयरिडोकॉर्नल सिंड्रोमच्या इतर दोन प्रकारांमध्ये समान लक्षणे दिसून येतात, उदा:

  • प्रोग्रेसिव्ह आयरिस ॲट्रोफी.
  • कोगन-रीझ सिंड्रोम.

चँडलर सिंड्रोम असलेल्या रुग्णांमध्ये ग्लॉकोमा किंवा वाढलेला दाब 82% जास्त असतो.

याची मुख्य कारणं काय आहेत?

अचूक कारण अद्याप अज्ञात आहे. काही लोकं सूज किंवा क्रोनिक व्हायरल इन्फेक्शनला याचे कारण मानतात. एंडोथेलियलचा पृष्ठभाग सामान्यतः कॉर्नियापासून अक्वियस ह्युमर (कॉर्निया आणि लेन्सच्या समोर भरलेला स्पष्ट, पाण्यासारखा द्रव) पंप करतो. जेव्हा ही क्रिया अयशस्वी होते तेव्हा कॉर्नियामध्ये द्रव संचय होतो आणि परिणामी दृष्टी अंधुक होते. यामुळे ग्लॉकोमा होऊ शकतो, ज्यामुळे डोकेदुखी  होते आणि दृष्टी अस्पष्ट होते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

या अवस्थेत सामान्यपणे काळजीपूर्वक मूल्यांकन आणि निदान करण्यासाठी पूर्ण नेत्र तपासणीची आवश्यकता असते. सहसा, एकपक्षी, सेकंडरी अँगल-क्लोजर ग्लॉकोमा नावाचा आजार असलेल्या रुग्णांना चँडलर सिंड्रोमची बाधा होते. विश्लेषण करुन इतर कोणताही आजार नाही आहे याची पुष्टी करायला डिफरंशियल डायग्नॉसिस केले जाते. विशिष्ट चाचण्यांमध्ये खालील समाविष्ट आहेः

  • गोनीओस्कोपी.
  • इंट्राओक्युलर प्रेशर आणि कॉर्नियल थिकनेस चे मापन.
  • दृष्टीच्या क्षेत्राची चाचणी.
  • ऑप्टिक नर्व्ह इमेजिंग.

डोळ्यातील सूज आणि दाबाचे मूल्यांकन करण्यासाठी ग्लॉकोमच्या मूल्यांकनाचा सल्ला दिला जातो.

उपचार हा डोळ्यातील सूज,ज्यामुळे डोळ्यात दाब वाढतो, कमी करण्यावर केंद्रित असतो. प्रथम-औषध उपचार म्हणून टॉपिकल औषधे वापरली जातात. डोळ्यातील सूज कमी करण्यासाठी आयड्रॉप सांगितले जाऊ शकतात. सौम्य कॉन्टॅक्ट लेन्स आणि हायपरटॉनिक सलाईन सोल्यूशनच्या वापराने सौम्य प्रकरणे बरी केली जाऊ शकतात.

सर्जिकल पद्धतींमध्ये खालील समाविष्ट आहे:

  • डोळ्यातील दाब कमी करण्यासाठी ट्रॅबेक्युलेक्टॉमी.
  • कॉर्नियल ट्रान्सप्लांट (कॉर्निया चे प्रत्यारोपण).

विकाराचे परिणाम कॉम्प्लिकेशन किती आहे यावर अवलंबून असतात. आणि निदानाला लागणारा वेळ आणि उपचाराचे यश किंवा अपयश कॉम्प्लिकेशन किती वाढतील हे ठरवतात. ग्लॉकोमा तज्ञ परिस्थितीचे योग्य मूल्यांकन करुन दृष्टी सुधारण्यासाठी आणि चांगले परिणाम मिळवण्यासाठी उपाययोजना तयार करू शकतात.

स्वतःची काळजी घेण्यासाठी या टीप्स उपयोगी ठरतील:

  • डोळ्यांना होणार ताण टाळा.
  • योग, ध्यान आणि मनोरंजक ॲक्टिव्हिटीज डोळ्यांचा ताण कमी करतात.
  • नियमित व्यायाम केल्यामुळे दृष्टी दाब कमी होतो आणि दृष्टी गमावण्याची शक्यता कमी होते.
  • व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी, जस्त, तांबे आणि सेलेनियम यांचा समावेश असलेला पूरक आहार डोळ्यांसाठी आवश्यक आहे.
  • रोगाचे प्रसरण टाळण्यासाठी नियमित नेत्र तपासणी करणे आवश्यक आहे.
Read more...
Read on app