लांब जंताचा (टेप कृमी) संसर्ग म्हणजे काय?

लांब जंत हे सपाट कीटक मानव किंवा प्राण्यांचा आतड्यांमध्ये असतात. जेव्हा लांब जंत मानवी शरीरात कोणत्याही माध्यमातून प्रवेश करतात, त्यांच्यापासून विविध लांब जंताच्या संसर्गाने उद्भवणाऱ्या शारीरिक समस्या होऊ शकतात.

हे लांब जंत त्यांचे अंडी किंवा लार्व्हाच्या माध्यमातूनही व्यक्ती्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

  • लांब जंताच्या संसर्गाचे प्रथम निदर्शनास येणारे लक्षण म्हणजे मळमळ व उलटी. याचसोबत काहींना अशक्तपणा, थकवा आणि अतिसारासोबत तापही येऊ शकतो.
  • सहसा यामुळे भूक कमी होते. याउलट खूप भूकही जाणवू शकते (सामान्य भुकेपेक्षा जास्त).
  • जर या कीटकांचे शरीरात एका भागातून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झाले तर अशा स्थितीत डोकेदुखी आणि न्यूरॉलॉजिकल समस्या जसे की गंभीर सीझर्स यांसारखे लक्षणे दिसू लागतात.
  • रूग्णामध्ये कीटकांनी सोडलेल्या ॲलेर्जन्समुळे ॲलर्जिक प्रतिक्रिया आणि चट्टे ही होऊ शकतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

  • लांब जंत हे मानवी शरीरात बैल किंवा डुकराचे मांस यांच्या माध्यमातून प्रवेश करतात. मानवी शरीरात प्रवेश करणाऱ्या लांब जंताच्या सोर्सवर आधारित याचे सहा प्रकार आहेत.
  • संक्रमित प्राण्यांचे कच्चे आणि अर्धवट शिजवलेले मांस खाणे किंवा दूषित पाणी पिल्याने संसर्ग होऊ शकतो.
  • संक्रमित व्यक्तीने बनवलेले अन्न खाल्ल्यानेही संसर्ग होऊ शकतो.
  • वैयक्तिक अस्वच्छता जसे की हात स्वच्छ न धुणे आणि अस्वच्छ हातांनी जेवण बनवणे यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

  • जर तुम्हाला लांब जंता चे लक्षणे जाणवत असतील तर मलातील अंडी किंवा कीटक तपासण्यासाठी स्टूलचा नमुना घेतला जातो.
  • काहीवेळा संसर्ग झालेला असतानाही जर कीटक नमुन्यात नसतील तर अनेक नमुने घेतले जातात.
  • जर तुमच्या पोटात सूज किंवा संशयित कोष असतील तर अशा विशेष स्थितीत निदानासाठी सीटी स्कॅन किंवा एमआरआय ही केला जातो.
  • जर शरीरात संसर्ग असेल आणि लांब जंत विरुद्ध अँटीबॉडी तयार होत असतील तर रक्त चाचणीही केली जाते.
  • काहीवेळा लांब जंत शरीरात असतानाही एकही लक्षण दिसून येत नाही.
  • या संसर्गावर विशिष्ट औषधे दिली जातात. औषधांचा कोर्स पूर्ण करणे महत्वाचे असते.
  • जर सूज किंवा वेदना होत असतील तर अल्बेंडाझोल सारख्या कीटकांची अंडी नष्ट करणाऱ्या अँटी हेल्मीन्थिक औषधांसोबतच इतर संसर्गास रोखणारी औषधेही दिली जातात.
  • गंभीर प्रकरणांमध्ये जर यकृत किंवा फुप्फुसांना गंभीर संसर्ग झाला असेल तर शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकणे आवश्यक असते.
  • पुन्हा संसर्ग होण्यापासून टाळण्यासाठी प्रत्येक रूग्णाने योग्य वैयक्तिक स्वच्छता राखणे आणि योग्य आहार घेणे गरजेचे असते.

Dr Rahul Gam

Infectious Disease
8 Years of Experience

Dr. Arun R

Infectious Disease
5 Years of Experience

Dr. Neha Gupta

Infectious Disease
16 Years of Experience

Dr. Anupama Kumar

Infectious Disease

Medicines listed below are available for लांब जंताचा (टेप कृमी) संसर्ग. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

OTC Medicine NamePack SizePrice (Rs.)
Schwabe Chelone glabra Dilution 6 CH30 ml Dilution in 1 Bottle72.25
Dr. Reckeweg R56 Worms Drop22 ml Drops in 1 Bottle285.0
Schwabe Kousso Dilution 200 CH30 ml Dilution in 1 Bottle85.0
Schwabe Chelone glabra Dilution 30 CH30 ml Dilution in 1 Bottle76.5
Schwabe Chelone glabra Dilution 12 CH30 ml Dilution in 1 Bottle102.0
Baksons B27 Worms Drop30 ml Drops in 1 Bottle166.5
Cipzer Itrifal-E-Deedan 125 gm125 gm Itrifal in 1 Bottle449.0
Dr. Wellmans Improvex Tonic for Children30 ml Drops in 1 Bottle127.5
Schwabe Kousso Dilution 30 CH30 ml Dilution in 1 Bottle72.25
Schwabe Filix mas Dilution 200 CH30 ml Dilution in 1 Bottle89.25
Read more...
Read on app