लहान मुलांमधील मायग्रेन (अर्धशिशी) काय आहे?

सर्वसाधारणपणे आपल्याला असे वाटते की मायग्रेन फक्त मोठ्या माणसांनाच होते परंतु लहान मुलांना सुद्धा मायग्रेन त्रास होतो. 5 टक्क्यांपेक्षा जास्त शाळकरी मुलांमधे ही तक्रार आढळून आली आहे. मायग्रेन म्हणजे वरचेवर उद्भवणारी तीव्र डोकेदुखी. मायग्रेनची इतरही अनेक लक्षणे असतात परंतु तीव्र डोकेदुखी हे सगळ्यात जास्त अनुभवास येणारे लक्षण आहे.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

डोकेदुखी या प्रमुख लक्षणाव्यतिरिक्त, मुलांमधील मायग्रेनची इतर लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

  • मळमळ आणि पोटशूळ.
  • प्रकाश, आवाज आणि वास यांसाठी संवेदनशीलता.
  • सुस्ती.
  • निस्तेजपणा आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे.
  • खूप घाम येणे आणि तहान लागणे.

याची प्रमुख कारणं काय आहेत?

मायग्रेनची सर्वसाधारण कारणं किंवा त्याचा उगम शोधून काढणे तसे कठीण आहे. काही सामान्य कारणं पुढीलप्रमाणे असू शकतात

  • मेंदूमधे सिरोटॉनीन नावाच्या रसायनाची कमतरता.
  • दारू.
  • मोनोसोडियम ग्लुटामेटयुक्त अन्नपदार्थांचे सेवन.
  • साखर आणि कॅफेन.
  • मेवा आणि शेलफिश.
  • काही विशिष्ट दुग्धपदार्थ.
  • मानसिक ताण आणि चिंता.
  • अपुरे अन्न-पाणी किंवा अपुरी झोप.
  • प्रखर प्रकाश.
  • खूप वेळ संगणकावर काम.
  • उग्र वास.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

याचे निदान करण्यासाठी डॉक्टर काही सामान्य प्रश्न विचारतात, जसे की मायग्रेन कधी जाणवतो आणि डोक्याचा कोणता भाग दुखतो, मायग्रेन सुरू व्हायच्या आधी किंवा डोके दुखत असताना काही आवाज किंवा डोळ्यासमोर काही दिसते का, मायग्रेनची तीव्रता किती आहे इत्यादि.

इतर आरोग्यविषयक तक्रारी नाहीत ह्याची खात्री करण्यासाठी टेस्ट केल्या जाऊ शकतात. शारिरीक तपासणीसह तपशीलवार न्यूरॉलॉजीक मूल्यांकन केले जाते. मुलांमध्ये ताप, मान आखडणे, मज्जातंतू विकृती, ऑप्टीकल डिस्कला सूज किंवा असिमेट्रीक चिन्हं (शरीराची एकच बाजू दुखणे) असल्यास इतरही टेस्ट्स केल्या जातात. मायग्रेनचे कारण रोगनिदानविषयक नाही ना हे तपासण्यासाठी प्रसंगी इलेक्ट्रोएनसेफॅलोग्राफी (EEG) सुध्दा केली जाते.

सौम्य मायग्रेन असल्यास सर्वसाधारणपणे विश्रांती, ताण टाळणे तसेच मायग्रेनच्या वेळांवर लक्ष ठेवणे इत्यादी गोष्टी डॉक्टर्सकडून सुचवल्या जातात. मुलांना मायग्रेनचा त्रास सुरू झाल्यास त्याला गर्भस्थितीत (डाव्या कुशीवर झोपून पाय पोटाशी घेणे) झोपवण्याची सूचना दिली जाते. गरज पडल्यास वेदनाशामक औषधे दिली जातात. काहीजणांच्या बाबतीत पूर्ण विश्रांती आणि सम्मोहन शास्त्राचा पण उपयोग होतो. एमएसजी आणि सायट्रीक ॲसिडयुक्त अन्न वगळणे इत्यादी बदल आहारात केले जातात. ज्याना प्रवास किंवा गतीमुळे मायग्रेनचा त्रास होतो त्याना योग्य औषधोपचार दिले जातात.

अती तीव्र मायग्रेनच्या प्रकरणांमध्ये ट्रिप्टान नावाच्या औषधाची गरज भासू शकते.

Siddhartha Vatsa

General Physician
3 Years of Experience

Dr. Harshvardhan Deshpande

General Physician
13 Years of Experience

Dr. Supriya Shirish

General Physician
20 Years of Experience

Dr. Priyanka Rana

General Physician
2 Years of Experience

Read more...
Read on app