myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

सारांश

चिंताविकार अशी एक तीव्र भावना आहे,जी शारीरिक बदलांसह शरीराच्या प्रतिकारप्रणालीला कमजोर करते. चिंताविकाराचा सामान्यत: एकच प्रकार अनुभवला जातो किंवा तीन प्रकार एकत्रितपणे अनुभवलेजातात:चिंताविकार, अनिवार्य झपाटलेपणाची विकृती व इतर संबंधित अवस्था, मानसिक आघात आणि मानसिक तणावा संबंधित चिंताविकार. हा विकार सौम्य, मध्यम, तीव्र आणि उच्चतम अशा भिन्न पातळींवर  असू शकतो. चिंताविकार होण्याची कारणे प्रामुख्याने भावनिक व वैद्यकीय समस्या, विशिष्ट आजार, मद्यपान आणि मादक पदार्थांचे अतिसेवनही आहेत. शिवाय, कौटुंबिक इतिहास हा चिंताविकारामागील महत्वाचा घटक आहे. लक्षणांमध्ये छातीतील धडधड(हृदयाच्या ठोक्यांचा गतीत वाढ)वाढणे,घाबरण्याची भावना येणे, खूप घाम येणे, मळमळ होणे व गुंगी येणे, आणि झोप न येणे यांचा समावेश असतो.औषधे आणि समुपदेशन, हे दोन्ही एकत्रितपणे करणे ही उपचारांची सर्वमान्य पद्धत आहे. सावध रहण्यासह जीवनशैलीत सुधारणा करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण चिंताविकार उलटून परतीने येण्याची शक्यता अधिक असते. चिंताविकाराच्या गुंतागुंतींमध्ये वागणुकीतील समस्या उदा. एकाग्रतेची कमतरता असणे आणि कार्य पूर्ण करण्यात असमर्थ असणे,इतर शारीरिक आजार जसे हृदयविकाराची समस्या असणे,अनिद्रा आणि अपचनाच्या समस्या होणे,मानसिक आरोग्य समस्या जसे फोबिआ होणे,आत्महत्येची प्रवृत्ती तयार होणे आणि अतिरेकी झटके येणे यांचा समावेश होतो.

 1. Anxiety symptoms
 2. Anxiety treatment
 3. What is anxiety?
 4. Anxiety साठी औषधे
 5. Anxiety चे डॉक्टर

Anxiety symptoms

चिंताविकारांमधे विस्तृत लक्षणं अनुभवास येतात. विविध प्रकारातविविध गुंतागुंती आहेत आणि प्रत्येक प्रकार वेगळ्याच स्वभावाचा आहे. अन्य प्रकारांतील चिंताविकारांच्या काही व्यापक लक्षणांमध्ये निद्रेत व्यत्यय येणे, छातीत धडधड होणे, श्वासोच्छ्वास थांबणे, अति-अस्वस्थपणा, हातात आणि पायांत गुदगुल्या होणे, घाम येणे, गुंगी येणे व मळमळणे, आणि स्नायूंचा ताठरपणा यांचा समावेश होतो.

Anxiety treatment

चिंताविकारावर उपचार करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. जेव्हा दोन्ही एकत्रितपणे वापरले जातात तेव्हा सर्वोत्तम परिणाम दिसतात.

 • पुरावा-आधारित उपचार
  हे औषधोपचार 'संवाद उपचार'म्हणूनही ओळखले जातात कारण यात रुग्णाशी संवाद साधला जातो आणि त्याला त्याच्या भावना व्यक्त करायलासंधी दिली जाते व त्यावर लक्ष केंद्रित केले जाते.
  • समुपदेशन
   हे साधन लोकांना तणावासारख्या विशिष्ट समस्यासमजावून सांगण्यासाठी आणि हाताळण्यासाठी त्यांची मदत करायला वापरले जाते.
  • मानसीक उपचार
   समुपदेशनात विद्यमान समस्यांच्या त्वरित निराकरणांकडे लक्ष देतात.याउलट मनोचिकित्सा हा दीर्घकालीन उपचार आहे ज्यात वर्तनातील पुनरावृत्ती आणि ठराविक वैशिष्ट्ये सुधारण्याचे प्रयत्न करतात. मनोचिकित्सेचा उद्देश लोकांना भावनांचे, संबंधांचे आणि तणावांचे व्यवस्थापन करण्यास सक्षम करणे हे आहे. मनोचिकित्सेचे विविध प्रकार आहेत. त्यापैकी सर्वात प्रभावी म्हणजे संज्ञात्मक वर्तणूक उपचार, द्वंद्वात्मक वर्तणूक उपचार  आणि दीर्घकालीन संपर्क उपचार.
  • कौटुंबिक उपचार
   चिंताविकाराला रुग्ण एकट्याने तोंड देऊ शकत नाही.चिंताविकार हाताळण्यासाठी कौटुंबिक आधार महत्त्वपूर्ण आहे. रुग्णाला समजून घेऊन आणि लक्षणांवर मात करून, सोबतच उत्तम संवाद साधून व कौटुंबिक संबंध स्थापित करून मग कुटुंबच व्यक्तीसाठी समर्थ आधारव्यवस्था तयार करते. कुटुंब स्वत: तणावाचे कारण असल्यास, कौटुंबिक उपचार ही निराकरणाची सर्वात महत्वाची पद्धत आहे.
 • औषधोपचार
  'संवाद'आधारित पद्धतींशिवाय, औषाधोपचारसुद्धा चिंताविकार हाताळण्यासाठी एक महत्त्वाची पद्धत असते. औषधे सामान्यत: दिसणाऱ्या लक्षणांवर आणि निवारणाच्या वेळी केंद्रीत घटकांवर आधारित असतात. बहुतेक औषधे सुरक्षित आहेत, तरीही काही किरकोळ दुष्परिणाम आढळू शकतात. 
 • ऍंक्सिओलॅटीक औषधे
  व्यापक चिंताविकारांकरिता हे सर्वमान्य औषध आहे. हे सुरक्षित औषध आहे जे आजूबाजूच्या चिंतासंबंधित समस्यांना आटोक्यात आणण्यात मदत करतात. ते सुरक्षितपणे दिले जाऊ शकते कारण ते मद्यामधे व्यत्यय आणत नाहीत आणि अवलंबन होत नाही. तथापि, त्याने डोकेदुखी होणे, मळमळणे आणि चक्कर येऊ शकतात.
 • बेंझोडायझेपिन
  ही औषधं तुळनेने कमी काळासाठी असते आणि तीव्र चिंता दडवण्यासाठी वापरले जाऊ शकते. हे औषध झोपेतील अडचण, मद्यपान प्रतिबंध लक्षणे आणि अगदी अपस्मारसुद्धाकमी करू शकतात. या औषधांचेदुष्परिणाम आहेत आणि दीर्घकाळासाठी उपयोग करण्यास आदर्श नाहीत कारण ते गुंगी आणणारे आहे आणि परिणामी अवलंबनही होऊ शकते.
 • बीटा-अवरोधक
  हे औषध रक्ताचा प्रवाह वाढविते, रक्तदाब कमी करते आणि हृदयाच्या स्नायूंची आकुंचनशक्ती कमी करते ज्यामुळे हृदयाच्या धडधडीचे आणि कंपनांचे प्रमाण कमी करते. तथापि,यात फक्त एकाचअवस्थेवर इलाज केला जाऊ शकतो. ही औषधं अतिरेकी भीती किंवा फोबिआच्या दौऱ्यात मदत करीत नाहीत.
 • नैराश्यरोधक
  चिंता विकारांमधील विशिष्ट लक्षणांवर उपचार करण्यासाठीकधीकधीनैराश्यरोधकसुचविले जाऊ शकतात.
 • ध्यान, व्यायाम, एक्यूपंक्चर आणि न्यूरोस्टिम्युलेशन सारख्या वैकल्पिक उपचारांचा, नियमित उपचारांसह, सल्ला दिला जाऊ शकतो.

जीवनशैली व्यवस्थापन

चिंता व्यवस्थापनासाठी जीवनशैलीत काही महत्त्वपूर्ण बदल करणे आवश्यक आहे. येथे काही टिपणे आहेत ज्यांचे आपण अनुसरण करू शकता:

 • आहारातून कॅफीन काढून टाका. हे मन भरकटवते आणि चिंताग्रस्ततावाढवते.
 • अधिकच्या साखर आणि चॉकलेटवर नियंत्रण आणा
 • मैदानी व्ययामांसह सक्रिय जीवनशैलीची निवड करा. व्यायामामुळे शरीरातील रसायने (एंडॉर्फिन्स) सोडण्यात मदत होते जे मन आनंदी ठेवते आणि आपल्याला अधिक सकारात्मक वाटते.
 • शिस्तबद्ध व संयमीत जीवनशैलीने आपल्याला स्वतःवर अधिक नियंत्रण मिळवता येते आणि  तणावाची पातळी कमी करण्यात देखील मदत होते. चिंताविकार नेहमी, जवळजवळ नेहमीच, निद्रानाश (अनिद्रा) सोबत येत असल्याने,निरोगी जीवनशैलीमुळे पुरेशी विश्रांती आणि झोप सुनिश्चित होते.
 • डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कधीही औषध घेऊ नका. अगदी अहानीकारक भासणारी, नैसर्गिक किंवा वनस्पतीजन्य औषधेदेखील घातक असू शकतात आणि चिंताविकार वाढवू शकतात.
 • उपचारांचे अनुसरण करा आणि उपचार मध्येच सोडू नका.
 • आधारगट तयार करा आणि मित्र शोधा. एकटे राहण्याचे टाळा. एकटे असल्यावर लोक चिंताविकार आणि भयातिरेकाच्या दौऱ्यांना बळी पडतात. चिंताविकारासाठी आधारगटात सामील होणे तुम्हाला सामायिक करण्यात मदत करेल, तुम्ही एकटे नसल्याची जाणिव होईल, आणि हे हाताळण्यासाठी अंतर्दृष्टी प्रदान करेल.

What is anxiety?

भय, तणाव किंवा काही वेळा चिंता अनुभवणे सर्वसाधारण आहे. काही प्रसंगी, याभावना दीर्घ काळ टिकतात. जवळजवळ सर्व बाबतीत हे विकार एखादी घटना, वस्तू किंवा व्यक्तीच्या रुपात निमित्त ठरू शकते. तथापि, जेव्हा ह्या भावना इतक्या तीव्र होतात की त्या आपल्या दैनंदिन कामकाजात व्यत्यय आणू लागतात तेव्हा त्यांना चिंताविकार म्हटले जाते.

चिंता विकार म्हणजे काय?

अमेरिकन मनोचिकित्सक संघटनेनुसार चिंताविकाराची व्याख्या'अशी भावना जी तणावाचा अनुभव करून देते, भितीचे विचार आणते, आणि शारिरीक बदल, जसे वाढलेला रक्त-दाब, घडवून आणते'म्हणून केली जाते. चिंतेची सामान्य भावना केवळ तणाव यंत्रणा विकसित करण्यात मदत करते आणि त्या व्यक्तीला दबवाखाली संभाव्य क्षमतेचा अनुभव घेण्याची सकारात्मक संधी प्रदान करते. परंतु चिंताविकारांना वैद्यकीय काळजीची आवश्यकता असते.

Dr. Anil Kumar

Dr. Anil Kumar

साइकेट्री

Dr.Drajay Vashishtha

Dr.Drajay Vashishtha

साइकेट्री

Dr. Amar Golder

Dr. Amar Golder

साइकेट्री

Anxiety साठी औषधे

Anxiety के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
AnxitAnxit 0.125 Mg Tablet16.0
Libotryp TabletLibotryp 12.5 Mg/5 Mg Tablet37.5
AlpraxAlprax 0.25 Mg Tablet20.0
Amitar Plus TabletAmitar Plus Tablet23.93
SycodepSycodep 25 Mg/2 Mg Tablet0.0
NeuroxetinNeuroxetin 20 Mg/0.5 Mg Capsule47.3
EsnaEsna 10 Mg Tablet87.0
PlacidoxPlacidox 10 Mg Tablet24.0
Amitop PlusAmitop Plus 25 Mg/10 Mg Tablet37.5
ToframineToframine 25 Mg/2 Mg Tablet10.9
Rejunuron DlRejunuron Dl 30 Mg/750 Mg Capsule66.06
Es OkEs Ok 10 Mg Tablet59.0
ValiumValium 10 Mg Tablet58.0
Amitril PlusAmitril Plus 12.5 Mg/5 Mg Tablet18.1
TrikodepTrikodep 2.5 Mg/25 Mg Tablet0.0
Dulane MDulane M 20 Mg/1.5 Mg Tablet93.0
EsopamEsopam 10 Mg Tablet69.0
AlzepamAlzepam 10 Mg Tablet10.0
Amitryn CAmitryn C 12.5 Mg/5 Mg Tablet30.26
Trikodep ForteTrikodep Forte 5 Mg/50 Mg Tablet0.0
Dumore MDumore M Capsule129.06
EsopramEsopram 10 Mg Tablet65.0
BioposeBiopose 5 Mg Tablet3.0
Amitryn C PlusAmitryn C Plus 25 Mg/10 Mg Tablet47.83

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. American Psychological Association [internet] St. NE, Washington, DC. Anxiety.
 2. National Health Service [Internet]. UK; Generalised anxiety disorder in adults
 3. National Institute of Mental Health [Internet] Bethesda, MD; Anxiety Disorders. National Institutes of Health; Bethesda, Maryland, United States
 4. Anxiety and Depression Association of America [internet] Silver Spring, Maryland, United States. Physical Activity Reduces Stress.
 5. National Alliance On Mental Illness [Internet] Virginia, United States; Find Support.
 6. Davidson JR, Wittchen HU, Llorca PM, et al. Duloxetine treatment for relapse prevention in adults with generalized anxiety disorder: a double-blind placebo-controlled trial. Eur Neuropsychopharmacol. 2008;18:673-681. PMID: 18559291
 7. National Institute of Mental Health [Internet] Bethesda, MD; Generalized Anxiety Disorder: When Worry Gets Out of Control. National Institutes of Health; Bethesda, Maryland, United States
और पढ़ें ...