myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

उतारवयात होणारा विस्मृतीचा आजार म्हणजे काय?

वृद्धांच्या हालचाली, रिफ्लेक्सेस, क्रिया आणि संभाषणाची गती वयानुसार कमी होते. असे बरेचदा पहायला मिळते की त्यांना कशाबद्दल विचारले तर त्यांना काहीच आठवत नाही. कधीकधी त्यांना ती माहिती काही वेळानंतर आठवते किंवा कधीच आठवत नाही. जसे वय वाढते, तसे व्यक्तीमध्ये काही शारीरिक बदल होतात आणि त्यापैकी एक म्हणजे मानसिक प्रक्रिया मंद होणे. बऱ्याचदा लोक ह्याला उतारवयात होणारी विस्मृती समजतात. उतारवयातील विस्मृती मुळे होणाऱ्या समस्या संज्ञानात्मक प्रक्रिया मंदावणे, सौम्य संज्ञानात्मक विकृती किंवा डिमेंशिया (स्मृती आणि विचार करण्याची क्षमता मंदावल्यामुळे दैनंदिन कार्यावर परिणाम होतो) मुळे असू शकतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

याची विविध लक्षणे आहेत. व्यक्ती आणि समस्येच्या तीव्रतेनुसार लक्षणे बदलतात. 

 • माहिती आठवण्यात विलंब किंवा अर्धवट माहिती आठवणे.
 • बोलताना नेहेमी वापरले जाणारे शब्द विसरणे.
 • नेहेमी वापरल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये गोंधळणे.
 • एकाच विषयावर वारंवार चर्चा करणे किंवा एकच प्रश्न वारंवार विचारणे.
 • वस्तू ठेवून विसरणे.
 • व्यक्तींमध्ये गोंधळणे.
 • नियमित कामे करायला किंवा सूचनांचे पालन करायला खूप वेळ लागणे.
 • परिचित वातावरणात नेहमीचा रास्ता शोधण्यात अक्षम असणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

उतारवयात सेरेब्रल क्रिया मंदावल्यामुळे विस्मृतीसारखे  बरेच विकार होतात. याची कारणं खालील प्रमाणे असू शकतात:

 • हिप्पोकॅम्पस लहान होणे (मेंदूतील एक छोटा भाग जो भावना आणि दीर्घकालीन स्मृती नियंत्रित करतो).
 • हार्मोनल बदल.
 • मेंदूत कमी रक्तपुरवठा होणे.

पण, इतर काही घटक देखील कारणीभूत असू शकतात, जसे की:

 • मद्यपान.
 • मेंदुचा रोग.
 • व्हिटॅमिन बी12 ची कमतरता.
 • थायरॉईडचे विकार.
 • उदासीनता  किंवा तणावा सारखे भावनात्मक विकाय.
 • डोक्याला दुखापत.
 • भान हरपवणार्या काही औषधांमुळे जसे झोपेच्या गोळ्या, स्नायू शिथिलके, अँटिडिप्रेसंट्स, रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी औषधे इत्यादी.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

समस्या निदान करण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे. या वैद्यकीय भेटींमध्ये वैद्यकीय इतिहास, झोपण्याच्या वेळा, भावनात्मक स्थिती आणि कौटुंबिक जीवन बाबतीत बरेच प्रश्न विचारले जातात. विसरून जाणे, विस्मृतीची सुरुवात कधी झाली आणि विसरण्याच्या प्रवृत्तीबद्दल तपशील घेतात. काही प्रकरणांमध्ये, न्यूरोपॉयोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा लागू शकतो.

ह्या आजारात बऱ्याच प्रकरणांमध्ये उपचार किंवा पूर्णपणे बरे होणे शक्य नसते. व्यवस्थितपणे परिस्थितीला आणि व्यक्तीला हाताळणे आणि सर्वोत्तम संभाव्य काळजी घेणे महत्वाचे आहे.

बऱ्याच वृद्धांना त्यांच्या मानसिक अपर्याप्तपणाची जाणीव असते आणि हा त्यांच्यासाठी अतिशय तणावपूर्ण किंवा लाजिरवाणा अनुभव असू शकतो. विशेषत: जे समाधानकारक जीवन जगले आहे त्यांच्यासाठी.आश्रित असण्याची गरज आणि स्वतंत्रपणे कार्य करण्याची अक्षमता अवघड असू शकते. म्हणून, या लोकांना खालील गोष्टी गरजेचे आहे:

 • कौटुंबाचा आधार आणि काळजी.
 • निरंतर काळजीचे नियोजन.
 • कोणत्याही आरोग्य परिस्थितीसाठी किंवा इतर समस्यांसाठी उपचार.
 • सोशलाइझ करायची संधी.
 • संतुलित आहार आणि पुरेशी झोप.
 • परिस्थिती खराब होणे पासून टाळण्यासाठी सोप्या ब्रेन स्टिम्युलेटिंग गोष्टी करणे जसे:
  • कोडी आणि शब्दकोष.
  • मासिके वाचणे.
  • मानसिकरित्या आव्हानात्मक कार्य करणे.

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...