ॲनेस्थिशिया - Anesthesia in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 27, 2018

March 06, 2020

ॲनेस्थिशिया
ॲनेस्थिशिया

ॲनेस्थिशिया (भूल देणे) काय आहे?

ॲनेस्थिशिया (भूल देणे) ही एक वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्याने एखाद्या व्यक्तीला शस्त्रक्रिये दरम्यान वेदना जाणवत नाही. ॲनेस्थिशिया हा वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा वापर करून दिला जातो ज्यांना ॲनेस्थेटिक म्हणतात. विस्तृतपणे ॲनेस्थेटीक औषधांचे तीन प्रकार असू शकतात: लोकल, रिजनल आणि जनरल ॲनेस्थेशिया.

लोकल आणि रिजनल ॲनेस्थेटिक्सचा वापर प्रक्रिये दरम्यान शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागाला संवेदनाशून्य करण्यासाठी करतात तर, जनरल ॲनेस्थेटिक चा वापर व्यक्तीला प्रक्रिये दरम्यान पूर्णवेळ झोपवण्यासाठी करतात.

हे काम कसे करते?

एकदा एखाद्या व्यक्तीला जनरल ॲनेस्थिशिया दिला की, मेंदूतील नर्व्ह सिग्नल शरीरापर्यंत पोहोचण्यात व्यत्यय येतो. अशा वेळेस, त्या व्यक्तीला काय चालले आहे याचे त्याला भान राहत नाहीहे मेंदूला वेदना ओळखण्याची परवानगी देत नाही त्यामुळे भूल दिलेले शरीर/शरीराचा भाग पूर्णतः संवेदनाशून्य अवस्थेत असतो.

ॲनेस्थिशिया शारीरिक प्रक्रिया, जसे की हृदय गति, रक्तदाब आणि स्ट्रेस हार्मोन रिलीझ होणे, स्थिर राखण्यास देखील मदत करते.

याची गरज कुणाला आहे?

तीव्र वेदना दूर करण्यासाठी लोकांना ॲनेस्थिशिया दिला जातो. वेदना किंवा त्यावर दिल्या जाणाऱ्या उपचारांप्रमाणे, ॲनेस्थिशियाचे प्रकार सुद्धा बदलतात.

जर त्वचा कापायची असेल, प्रक्रियेला वेळ लागणार असेल, श्वासांवर परिणाम होणार असेल, किंवा यात हृदय किंवा मेंदू सारख्या मोठ्या व आवश्यक अवयवांचा समावेश असेल, तर हे सामान्यतः दिले जाते.

हे कसे दिले जाते?

सामान्यतः लोकं वैद्यकीय प्रक्रियेपूर्वी त्यांच्या ॲनेस्थेटिस्ट्सला भेटतात. कॉम्प्लिकेशन किंवा इतर वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांना हे फार फायदेशीर ठरते. व्यक्तीचा वैद्यकीय इतिहास पाहून डॉक्टर त्यांना काही औषध न घेण्याचा सल्ला देतात कारण ती औषधे ॲनेस्थिशियापूर्वी घेण्याने काही कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात.

ॲनेस्थिशिया सामान्यत: पुढील प्रकारे दिला जातो:

  • इंजेक्शन.
  • श्वसन.
  • टॉपिकल (त्वचेवर किंवा शरीराच्या विशिष्ट भागाच्या लायनिंगवर थेट वापर) लोशन.
  • स्प्रे.
  • आय ड्रॉप.
  • स्किन पॅच.

हे वापरतांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा उपयोग करुन रक्त दाब, हृदय गती आणि श्वसन दर सारख्या महत्वपूर्ण शारिरीक मापदंडांचे नियमितपणे निरीक्षण आणि प्रदर्शन केले जाते.

लोकल आणि रिजनल ॲनेस्थिशिया मध्ये व्यक्ती जागा असतो आणि डॉक्टर ऑपरेशन जिथे करायचे आहे त्या भागावर ॲनेस्थिशिया देतात. उदाहरणार्थ दंत उपचारांसाठी तोंडात, किरकोळ पेल्विक शस्त्रक्रियेसाठी पाठीच्या खालच्या भागात इत्यादी. अशा बाबतीत, ॲनेस्थिशिया जिथे दिला आहे फक्त तेच क्षेत्र संवेदनशून्य होते आणि वेदनाहीन शस्त्रक्रिया केली जाते.



संदर्भ

  1. National institute of general medicine science. Anesthesia. U.S. Department of Health and Human Services. [internet].
  2. College of Anaesthetists. Before coming to hospital. Australian and New Zealand
  3. Antkowiak B. How do general anaesthetics work?. Naturwissenschaften. 2001 May;88(5):201-13. PMID: 11482433
  4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Anesthesia
  5. U.S food and drug administration. Pediatric Anesthesia. US. [internet].

ॲनेस्थिशिया साठी औषधे

Medicines listed below are available for ॲनेस्थिशिया. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.