जीवाणूजन्य योनीदाह - Bacterial Vaginosis in Marathi

Dr. Ajay Mohan (AIIMS)MBBS

November 27, 2018

September 10, 2020

जीवाणूजन्य योनीदाह
जीवाणूजन्य योनीदाह

जीवाणूजन्य योनीदाह (बॅक्टेरियल व्हजायनोसिस) म्हणजे काय?

योनीमधील मायक्रोफ्लोरा उपयुक्त आणि हानिकारक जीवाणूंचे मिश्रण असते. जेव्हा हानिकारक जीवाणू चांगल्या जीवाणूंपेक्षा वरचढ ठरतात तेव्हा योनीमध्ये बीव्ही संसर्ग निर्माण होतो.

जीवाणूंमधील असमतोल योनीक्षेत्रात सूज निर्माण करते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

या परिस्थितीमधून जाणाऱ्या जवळजवळ पन्नास टक्के स्त्रिया कोणतेही लक्षण दाखवत नाही. काही महिलांमध्ये ही लक्षणे वारंवार दिसतात आणि नाहीशी होतात. रोगलक्षणे दर्शवणाऱ्या स्त्रियांमध्ये, पुढील सर्वसाधारण चिन्हे आहेत

  • लघवी करताना जळजळ होणे.
  • योनिमधून अप्रिय असा अनाकलनीय गंध 
  • गव्हाळ अथवा करड्या रंगाचा योनीस्त्राव.

याची मुख्य कारणं काय आहेत?

  • योनिमधील संसर्गासाठी जवाबदार सर्वसामान्य प्रकारचा जीवाणू म्हणजे गार्डनेरेला होय. बी व्ही च्या बहुतांश प्रकरणांमध्ये मध्ये हा जीवाणू कारणीभूत असतो.
  • लाक्टोबॅसिली हे जिवाणू योनीला निरोगी ठेवतात. लाक्टोबॅसिलीची संख्या कमी झाल्याने योनीसंसर्ग (व्हजायनोसीस) निर्माण करू शकतो.

या संसर्गाशी संबंधित काही जोखीमपूर्ण काही घटक:

  • धूम्रपान.
  • अनेक जणांसोबत लैंगिक संबंध.
  • डाऊशिंग.
  • इंट्रायुटेरिन उपकरणे (IUDs)  बीव्ही चा धोका वाढवतात का हे सिद्ध करण्यासाठी अभ्यास अपुरा आहे.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

  • तुमची लक्षणे आणि योनी तपासणीच्या आधारे स्त्रीरोगतज्ञ बीव्ही चे निदान करतील.
  • स्रावाचे मायक्रोस्कोपखाली परीक्षण केले जाते. ही तपासणी अन्य कोणते जंतूसंसर्ग किंवा लैंगिकतेने पसरणारे रोग (सेक्श्युअली ट्रान्समिटेड डिसीज) जसे की गोनोऱ्हिया होण्याची शक्यता दूर करण्यासाठीसुद्धा मदत करते.
  • बीव्ही ला बरेचदा यीस्ट संसर्ग असे चुकीचे समजले जाते, ज्यामध्ये स्त्राव हा अधिक घट्ट आणि गंधविरहित असतो.

बीव्ही चा उपचार पूर्णपणे पुढील लक्षणांवर अवलंबून असतो.

  • लक्षणविरहित (कोणतेही लक्षण न दाखवणाऱ्या) स्त्रियांना कोणत्याही उपचारांची गरज नसते.
  • योनीमध्ये खाज, अस्वस्थता किंवा स्त्राव अनुभवणाऱ्या स्त्रियांना संसर्गमुक्त करण्यासाठी अँटीबायोटिक देऊन उपचार करतात. औषधांमध्ये 6-8 दिवसांसाठी गोळ्या आणि प्रचलित (टॉपिकल) मलम दिली जातात.
  • पुन्हा संसर्ग उद्भवल्यास, अँटीबायोटिकचा कालावधी वाढवावा लागतो. पुनरावृत्ती होऊ नये म्हणून, प्रत्येक रुग्णाने दिलेल्या सल्ल्यानुसार औषधांचा कालावधी पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे.

पुनरावृत्ती टाळण्यासाठी स्वयं - काळजीचे उपाय:

  • नियमितपणे एसटीडीची तपासणी करून घ्यावी, तसेच अनेक जोडीदारांसोबत लैंगिक संबंध टाळावे.
  • डाऊश करू नये. पाण्याने स्वच्छ करणे पुरेसे आहे.
  • तुमच्या डॉक्टरकडून नियमितपणे तुमची आययूडी. तपासून घ्यावी.
  • योनी परिसर स्वच्छ करण्यासाठी सौम्य, गंधविरहित साबणाचा वापर करा.



संदर्भ

  1. Bagnall P, Rizzolo D. Bacterial vaginosis: A practical review. JAAPA. 2017 Dec;30(12):15-21. PMID: 29135564
  2. Khazaeian S, Navidian A, Navabi-Rigi S, Araban M, Mojab F, Khazaeian S. Comparing the effect of sucrose gel and metronidazole gel in treatment of clinical symptoms of bacterial vaginosis: a randomized controlled trial. Trials. 2018 Oct 26;19(1):585. PMID: 30367673
  3. Journal of microbiology. Reliability of diagnosing bacterial vaginosis is improved by a standardized method of gram stain interpretation. American society of microbiology. [internet].
  4. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Bacterial Vaginosis
  5. Office on women's health [internet]: US Department of Health and Human Services; Bacterial vaginosis

जीवाणूजन्य योनीदाह साठी औषधे

Medicines listed below are available for जीवाणूजन्य योनीदाह. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Medicine Name

Price

₹90.0

₹161.5

Showing 1 to 0 of 2 entries