फ्रॅक्चर्ड डोळ्याचे सॉकेट - Fractured Eye Socket in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

April 25, 2019

July 31, 2020

फ्रॅक्चर्ड डोळ्याचे सॉकेट
फ्रॅक्चर्ड डोळ्याचे सॉकेट

फ्रॅक्चर्ड डोळ्याचे सॉकेट म्हणजे काय?

डोळ्याच्या आजूबाजूला असणारी हाडे तुटल्यास फ्रॅक्चर्ड डोळ्याचे सॉकेट होऊ शकते. डोळ्याभोवती असणाऱ्या हाडाला ऑर्बीट किंवा ऑर्बिटल हाड म्हणले जाते. डोळ्याच्या खोबणीतील ऑर्बिटल भिंतीचे वेगळे किंवा  ऑर्बिटल रिम चे फ्रॅक्चर असू शकते.

याच्याशी संबंधित मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?

फ्रॅक्चर च्या प्रकारावर त्याची चिन्हं आणि लक्षणं अवलंबून असतात.

ऑर्बिटल फ्लोअर (ब्लो आऊट) फ्रॅक्चरशी संबंधित लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • एक गोष्ट दोनदा दिसणे.
  • डोळ्याच्या खोबणीतील घटक मॅक्सीलरी सायनस मध्ये अडकणे.
  • डोळ्याची बाहुली मागच्या बाजूला सरकणे.
  • डोळा बाहेर येणे.
  • जसे मेंदू ची शस्त्रक्रिया झाल्यावर प्रकाशा बाबत संवेदना वाढते, तसे अचानक संवेदना वाढणे.

ऑर्बिट च्या आतल्या भिंतीवर फ्रॅक्चर ची लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • हे नाकाच्या फ्रॅक्चर शी संबंधित असू शकते.
  • जखम झालेल्या डोळ्याच्या आतील कोपर्‍यांचे अंतर वाढणे.
  • ऑर्बिटल फ्लोअर फ्रॅक्चर होणे.
  • डोळ्यांभोवती सूज येणे.
  • अश्रू नलिका खराब होणे.
  • नाकातून रक्त येणे.

ऑर्बिटल रूफ फ्रॅक्चर शी संबंधित लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • हे फ्रॅक्चर दुर्मिळ असून त्यामध्ये सायनस च्या समोरील भाग व मेंदू मध्ये दुखापत होऊ शकते.
  • सेरेब्रोस्पायनल रिनोरिया (एक गंभीर स्थिती ज्यामध्ये सेरोब्रोस्पायनल द्रव्य सायनस व नाकावाटे बाहेर पडते.).

याची मुख्य कारणं काय आहेत?

हे फ्रॅक्चर मुख्यतः छोट्या दबावामुळे होतात; सामान्यपणे चेहऱ्याचा ट्रॉमा जो वाहन अपघातामुळे, खेळातील जखमा, शरीरावर झालेला हल्ला (थेट डोळ्यावर).

याचे निदान व उपचार कसे केले जातात?

फ्रॅक्चर्ड डोळ्याचे सॉकेट ला ऑप्थॅल्मोलाॅजिस्ट चा सल्ला घेणे गरजेचे असते, जो डोळा व त्याच्या बाजूच्या भागाचे परीक्षण करतो.

दृष्टी व डोळ्याच्या बाहुलीची जागा याचे परीक्षण केले जाते.

अजून गरजेची असणारी परिक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:

  • कवटीची एक्स-रे चाचणी.
  • फ्रॅक्चर व त्याभोवती च्या भागाच्या परिक्षणासाठी सी टी स्कॅन.

जास्त गुंतागुंतीची स्थिती असल्यास न्यूरो सर्जन व ऑटोलॅरींगोलाॅजिस्ट ला भेटण्याचा सल्ला दिला जातो.

फ्रॅक्चर्ड डोळ्याचे सॉकेटचे उपचार त्याची गंभीरता व लक्षणे यावर अवलंबून असतात.

  • सोप्या बाबतीत लक्षणांना ॲनालजेसिक्स, अँटी बायोटिक प्रोफिलॅक्सिस द्वारे दिलेला आराम पुरेसा असतो
  • गंभीर बाबतीत, बरोबर आणि योग्य पद्धतीने फ्रॅक्चर झालेले हाड बसवणे आवश्यक असते.

स्वतः घ्यायची काळजी:-

  • त्या व्यक्तीने डोके उशीवर ठेवून आराम करावा.
  • सूज थांबवण्यासाठी थंड पदार्थाने शेकणे आवश्यक असते.
  • शिंक, कफ, किंवा जास्त जोरात नाक शिंकणे टाळा.



संदर्भ

  1. American academy of ophthalmology. What Is an Orbital Fracture?. California, United States. [internet].
  2. Boston Children's Hospital. Eye Socket Fracture Symptoms & Causes. United States. [internet].
  3. Neil J. Friedman, Peter K. Kaiser, Roberto Pineda II. The Massachusetts Eye and Ear Infirmary Illustrated Manual of Ophthalmology . Elsevier Health Sciences, 28-Feb-2014.
  4. American academy of ophthalmology. Orbital Fracture Diagnosis and Treatment. California, United States. [internet].
  5. Health Harvard Publishing. Harvard Medical School [Internet]. Eye Socket Fracture (Fracture Of The Orbit). Harvard University, Cambridge, Massachusetts.