हिमबाधा - Frostbite in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

April 25, 2019

July 31, 2020

हिमबाधा
हिमबाधा

हिमबाधा म्हणजे काय?

हिमबाधा ही अत्यंत कमी तापमानात थंडीमुळे त्वचेला दुखापत होण्याची एक स्थिती आहे. लष्कराचे कर्मचारी किंवा व्यावसायिक शीतकालीन क्रीडा खेळाडू यासारख्या दीर्घ काळापर्यंत कमी तपमानात राहत असलेल्या लोकांमध्ये हे सामान्य आहे.

सर्वसाधारणपणे यामुळे अंगठा, बोट, गाल आणि हनुवटी हे भाग जे झाकलेले नसतात प्रभावित होतात.

याचे मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

  • हिमबाधेचे सामान्य चिन्हे आणि लक्षणे अशी आहेत-
    • संवेदनेचा अभाव.
    • त्वचेचा रंग लाल, पांढरा किंवा निळा होणे.
    • त्वचा कडक होणे आणि फोड येणे.
  • हिमबाधा टप्प्यात होते, प्रत्येक टप्प्यात पहिल्यापेक्षा जास्त गंभीर असतो.
    • पहिला टप्पा - यात संवेदनशीलता कमी होते आणि त्वचेच्या नुकसान होण्याची ही प्रारंभिक अवस्था असते.
    • दुसरा टप्पा- खूप काळापर्यंत संवेदना जाणवत नाही आणि त्वचे कडक होते आणि त्याचे थर निघत जातात, शिवाय फोड पण होतात.
    • तिसरा टप्पा - त्वचा खोलवर गारठते आणि तिथे वेदना आणि त्रास बरेच आठवडे टिकतात.
    • चौथा टप्पा - यामुळे हाडे, स्नायू आणि खोल रक्तवाहिन्या देखील प्रभावित होतात, ज्यामुळे त्वचा काळी पडते आणि हे नुकसान कायमस्वरुपी असते.

याची मुख्य कारणं काय आहेत?

  • खूप थंड हवामान, बर्फ, स्नो, थंड द्रव अशा परिस्थिती दीर्घकाळपर्यंत राहणे हे मुख्य घटक आहेत ज्यामुळे हिमबाधा होतो.
  • हिवाळ्यात खूप थंड वारा हिमबाधा होण्याची शक्यता वाढवतो.
  • हिमबाधेची काही जोखीमीची घटके ही आहेत-
    • मधुमेह आणि हायपोथायरॉईडीझम.
    • निर्जलीकरण.
    • मद्यपान आणि धूम्रपान.
    • त्वचेला कमी ऑक्सिजन पुरवठा.
    • हिमबाधा किंवा शारीरिक दुखापतीचा पूर्वोइतिहास.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

  • हिमबाधेचे निदान प्रभावित क्षेत्रातील क्लिनिकल स्थितीवर आधारित, रुग्णाच्या अलीकडील क्रियाकलापांवर आणि इतर लक्षणे असल्यास, त्या आधारावर केले जाते.
  • हिमबाधाची किती तीव्र आहे, त्याचे परिणाम त्वचेवर किती खोलपर्यंत आहे आणि हाडांची स्थिती तपासण्यासाठी, डॉक्टर एक्स-रे, सीटी स्कॅन किंवा एमआरआयची सल्ला देऊ शकतात.
  • हिमबाधेसारख्यासारख्या काही स्थितीमध्ये फ्रॉस्टनिप, व्हॅस्क्युलाइटिस, बुलस पेम्फिगोईड आणि ट्रेन्च फूट समाविष्ट आहे.

फ्रॉस्टबाइटचे उपचार ताबडतोब घेतले पाहिजे आणि त्या उपचार पद्धती या आहेत:

  • तुम्हाला हिमबाधा झाल्याचे आढळल्यास आणखी थंडी मध्ये न वावरता एखाद्या उबदार/उष्ण भागामध्ये जावे आणि प्रभावित भागाला उब द्यावी जसे, गरम पाण्याने आंघोळ करणे किंवा त्वचा घासून पुन्हा उबदार केली जाऊ शकते.
  • हिमबाधे सह संसर्गा चा संशय असेल तर निर्धारित औषधांमध्ये पेनकीलर्स आणि अँटीबायोटिक्सचा समावेश केला जातो. आवश्यक असल्यास डॉक्टर दाह कमी होणारी औषधे देखील लिहून देऊ शकतात.
  • क्षतिग्रस्त ऊतकांची दुरुस्ती न होऊ शकल्यास, एस्पिरेशन आणि डेब्रिमेंट सारख्या प्रक्रिया केल्या जाऊ शकतात.
  • तीव्र हिमबाधा झाल्यास प्रभावित भाग शस्त्रक्रिया करुन काढरा जातो.
  • हायपरबेरिक ऑक्सिजन थेरेपी हिमबाधेच्या उपचारांची एक नवीन, कमी ज्ञात असलेली पद्धत आहे.



संदर्भ

  1. Jay Biem, Niels Koehncke et al. Out of the cold: management of hypothermia and frostbite. Canadian Medical Association; February 04, 2003 168 (3) 305-311
  2. Millet et al. Frostbite: Spectrum of Imaging Findings and Guidelines for Management.. Radiographics. 2016 Nov-Dec;36(7):2154-2169. PMID: 27494386
  3. Stathis Poulakidas et al. Treatment of Frostbite With Subatmospheric Pressure Therapy. Journal of Burn Care & Research, Volume 29, Issue 6, November-December 2008, Pages 1012–1014,
  4. Adrian E. Flatt et al. Frostbite. Proc (Bayl Univ Med Cent). 2010 Jul; 23(3): 261–262. PMID: 20671824
  5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Frostbite