गरोदरपणात अपचन - Indigestion during pregnancy in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

April 25, 2019

March 06, 2020

गरोदरपणात अपचन
गरोदरपणात अपचन

गरोदरपणात अपचन काय आहे?

साधारणतः दोन-तृतियांश स्त्रियांना गर्भधारणे दरम्यान अपचन, छातीत जळजळ आणि आम्ल तोंडात येणे हा त्रास होतो. हे हार्मोन बदलल्यामुळे होऊ शकते. बाळाच्या वाढत्या आकारामुळेदेखील हे होऊ शकते. गर्भाशय पोटावर ढकले गेल्यामुळे पोटावर ताण पडतो. अपचनामुळे गंभीर कॉम्प्लिकेशन खूप दुर्मिळ आहे. परंतु लक्षणे पुनरावृत्ती करणारे, गंभीर आणि असुविधाजनक असू शकतात.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

गर्भवती महिलांमध्ये, विशेषत: जेवण झाल्यानंतर किंवा काही प्यायल्यानंतर जीक्ष काही लक्षणे दिसत येतात ती पुढील प्रमाणे आहेत:

  • छातीपासून घशापर्यंत जळजळ होणे.
  • पोट फुगणे.
  • ढेकर येणे.
  • आम्ल तोंडात परत येणे.

ही लक्षणे गर्भधारणेदरम्यान कोणत्याही वेळी आढळतात पण सामान्यपणे तिसऱ्या तिमाहीत नोंदवली जातात. वयस्क स्त्रियांना आणि ज्या स्त्रियांची दुसरी किंवा त्यानंतरची गर्भधारणे असते त्यांना गर्भधारणेदरम्यान सतत याचा त्रास होतो. ही एक फारच सामान्य घटना आहे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

गरोदरपणात अपचनात वाढ मुख्यतः या कारणांमुळे होते:

  • वाढत्या गर्भाशयामुळे ओटीपोटात दबाव वाढतो ज्यामुळे अंततः अन्ननलिका वर्तुळाकार होऊ शकते, ज्यामुळे गॅस्ट्रिक पदार्थ अन्ननलिकेत परत येतात.
  • गरोदरपणात हार्मोन्स एक महत्वाची भूमिका बजावतात. ॲस्ट्रोजेनच्या उपस्थितीत, प्रोजेस्टेरॉनच्या प्रमाणित पातळीचे परिणाम सामान्य दाब किंवा कमी होण्याच्या आवरणावर होतो. अन्ननलिका वर्तुळाकार होते परिणामी गॅस्ट्रिक आम्ल परत तोंडात येऊ शकते. तसेच, प्रोजेस्टेरॉन पोटाच्या चिकट स्नायूंवर परिणाम  करते ज्यामुळे पोटातून अन्न पुढे जाण्यास विलंब होतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

निदान प्रामुख्याने लक्षणांवर केले जाते. गंभीर आजार असलेल्या गरोदर महिलांना इतिहासात घेतल्यानंतर आणि शारीरिक तपासणीनंतर अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एन्डोस्कोपी घेणे आवश्यक आहे.

आहार आणि जीवनशैलीतील बदल या समस्येचे निराकरण करण्यात मदत करतील आणि त्यात या पद्धती समाविष्ट आहेत

  • रात्रीचे जेवण लवकर करावे: अपचनाची लक्षणे जास्त रात्री जाणवण्याची शक्यता असते. म्हणून, रात्रीचे जेवण झोपण्याआधी कमीत कमी दोन तास आधी घ्यावे ज्यामुळे रात्रीच्या वेदना टाळण्यास मदत होईल.
  • जास्त जेवण टाळा: एका वेळी जास्त जेवणाऐवजी थोडेथोडे खा आणि जेवणांची वारंवारिता वाढवा.
  • सरळ रहा: खाताना जेव्हा सरळ बसा. हे पोटावरील दाब कमी करण्याच मदत करते.
  • जेवणादरम्यान कधीही पाणी पिऊ नये: जेवणादरम्यान  पाणी पिल्याने अपचनाची शक्याता कमी होता होत. कारण पाणी गॅस्ट्रिक ॲसिड सौम्य करते.
  • जेवण कधीही घाईघाईने करू नये: हळू हळू खा आणि जेवण करण्यापूर्वी योग्यरित्या अन्न चावून खा  जे जलद पचनासाठी उपयुक्त ठरते.
  • मसालेदार अन्न, दारू आणि धूम्रपान टाळा: हे घटक लक्षणे वाढवतील.

जेव्हा प्रतिबंधात्मक उपाय उपयोगी ठरत नाही आणि अपचनाचा त्रास होत राहतो तेव्हा समाविष्ट असलेल्या औषधांची एक श्रेणी वापरली जाते.

  • पोटातील ॲसिडचा प्रभाव कमी करण्यासाठी अँटासिड्स.
  • ॲसिड रीफ्लक्समुळे होणाऱ्या अपचनापासून मुक्ती मिळवण्यासाठी अल्जीनेट्स.
  • एच 2-रेसेप्टर ब्लॉकर्स गॅस्ट्रिक ॲसिडचा स्त्राव कमी करायला
  • ॲसिड च्या निर्माणासाठी कारणीभूत पोटातील एंझाइम्सला अडवण्यासाठी प्रोटॉन पंप इनहिबिटर्स.

 



संदर्भ

  1. National Health Service [Internet]. UK; Indigestion and heartburn in pregnancy
  2. Vazquez JC. Constipation, haemorrhoids, and heartburn in pregnancy. BMJ Clin Evid. 2010 Aug 3;2010:1411. PMID: 21418682
  3. Office on women's health [internet]: US Department of Health and Human Services; Body changes and discomforts
  4. National Health Service [Internet]. UK; Indigestion and heartburn in pregnancy
  5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Pregnancy and diet