खाज येणे - Itching in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

December 18, 2018

April 27, 2023

खाज येणे
खाज येणे

सारांश

खाज म्हणजे, जिथे खाज होते, तेथील त्वचेचे भाग खाजवण्याची जाणीव. खाज अलर्जी, प्रतिरोध प्रणालीसंबंधित समस्या, काही औषधांचे सहप्रभाव किंवा अंतर्निहित आरोग्य परिस्थितींचे लक्षण असू शकते. खाजेचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यांना साधारणपणें त्यांची पाहणी किंवा कारणावरून ओळखता येते.  सर्वाम्त सामान्य म्हणजे ओरखडा, पोळ, बुरशीजन्य खाज आणि डास चावणें. खाज कोरडी त्वचा असलेल्या लोकांमध्येही सामान्य आढळते. तिचे दृश्य प्रभाव म्हणजे लालसरपणा, जळजळ, सूज आणि फोड फुटणें. खाज साधारणपणें एखादे चेतावणीदायक लक्षण नव्हे, पण दीर्घ काळ टिकल्यास, ते काही गंभीर आजार उदा. मूत्रपिंड किंवा यकृतातील बिघाडींचे सूचक असू शकते. खाजेचे कारण निर्धारित केल्यानंतर, अनेक प्रभावकारी उपचार पद्धती सुरु केल्या जाऊ शकतात, ज्यामध्ये सहज मिळणारे ऑयंटमेंट किंवा मौखिक औषधोपचार सामील असतात. घरगुती इलाजांनीही तात्काळ आराम मिळू शकते.

खाज येणे ची लक्षणे - Symptoms of Itching in Marathi

खाजेची संवेदना खूप सामान्य आणि सहज ओळखता येणारी अशी असते. खाज ही खूप वेळ टिकते अगर थोडे खाजवल्याने जाऊही शकते. तरीही, खाजेचे कारण एखाद्या आरोग्य परिस्थितीची निगडीत असल्यास, केवळ ते भाग खाजवणे पुरेसे नसते. इतर लक्षणेही त्याशी निगडीत असू शकतात:

  • लालसरपणा
  • जळजळ
  • झिणझिण्या येणें किंवा जळजळीची संवेदना
  • त्वचेवर उंचवटे दिसणें
  • कोरडी त्वचा
  • ढलपे दिसणें
  • त्वचेवर ढलपी घडण
  • त्वचेची पापुद्रे निघणें
  • फोडी

खाज शरिराच्या विविध क्षेत्रांमध्ये होऊ शकते उदा. बाहा, डोक्याची त्वचा, पाठ किंवा जननेंद्रियांच्या आजूबाजूचे भाग.

Antifungal Cream
₹629  ₹699  10% OFF
BUY NOW

खाज येणे चा उपचार - Treatment of Itching in Marathi

खाजेचे निर्धारण केल्यानंतर, उपचार खालीलप्रमाणे केले जातात:

  • कॉर्टिकॉस्टरॉय्ड क्रीम
    या औषधयुक्त क्रीम यांचे त्वचेवर आरामदायक व चिकित्सक प्रभाव होते. त्याने त्वचेचा कोरडेपणा टाळला जाऊनही खाजेवर उपाय होतो. या क्रीममध्ये 1% हाइड्रोकॉर्टिसोन असतो. डॉक्टरांचा सल्ल्याशिवाय आणि त्यांनी लिहून दिल्या शिवाय रुग्णाने स्टेरॉय्ड क्रीम लावता कामा नये.
  • कॅल्सिन्युरिन इन्हिबेटिटर
    ही औषधे विशिष्ट भागांमधील खाजेवरील उपचार करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात.
  • तणावरोधी औषधे
    तणावरोधी औषधांचे शरिरातील हार्मोनवर प्रभाव होतो आणि खाजेपासून मुक्ती मिळण्यात मदत मिळते.
  • जेल
    साधारन एलोवेरा जेल, खाज येणारी त्वचेला आराम देण्यास आणि कोरडी त्वचेवर उपचार करण्यास, मॉश्चराइझर म्हणून लावला जाऊ शकतो.
  • एंटिहिस्टामिन
    या सामान्यपणें तोंडाद्वारे ग्रहण करण्यासाठी असतात व अलर्जिक प्रतिक्रिया कमी करण्यात लाभदायक असतात. त्याने जळजळ आणि पर्यायाने खाजही टळते.
  • प्रकाश उपचारपद्धत
    व्यवस्थित निर्धारित केलेल्या तरंगलांबीच्या जंबुलातीत किरणांचे वापर करून खाजेवर नियंत्रण आणले जाते. त्याला प्रकाशोपचारही म्हणतात आणि दीर्घकालिक लाभ मिळवण्याकरिता अनेको सत्रे करावी लागतात.
  • अंतर्निहित आरोग्य परिस्थितींचे उपचार
    मूत्रपिंड, यकृत किंवा रक्तातील साखरेशी संबंधित आरोग्य परिस्थितींच्या उपचाराने खाज नियंत्रणात येऊ शकते. आजारावर उपचार लक्षणांचाही नाश करते.

जीवनशैली परिवर्तन

त्वचेवर खाजेवर नियंत्रण आणण्यात काही जीवनशैली बदल मदतशीर ठरू शकतात:

  • त्वचेला खाज आणणारे पदार्थ टाळा.
  • खाज येणार्र्या भागावर औषधयुक्त लोशन लावा. ते औषधांच्या दुकानात सहज मिळतात व कोरड्या आणि खाज येणार्र्या भागात आराम देण्यात खूप मदत होते.
  • प्रभावित भाग खाजवणें टाळा. बुरशीजन्य संक्रमण असल्यास, खाजवल्याने त्वचेची हानी होऊ शकते आणि त्वचेच्या इतर भागांतही संक्रमण पसरू शकते. खाजवल्याने नखांपासून रोगकारक जंतू खाजील त्वचेत पोचून अधिकच दाह होतो.
  • ताण कमी करा. ताण वाढल्याने प्रतिरोध प्रणाली सक्रिय होऊन, खाज किंवा इतर अलर्जिक प्रतिक्रिया होऊ शकतात.

खाज येणे काय आहे - What is Itching in Marathi

खाजेला वैद्यकीय भाषेत प्रुरिटस असे म्हणतात. खाज ही त्वचेचे प्रभावित असलेले भाग खाजण्याची आणि घासण्याची आच निर्माण करणारी गैरसोयात्मक संवेदना असते. खाजेची अनेक कारणे असू शकतात, तरी खाजेचे  सर्वांत सामान्य कारण म्हणजे कोरडी त्वचा असे असते. कोरडी आणि ढलपी त्वचा खाजू शकते आणि खाजतांना निर्माण झालेल्या घर्षणामुळे जळजळीची संवेदनाही निर्माण करू शकते. खाजेच्या कारणाला धरून लालसरपणा, फोड, ओरखडे आणि काहीवेळा रक्तस्राव (अधिकतर खूपच जास्त आणि खरखरीत खाजवल्यामुळे) यांसारखे प्रभाव ही रुग्णाला अनुभवास येऊ शकतात. काही लोकांमध्ये, सततीची खाज एखाद्या अंतर्निहित आरोग्य परिस्थितीशी निगडीत असू शकते उदा. त्वचेचे रोग, सॉरिओसिस, गर्भावस्था आणि दुर्मिळ रीत्या कर्करोगही असू शकते. हे लक्षात आले आहे की, मधुमेह, अलर्जी आणि दम्या यांसारख्या विविध आरोग्य समस्या असलेले लोक अधिक खाज अनुभवतात. वयस्कर व्यक्ती यांना ही त्वचेत खाज होण्याची शक्यता अधिक असते, कारण वाढत्या वयाबरोबर त्यांच्या कातडीने आपली नैसार्गिक आर्द्रता गमावलेली असते.



संदर्भ

  1. Am Fam Physician. [Internet] American Academy of Family Physicians; Pruritis.
  2. American Academy of Allergy, Asthma and Immunology [Internet]. Milwaukee (WI); Scratching the Surface on Skin Allergies
  3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Itching
  4. Healthdirect Australia. Itchy skin. Australian government: Department of Health
  5. Garibyan L, Rheingold CG, Lerner EA. Understanding the pathophysiology of itch. Dermatol Ther. 2013 Mar-Apr;26(2):84-91. doi: 10.1111/dth.12025. PubMed PMID: 23551365; PubMed Central PMCID: PMC3696473.

खाज येणे साठी औषधे

Medicines listed below are available for खाज येणे. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.

Lab Tests recommended for खाज येणे

Number of tests are available for खाज येणे. We have listed commonly prescribed tests below: