myUpchar प्लस+ के साथ पुरे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

सारांश

कावीळ हा असा रोग आहे,ज्यामध्ये संपूर्ण सीरमबिलीरुबिन (टीएसबी)ची पातळी 3 मि.ग्रा. प्रती डिसीलिटरपेक्षा जास्त होते.लक्षणांमध्ये तुमच्या कातडीला, डोळ्यांच्या पांढऱ्या भागाला आणि म्युकस पडद्याला (तोंडासारख्या आतल्या सौम्य अवयवाचे काठ) पिवळेपणा येणे सुमार आहे.  साधारणपणे जन्मजात बाळांना कावीळ होतो, परंतु प्रौढसुद्धा त्याच्या त्रासापासून अलिप्त राहत नाहीत. प्रौढांमध्ये इतरही लक्षणे जसे पोटदुखी , भूक ना लागणे , वजन कमी होणे, इतर दिसतात. लहान बाळांमध्ये प्रकाशोपचार आणि रक्त संक्रमण, तर प्रौढांमध्ये प्रयोजक घटकांचे काढून टाकणे, औषधोपचार आणि कधी शल्यक्रिया देखील वापरली जाते. उपचार न करता सोडून दिल्यास , मुलाच्या मेंदूवर परिणाम होतो, आणि इतरही समस्या जसे सेप्सीस, यकृत आणि मूत्रपिंडाच्या पूर्णपणे बंद पाडण्याचे किंवा रोगाचे धोके संभवतात.

बिलरुबीनचे चयापचय

आपले शरीर नव्या लाल रक्तपेशी बनवीत असते आणि जुन्या लाल रक्तपेशी संपवीत असते. या प्रक्रिये दरम्यान, जुन्या लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिन तुटून ग्लोबीन, लोह, आणि बिलिव्हरडीन मोकळे होते. ग्लोबीन आणि लोह आपल्या हाडांच्या मज्जेमध्ये जाऊन परत वापरल्या जाते आणि नवे हिमोग्लोबिन बनते, तर बिलिव्हरडीन पुन्हा तुटून बिलिरुबिन नावाचे  सहउत्पाद तयार होते. आपले यकृत पुढील चयापचयासाठी हे बिलिरुबिन घेते. हे प्रक्रिया झालेले  बिलिरुबिन पित्ताच्या नळीतून आतड्यांमध्ये प्रवेश करते. यकृत त्याला आणखीन विभागून युरोबिलिनोजेन आणि स्टरकोबिलिनोजेन मध्ये रूपांतरित करते.  युरोबिलिनोजेनशोषल्या जाऊन पुन्हा रक्त अभिसरणात सोडल्या जाते, ज्यातला एक भाग यकृतात पुनः प्रवेश करतो तर उरलेला भाग मूत्रपिंडाच्या मदतीने लघवीद्वारे बाहेर काढल्या जाते. स्टरकोबिलिनोजेनशौचाद्वारे बाहेर काढल्या जाते.

 1. कावीळ ची लक्षणे - Symptoms of Jaundice in Marathi
 2. कावीळ चा उपचार - Treatment of Jaundice in Marathi
 3. कावीळ साठी डॉक्टर

कावीळ ची लक्षणे - Symptoms of Jaundice in Marathi

बाळांमध्ये

 • जन्म होताच किंवा शरीरविज्ञानाशी निगडित कावीळ
  नेहमीप्रमाणे, सुदृढ बालके नकारात्मक किंवा सौम्य लक्षणे दाखवितात. परंतु तुमचे जन्मजात शिशू कमी वजनाचे असेल, किंवा वेळ पूर्ण न करता जन्मले असल्यास, तुमच्या बाळामध्ये कावीळची वैशिष्टयपूर्ण लक्षणे दिसतात.लक्षणे  उद्भवायला एक आठवडा लागू शकतो तर ती जायला तीन आठवडे ते एक महिन्याचा वेळ लागतो.  तुमच्या बाळाची कातडी, तोंडाच्या आतील भागातील सौम्य रेषा, डोळ्यांचा पांढरा भाग, तळहात, तळपाय, पिवळे होतात, लघवी गडद पिवळ्या रंगाची होते, आणि शौचवेळेगणीक पातळ होत जाते. तुमच्या बाळाच्या कपाळावर आणि चेहऱ्यावर पिवळ्या रंगाची छटा विकसित होऊन काही दिवसातच उरलेल्या शरीरावर फैलते. तुमच्या बाळाला दूध ओढणे कठीण जाते, कमजोरी वाटते, सतत झोप येते, आणि रडण्याचा आवाज कर्कश होतो.
 • हिमोलिटिक कावीळ
  आरएच पॉसिटीव्ह (आर एच म्हणजे लाल रक्तपेशीमध्ये असणारे एक प्रथिन,ज्या व्यक्तीत हे प्रथिन असते ती आरएचपॉसिटीव्ह असते) बाळात जे आरएचनिगेटिव्ह आईच्या पोटी जन्म घेते (जिच्या आरबीसी मध्ये आरएच प्रथिन नसते),लाल रक्तपेशीची क्षती अति प्रमाणात होते. आरएच पॉझिटिव्ह रक्तात डी-अँटीजेनअसते जे आईच्या रोगप्रतिकार व्यवस्थेत बाह्य अंग म्हणून काम करते. आईची रोगप्रतिकार व्यवस्था या अँटीजेन विरोधात लगेच सक्रिय होऊन अँटी-डी प्रतिद्रव्ये (अशी प्रथिने जे डी-अँटीजेन ला ओळखतात आणि ते असलेल्या आरबीसी मारून टाकतात) तयार करते. ही प्रतिद्रव्ये तिचे गर्भवेष्टन (युंबिलिकल कॉर्ड) पार करतात आणि अर्भकातील डी-अँटिजेन्स असलेल्या लाल रंक्तपेशींना संपवणे सुरु करतात. हिमोलिसिसमूळेसिरम मधील टीएसबी पातळी वाढते आणि कावीळ होतो. या स्थितीला नवजातातील हिमोलिटिक आजार किंवा एरीथ्रोब्लास्टोसीस फेटलीस देखील म्हणतात. जन्म झाल्यावर लगेच होणाऱ्याकाविळा सारखीच ही लक्षणे आहेत. तुमचे बाळ अनुभवत असलेली इतर लक्षणे अशी आहेत.
  • पोटातील दुखणे
  • रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी कमी होऊन रक्तक्षय होणे
  • कंजेस्टिव्ह कार्डिअक फैल्युअर (हृदय बंद पडणे)

प्रौढांमध्ये

प्रौढांमध्ये देखील कावीळची ठराविक लक्षणे दिसतात ज्यात कातडीचे, डोळ्याच्या पांढऱ्या भागाचे, आणि म्युकसच्या पडद्याचे मालिन पिवळे होणे सामील आहे. याव्यतिरिक्त, प्रौढांमध्ये कावीळमध्ये दिसणारी इतर लक्षणे अशी आहेत - पोटाच्या वरच्या उजव्या भागातील दुखणे जे पाठीच्या उजव्या, उजवे खांदे, पोटाचा खालचा उजवा भाग, इत्यादी या शरीरातील इतर भागातही उत्सर्जित होते. खाज सुटणे, निस्तेज तळहात, तळपाय, वजन कमी होणे, कमी भूक लागणे, ताप, गडद पिवळी लघवी, आणि फिके पिवळे शौचाला होणे.

कावीळ चा उपचार - Treatment of Jaundice in Marathi

कावीळच्या प्रकारावरून उपचाराच्या विविध पद्धती अवलंबल्या जातात. काही उपचार खालील प्रमाणे आहेत.

नवजात शिशूंचे उपचार -

 • जन्म होताच होणारा कावीळ
  तुमच्या बाळाचे यकृत पूर्णपणे विकसित झाल्यास व वाढीवबिलिरुबीनला पचवण्याची शक्ती तयार झाल्यास दोन-चार आठवड्यातच लक्षणे दूर व्हायला सुरुवात होते. तरीही तुमच्या बाळाला जास्तीकावीळ असेल आणि बाळाच्या सिरम मधील टीएसबी पातळी खूप जास्ती असेल तर उपचार आवश्यक आहेत. उपचारात फोटोथेरपी, रक्त बदलणे इत्यादी सामील आहेत.
  • फोटोथेरपी
   फोटोथेरपी मध्ये तुमच्या बाळाला जास्तीत जास्ती वेळअति प्रकाशात ठेवल्या जाते. प्रकाश आणि ऑक्सिजनच्या संयोगाने फोटो-ऑक्सिडेशन होऊन बिलिरुबिन मध्ये ऑक्सिजन मिसळते, जे पाण्यात विरघळतेव ज्यामुळे बाळाच्या यकृताला ते तोडून शरीराच्या बाहेर काढणे सोपे जाते. दर तीन-चार तासांनी अर्ध्या तासासाठी उपचार थांबवून बाळाला पाजतात. एक-दोन दिवसात टीएसबीची पातळी खाली साधारण स्तरावर न आल्यास फोटोथेरपी व्यत्यय न आणता सुरु ठेवतात.
  • एक्स्चेंज ट्रान्सफ्यूजन
   फोटोथेरपी असरदार नसल्यास आणि बिलिरुबीनची पातळी खाली न आल्यास नवे रक्त चढविण्याचा सल्ला दिला जातो. योग्य दात्याकडून रक्त घेऊन ( सारख्या रक्तगटाचे, रक्ताचे आजार व संसर्ग नसलेले) आणि बाळाच्या रक्ताशी ते बदलतात. नवे रक्त कमी बिलिरुबिन पातळीचे असल्यामुळे बाळाच्या रक्तातील बिलिरुबिन पातळी झपाट्याने खाली येते. पूर्ण प्रक्रियेदरम्यान बाळ देखरेखीखाली असते. रक्ताच्या बदलल्यानंतर दोन तासांनी बिलिरुबीनची पातळी मोजल्या जाते.
 • नवजात शिशूंमधील हिमोलिटिक कावीळ (एरीथ्रोब्लास्टोसीसफेटलीस)
  आजार सौम्य असल्यास उपचारांची आवश्यकता नसते. आजार अधिक प्रमाणात असेल तर फोटोथेरपीसह रक्त बदलण्याचा सल्ला दिला जातो, किंवा शिशूची परिस्थिती इम्युनोग्लोब्युलिन (रोगप्रतिकार व्यवस्था तयार करीत असलेली ती प्रोटिन्स जी बाहेरील घटकांचा प्रतिकार करतात) लस टोचूनही सुधारते. हि लस बाळाच्या लाल रक्तपेशींना तुटण्यापासून रोखते आणि टीआरबींची पातळी कमी करते.

प्रौढांमधील उपचार

प्रौढांमधील उपचार आजारांच्या मूळ कारणांवर अवलंबून असतात व आजाराचे समूळ उच्चाटन हा हेतू असतो. कावीळच्या मूलभूत कारणांची व त्यांच्या उपचारांची काही उदाहरणे खालील प्रमाणे आहेत.

 • अनेमिया
  तुमचे डॉक्टर लोहाच्या गोळ्या घेण्याचा सल्ला देतात त्यामुळे लाल रक्तपेशींच्या  तुटीचे प्रमाण घटते. 
 • संसर्ग (उदा. हेपॅटायटिस )
  प्रतिजनूकीय किंवा प्रतिजैविकांच्या मदतीने उपचार केले जातात.
 • यकृताची क्षती, जसे कि दीर्घकालीन यकृताचे आजार किंवा अल्कोहोलिकफॅट्टी यकृताचे आजार
  तुमचे डॉक्टर तुम्हाला यकृताची कार्यक्षमता वाढीस लागण्यासाठी मद्यपान बंद करायचा सल्ला देतातजेणेकरून आणखी क्षती होऊ नये. टोकाच्या वेळी यकृत बदलण्याची पाळी येते.
 • पित्तनलिकेतील अडथळा
  दाहकता, स्वादुपिंडातीलकर्काचा, ट्युमरचा  दबाव, इत्यादी मूळेपित्तनलिकेवर दाब येऊन तिला अडथळे तयार होतात. शल्यक्रिया करून हे अडथळे काढून घ्यायचे उपचार केले जातात.
 • आनुवंशिक आजारांमुळे होणारा कावीळ
  कमतरता असलेल्या घटकांची पूर्तता करून उपचार करतात.

स्व-काळजी

उपचारांएवढेच महत्वाचे स्वतःची काळजी घेणेसुद्धा आहे. हलका, संतुलित, कमी वसा असलेले आहार, भरपूर द्रव्ये, ताज्या फळांचा रस, औषधे, आणि आवश्यक अराम करणे गरजेचे आहे. भारी, चकमकीत, आणि रस्त्याच्या दुकानांतील अन्न न खाणें हितावह ठरेल. वैयक्तिक स्वच्छता ठेवा आणि माहिती नसलेल्या पाण्याच्या स्रोतांपासून पाणी ग्रहण करू नका.

Dr. Mahesh Kumar Gupta

Dr. Mahesh Kumar Gupta

गैस्ट्रोएंटरोलॉजी

Dr. Raajeev Hingorani

Dr. Raajeev Hingorani

गैस्ट्रोएंटरोलॉजी

Dr. Vineet Mishra

Dr. Vineet Mishra

गैस्ट्रोएंटरोलॉजी

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...