myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

स्लीप अ‍ॅप्निया काय आहे?

स्लीप अ‍ॅप्निया एक झोपेचा विकार आहे, यात आपण झोपलेले असताना वारंवार आपला श्वास बंद होतो आणि पुन्हा चालू होतो. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लिप अ‍ॅप्निया ही एक सामान्य स्थिती आहे. यात नाकापासून श्वसननलिके पर्यंतच्या वरच्या वायुमार्गाच्या अडथळ्यामुळे आपण घोरू लागतो. सेंट्रल स्लीप अ‍ॅप्निया ही एक अशी स्थिती आहे जिथे मेंदूद्वारे श्वासोच्छवासाच्या स्नायूंना श्वासोच्छवासाचे सिग्नल पाठवले जात नाहीत. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की ज्यांना स्लीप अ‍ॅप्निया असतो ते घोरतात आणि जे घोरतात त्यांना स्लीप अ‍ॅप्निया असतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

लक्षणे झोपेत दिसून येत असल्यामुळे, स्वत:ची समस्या शोधणे कठीण होते. काही लक्षणे खाली दिली आहेत:

 • रात्री श्वासोच्छवासास त्रास होण्यामुळे दिवसा झोपणे.
 • झोपताना धाप लागणे आणि श्वसनमार्गात अवरोध निर्माण होणे.
 • कोरडे तोंड आणि सकाळी डोकेदुखी.
 • जोरजोरात घोरणे.
 • अधिक चिडचिडे आणि मूडी बनणे.
 • दिवसभर झोपेची गुंगी असणे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

स्लीप अ‍ॅप्निया खालील वैद्यकीय स्थितीमुळे होतो:

 • लठ्ठपणा विशेषतः मानेजवळ आणि छातीजवळ.
 • मोठे टॉन्सिल्स.
 • न्यूरोमस्क्यूलर डिसऑर्डर.
 • किडनी निकामी होणे किंवा हार्ट फेलियअर.
 • आनुवांशिक सिंड्रोम.
 • योग्य वेळेपूर्वी झालेला जन्म.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

आपल्या सोबत जी व्यक्ती झोपत असेल डॉक्टर आपली स्लिप हिस्टरी त्यांना विचारतात आणि मुल्याकंन करतात आणि तपशीलवार शारीरिक तपासणी करतात. श्वासोच्छवास आणि इतर शरीराच्या कार्यावर रात्रभर लक्ष ठेवून स्लीप अ‍ॅप्नियाचे निदान करण्यास मदत मिळते .रात्री झोपताना आपल्या श्वासोच्छ्वासाचे नमुने, रक्तात ऑक्सिजनचचा स्तर आणि हृदय, फुफ्फुस आणि मेंदूच्या क्रियाकलापाचे परीक्षण करण्यासाठी रात्रीची नॉक्टर्नल पॉलीसोम्नोग्राफी चाचणी (झोपेचा अभ्यास) केली जाते. आपले डॉक्टर होम स्लिप चाचण्या सुचवू शकतात.

किरकोळ प्रकरणांमध्ये, शरीराचे वजन कमी करणे किंवा धूम्रपान सोडणे, जीवनशैलीत बदल करण्याची शिफारस केली जाते. गंभीर प्रकरणांमध्ये, निरंतर पॉसिटीव्ह एअरवे प्रेशर (सीपीएपी) राखण्यासाठी एक मास्क दिला जातो. जीभ जागेवर ठेवण्यासाठी मौखिक वापराची साधने दिली जातात.गळ्याच्या मागील टिश्यू काढून टाकण्यासाठी किंवा जबड्याची पुनर्स्थापना करून वायूमार्गातील अवरोध टाळण्यासाठी शस्त्रक्रियेची शिफारस केली जाते.

 1. स्लीप अ‍ॅप्निया साठी औषधे
 2. स्लीप अ‍ॅप्निया साठी डॉक्टर
Dr. Swati Narang

Dr. Swati Narang

न्यूरोलॉजी

Dr. Megha Tandon

Dr. Megha Tandon

न्यूरोलॉजी

Dr. Shakti Mishra

Dr. Shakti Mishra

न्यूरोलॉजी

स्लीप अ‍ॅप्निया साठी औषधे

स्लीप अ‍ॅप्निया के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
ArmodArmod 150 Mg Tablet218.1
WaklertWaklert 100 Mg Tablet143.75
ModafilModafil 100 Mg Tablet Md87.0
ModalertModalert 100 Mg Tablet122.0
ModatecModatec 100 Mg Tablet60.0
ProvakeProvake 100 Mg Tablet83.4
WellmodWellmod 100 Mg Tablet68.57

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

और पढ़ें ...