myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

सर्पदंश म्हणजे काय?

सर्पदंश ही सापांची इतर प्राण्यांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठीची संरक्षक यंत्रणा आहे. विषारी साप चावण्याला सर्पदंश म्हणतात. याचा मज्जासंस्था, हृदय किंवा रक्त उत्पादक अवयवांवर परिणाम होऊ शकतो जे वेळेत उपचार न केल्यास प्राणघातक ठरू शकते. असे आढळून आले आहे की भारतात सर्पदंशांची संख्या दरवर्षी 1,00,000 प्रकरणे होतात आणि 45-50 हजार मृत्युंची नोंद होते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

क्लिनिकल/नैदानिक चिकित्सेची चिन्हे आणि लक्षणे यात यांचा समावेश होतो :

 • जखमेच्या जागेवर दाताचे ठसे दिसतात.
 • जखमेतून रक्त येते.
 • सूज (चाव्याच्या जागेवर आणि अवयवावर सूज येते).
 • प्रभावित जागेच्या रंगात फरक दिसतो.
 • चक्कर येतात.
 • खूप घाम येतो.
 • हृदयाचे ठोके वाढतात.
 • वाढलेली हृदयाची गती.

पुढील कारणांपैकी एका कारणामुळे हे विष रक्तप्रवाहात प्रवेश करू शकत नाही:

 • सापाच्या दंशात विष नसते याला 'ड्राय बाईट' म्हणूनही ओळखले जाते.
 • संरक्षक कपडे किंवा बूट घातल्यामुळे सापाला चावा घेता येत नाही.
 • काही कमी गंभीर प्रकारांच्या बाबतीत सापाच्या विषाची गळती होऊन जाते.
 • कधीकधी दंश वरचेवर असतो आणि विष शरीरात प्रवेश करू शकत नाही.

याची मुख्य कारणं काय आहेत?

किंग कोब्रा, मण्यार, फुरसे आणि घोणस सारख्या सापांच्या चावण्याला सर्पदंश म्हणतात.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

सर्वात महत्वाच्या उपचार पद्धतीत विष प्रतिबंधक वापराचा समावेश असतो. मुख्य समस्या किंवा त्रुटी विशिष्टतेची कमतरता आहे. सर्पदंशाला आपत्कालीन घटना म्हणून विचारात घेणे नेहमीच योग्य असते कारण साप विषारी आहे की नाही याची खात्री करणे कठीण असते.

प्रथमोपचार म्हणून तुम्ही खालील गोष्टी करू शकता :

 • ज्या व्यक्तीला सापाने दंश केला आहे त्याला घाबरवण्यापेक्षा शांत करण्याचा प्रयत्न करावा, कारण घाबरल्यामुळे रक्ताभिसरण वेगाने होऊन विष संपूर्ण शरीरात पसरते.
 • चाव्याच्या जागा कोरड्या, सैल पट्टी किंवा कपड्याने झाका.
 • ज्या केंद्रात विष प्रतिरोधक त्वरित मिळू शकेल अशा ठिकाणी त्या व्यक्तीला लगेच हलवा.
 • चाव्याजवळ कापड किंवा टूर्निकेट बांधू नका, यामुळे परिसंचरण बंद होईल.
 • घाव धुवू नका.
 • घावावर बर्फ लावू नका.
 • जखमेतून विष शोषून घेण्याचा प्रयत्न करू नका.

सर्पदंशापासून वाचू शकतात, जर तुम्ही  :

 • दाट गवतांतून फिरण्यापूर्वी किंवा साहसी उपक्रमांना जाण्यापूर्वी जाड बूट आणि लांब पॅंट घातली.
 • रात्री मशाल/टॉर्च किंवा दिवा घेऊन बाहेर पडलात.
 • कोणताही खडक किंवा दगड हलवतांना किंवा स्वयंपाक करण्यासाठी लाकूड गोळा करतांना आणि डोंगराळ भागात फिरतांना किंवा लहान तलावात आणि नद्यात पोहतांना सावध रहिलात.
 • स्टोअर किंवा बेसमेंटमध्ये साप किंवा उंदीरांसाठी योग्य रीपेलेंट वापरले.
 • हालचाल न करणारा किंवा अर्धमेला वाटणारा साप पकडण्याचा प्रयत्न नाही केला.
 • त्यांना पाळीव प्राणी म्हणून ठेवणे टाळले.
 • झोपेच्या आधी नेहमीच तुमचे अंथरूण तपासले आणि जमिनीवर झोपणे टाळले.

योग्य उपाय आणि सावधगिरी बाळगल्यास सर्पदंश रोखला जाऊ शकतो. हे मृत्यू आणि विकृती कमी करू शकते आणि रोखू शकते.

 1. सर्पदंश साठी औषधे

सर्पदंश साठी औषधे

सर्पदंश के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
SBL Dibonil DropsSBL Dibonil Drops 84
SBL Gymnema sylvestre DilutionSBL Gymnema sylvestre Dilution 1000 CH86
SBL Hoang nan DilutionSBL Hoang nan Dilution 1000 CH86
Dr. Reckeweg Gymnema Sylvestre QDr. Reckeweg Gymnema Sylvestre Q 176
SBL Gymnema sylvestre Mother Tincture QSBL Gymnema sylvestre Mother Tincture Q 76
Snake Venom AntiserumSNAKE VENOM ANTISERUM IP 10ML480
Bjain Gymnema sylvestre DilutionBjain Gymnema sylvestre Dilution 1000 CH63
Schwabe Gymnema sylvestre CHSchwabe Gymnema sylvestre 1000 CH96
Bjain Gymnema sylvestre Mother Tincture QBjain Gymnema sylvestre Mother Tincture Q 143
Bjain Hoang nan DilutionBjain Hoang nan Dilution 1000 CH63
Schwabe Hoang nan CHSchwabe Hoang nan 1000 CH96
Schwabe Gymnema sylvestre MTSchwabe Gymnema sylvestre MT 68
Omeo Diabetes DropsOmeo Diabetes Drops 103
ADEL Gymnema sylvestre Mother Tincture QADEL Gymnema sylvestre Mother Tincture Q 184
Haslab Drox 7Haslab Drox 07 Diabet Drop133

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Boston Children's Hospital. Snake Bites Symptoms & Causes. U. S [Internet]
 2. Cleveland Clinic. [Internet]. Cleveland, Ohio. Snake Bites
 3. Jaideep C Menon et al. Venomous Snake Bite in India - Why do 50,000 Indians Die Every Year? 8 Journal of The Association of Physicians of India, Vol. 65, August 2017
 4. Syed Moied Ahmed et al. Emergency treatment of a snake bite: Pearls from literature . J Emerg Trauma Shock. 2008 Jul-Dec; 1(2): 97–105. PMID: 19561988
 5. SR Mehta, VSM, VK Sashindran. Clinical Features And Management Of Snake Bite . Med J Armed Forces India. 2002 Jul; 58(3): 247–249. PMID: 27407392
 6. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; How to Prevent or Respond to a Snake Bite
 7. National Health Portal [Internet] India; Directory Services / Anti-venom - snake and dog bite
और पढ़ें ...