आवळा एक सुप्रसिद्ध घरगुती नाव आणि भारतातील सर्वांत जुन्या आयुर्वेदिक औषधांपैकी एक आहे. भारतात या लहानशा हिरव्या फळाची माहिती असलेली व्यक्ती मिळणें कठीण आहे आणि जगभर त्याला इंडिअन गूझबॅरी म्हणून ओळखले जाते.

तुम्ही वनस्पतीप्रेमी असल्यास किंवा तुम्हाला घरगुती उपायांची आवड असल्यास, तुम्ही कधीतरी त्याच्या उपचारात्मक लाभकारी गुणाचा फायदा तुम्हाला झाला असेलच. अशा प्रतिजैविक आणि पोषक चांगुलपणापासून लांब राहणें अवघड आहे, जेव्हा ते एवढे सहज उपलब्ध आहे. आयुर्वेदिक डॉक्टरांचा दावा आहे की ते एंटीऑक्सिडेंट आणि पोषणाचे सर्वांत प्रचुर स्त्रोत आहे. वास्तविक, आमलकीचे अर्थ “आई” आणि “सांभाळणें” आहे, जे त्याच्या उपचारात्मक आणि संगोपनात्मक गुणधर्मांकडे इंगित करते.

अधिकतम महत्त्वपूर्ण आयुर्वेदिक ग्रंथ चरक संहिता आणि सुश्रुत संहिता यांनी त्याला पुनरुज्जीवक वनस्पती हे नाव दिले होते. हेच नसून, या फळाचे भारतीय धर्मशास्त्रांमध्ये महत्त्वाचे स्थान आहे, जिथे त्याला भगवान विष्णूंचे अश्रू म्हटले गेले आहे आणि वैष्णव तसेच शैव परंपरांमध्ये त्याच तोलाचे महत्त्व आहे. आवळ्याचे झाड आणि फळाची भारतात पूजा केली जाते. यामागील खूप जुन्या परंपरा आणि कारणे आहेत, पण आवळ्याचे लाभ आणि चांगले गुण बघितल्यास मला परत विचार करावेसा वाटतो.

आवळ्याचे काही मूळभूत गुणधर्म:

  • जीवशास्त्रीय नांव: फिलॅंथस एंब्लिका  किंवा एंब्लिका ऑफिसिनॅलिस
  • कुटुंब: फाइलॅंथेस; यूफॉर्बियासेस
  • सामान्य नांव: भारतीय गूझबॅरी, आवळा
  • संस्कृत नांव: धात्री, आमलक, आमलकी
  • वापरले जाणारे भाग: फळ (दोन्ही ताजे आणि सुकवलेले), बिया, देठ, पाने, फुले.
  • स्थानिक क्षेत्र आणि भौगोलिक वितरणआवळा भारताचे स्थानिक फळ आहे, पण ते चीन आणि मलेशियामध्येही वाढवले जाते.
  • तासीरआवळ्यामुळे शरिरातील सगळे तीन दोष कफ, पित्त आणि वात शमतात, असे मानले जाते. पण, आयुर्वेदिक वैद्यांचा दावा आहे की त्याचे एक निश्चित थंड करणारे कार्य आहे आणि घेतल्यास पोटात हलकेपणाच्या संवेदना जाणवतात आणि कोरडा प्रभाव पडतो.
  1. आवळ्याचे पोषक गुण - Nutritional qualities of Amla in Marathi
  2. आवळ्याचे आरोग्य फायदे - Health benefits of Amla (Indian Gooseberry) in Marathi
  3. आवळा कसा वापरावा - How to use Amla in Marathi
  4. आवळ्याची मात्रा - Amla dosage in Marathi
  5. आवळ्याचे सहप्रभाव - Amla side effects in Marathi
  • आवळा विटामिन सीचा एक चांगला स्त्रोत आहे. वास्तविक पाहता, ते या विटामिनच्या उच्चतम नैसर्गिक स्त्रोतांपैकी आहे आणि सर्वोत्तम भाग म्हणजे, आवळ्यामधील टॅनिन ( एक प्रकारचे नैसर्गिक यौगिक) फळावर स्वयंपाक किंवा प्रक्रिया केल्यानंतर तेथील सर्व विटामिन सी स्थिर ठेवतात.
  • आवळ्याचे फळ कॅल्शिअम, फॉस्फोरस आणि लौहासारख्या खनिजांचे चांगले स्त्रोत आहे, जे निरोगी हाडे आणि दात राखून ठेवण्यात मदत करतात.
  • आवळ्यामध्ये उपस्थित कॅरॉटीन आणि विटामिन ए दृष्टी आणि केसांच्या वाढीसाठी खूप लाभकारक आहे.
  • त्यामध्ये विटामिन ईसुद्धा असते, ज्याच्यामध्ये वयवाढरोधी आणि एंटीऑक्सिडेंट गुणधर्म आणि विटामिन बी कॉंप्लेक्स असतात, जे शरिरातील विविध कार्यांसाठी लाभकारक आहे.
  • आवळ्यामधील अधिक तंतुमय भाग आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टचे कार्य आणि उत्कर्षासाठी खूप उत्कृष्ट पदार्थ बनवतो.
myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Urjas Capsule by using 100% original and pure herbs of Ayurveda. This ayurvedic medicine has been recommended by our doctors to lakhs of people for sex problems with good results.
Long Time Capsule
₹719  ₹799  10% OFF
BUY NOW

आवळा एंटीऑक्सिडेंटच्या सर्वोत्तम वनस्पती स्त्रोतांपैकी एक आहे आणि त्याचे विषोन्मूलक गुणधर्म त्याला रामबाण लिव्हर टॉनिक बनवतात. कोणत्याही स्वरूपात आवळा नियमितपणें घेतल्याने शरिरातील सर्व विषारी पदार्थ निघून जातात, पण त्याच्या पुनरुज्जीवक आणि पोषक गुणधर्म अनेक शरिरातील अंगांना बळकट करतात उदा. स्प्लीनद्वारे लाल रक्तकोशिका आणि हॅमोग्लोबीन बनवणें, हॄदय आणि रोगप्रतिकार प्रणाली बळकट करणें. पण हे सर्व काही नव्हे. आवळ्यामध्ये अनेक खनिज आणि जीवनसत्त्वे असतात, ज्यांच्यामुळे तो शरिराच्या एकूण निरोगी कार्यासाठी खूप शक्तिशाली असतो. चला आपण आवळ्याचे काही आरोग्य फायदे पाहू.

  • विटामिन सीचे समृद्ध स्त्रोत: आवळा विटामिन सीच्या सर्वांत प्रचुर स्त्रोतांपैकी एक आहे. आपले शरीर हे विटामिन बनवू शकत नसल्याने, बाहेरील स्त्रोतापासून प्राप्त करणें महत्त्वाचे आहे. पर्याप्त विटामिन सी शरिराला कमतरता रोगांपासून सुरक्षित ठेवते उदा. स्कर्व्ही, ज्यामुळे हिरडे गडद आणि रक्तस्राव होणारे होतात.
  • नजर सुधारते: आवळ्यामध्ये विटामिन ए आणि बीटा कॅरॉटीनाइड्स असतात आणि हे दोन्ही पोषक तत्त्व डोळ्यांचे आरोग्य आणि दृष्टी राखून ठेवण्यासाठी कारणीभूत असतात. आवळ्यातील विटामिन सी डोळ्यांच्या स्नायूंना बळकट करते आणि वयसंबंधी डोळ्यांच्या विकारांना लांब ठेवते.
  • वजन कमी करण्यास वाव देणें: आवळा उत्कृष्टपणें वजन कमी करण्यास वाव देऊ शकतो. तो पचन आणि आपल्या शरिरातील विषारी कचर्र्याची निकासी सुधारून, बेहत्तर चयापचयाची हमी देतो. आवळ्याचे फळातील तंतू तुम्हाला अधिक जेवल्यापासून रोखतो आणि कॉलेस्टरॉलचे नाश वाढून तुमच्या शरिरातील वसाचा साठा विरघळवतो.
  • शौच प्रक्रिया नियमित करणे: आवळ्यामध्ये तंतू भरपूर मात्रेत असतात, जो आतड्यांत अन्नाचे प्रमाण वाढवतो आणि शौच प्रक्रिया नियमित करण्यास मदत करतो. तसेच, शरिरावरील त्याचे थंड करणारे प्रभाव गरम शरीर प्रकॄती असलेल्या लोकांच्या पोटात तात्कालिक जळजळ कमी करतो.
  • रोगप्रतिकार बळकट करतो: तुम्हाला माहीत आहे की आवळा तुमचे रोगप्रतिकार वाढवू शकतो? त्याच्यामध्ये विटामिन सी आणि एंटीऑक्सिडेंट भरपूर मात्रेत असतो, जे विविध रोगप्रतिकार प्रणाली कोशिकांच्या संप्रेरणात उपयोगी असल्याचे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे.
  • रक्त शुद्ध करतो: आवळा एक स्वयंसिद्ध विषाक्तता कमी करणारे पदार्थ आहे. ते तुमच्या रक्तातील अशुद्धता आणि अतिरिक्त फ्री रॅडिकल काढतो आणि त्याचवेळी तुमच्या रक्तकोशिकांना पोषण पुरवतो. त्याच वेळी, हे गुणधर्म रक्तकोशिकांची प्राणवायू वहन करण्याची क्षमता वाढवतात, ज्याने आरोग्य सुधारतो.
  • कॉलेस्टरॉल स्तर कमी होतो: अभ्यास दर्शवतात की आवळा घेतल्याने शरिरातील कॉलेस्टरॉल जमा होणें कमी होते आणि यकृताचे कार्य सुधारते, ज्याने फॅटीलिव्हर डिसीझ टाळली जाते. तसेच, त्यामध्ये क्रोमिअम खनिज असते, जे आर्टरीझमधील प्लाक जमा होणें आणि हॄदयविकाराच्या झटक्याचा धोका कमी होतो.
  • वयवाढ रोखली जाते: आवळ्यामध्ये फ्री रॅडिकलच्या क्षतीशी झगडण्यासाठी एंटीऑक्सिडेंटचे आर्सेनल असते, जे वेळेपूर्वी वयवाढीच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. नियमित आवळा ज्युस घेतल्याने वयवाढीची प्रक्रिया हळू होते आणि चेहर्र्यावरील सुरकुती आणि बारीक रेषा लांब पडतात.
  • लांब आणि चकाकदार केस पुरवतो: आयुर्वेदिक तज्ञांच्या सल्ल्याप्रमाणें आवळा आणि खोबरेल तेलचे मास्क तुमच्या केसांना पोषण देतात आणि आवळ्यातील एंटीऑक्सिडेंट वेळेपूर्वी केस पांढरे होणें टाळतात. असे ही प्रमाण हाती आले आहे की  आवळ्यामधील 5 अल्फा रिडक्टेझ केसगळती आणि पुरुषांमधील टक्कल पडणें टाळतात.
  • हाडे आणि दात सुरक्षित ठेवतो:  आवळ्याचे तुमच्या हाडांसाठी दुहेरी फायदे असतात. संशोधन अभ्यास सुचवतात की ते तुमच्या हाडांना कॅल्शिअम पुरवतात, जे हाडांची संरचना सांभाळून ठेवणें आणि त्याचवेळी ऑस्टिओक्लास्ट कार्य प्रदर्शित करून हाडांची क्षती टाळण्यासाठी महत्त्वाचे असते.
  • घसेदुखीमध्ये आराम देतो: आवळा आल्याबरोबर घेतल्यास घसेदुखीसाठी पारंपरिक औषध आहे. असे समजले जाते ही के या फळाच्या प्रतिकार संप्रेरक आणि पोषक गुणधर्मांमुळे असतो, ज्यामुळे संक्रमणाशी लढणें आणि घशातील मांसपेशी बळकट होणें सुलभ होते. याने पॅथोजेन बाहेर पडून वेदना लवकर बरी ही होते .

शौच प्रक्रियेचे नियामन करण्यासाठी आवळा - Amla for regulating bowel movement in Marathi

आवळ्यातील तंतू जेवणाचे प्रमाण वाढवते. पर्याप्त प्रमाणात पाण्याबरोबर घेतल्याने, मळ मऊ पडतो आणि शौच प्रक्रिया नियामित होते. तसेच, आवळ्यामध्ये आंतरिक शीतक गुणधर्म असतो, म्हणून तो तुम्हाला पोटातील कधीकधी होणार्र्या जळजळीच्या संवेदनेपासून मुक्त करतो. हे ऐरवी गरम शरीरप्रकाराच्या लोकांसाठी विशेषकरून चांगले आहे.

घसेदुखीसाठी आवळा - Amla for sore throat in Marathi

आवळा एक आंबट वनस्पती आहे, पण आश्चर्याची गोष्ट आहे की आयुर्वेदिक वैद्य आल्याच्या जोडीला आवळा ज्युस घेतल्याने घसेदुखीवर उपचार होते. आवळ्यामध्ये उपस्थित विटामिन सी खूप चांगले एंटीऑक्सिडेंट आहे, जे घसेदुखीसाठी जवाबदार अधिकतर किड्यांना मारण्याच्या शरिराच्या क्षमतेला सुधारते. तसेच त्याचे पोषक गुणधर्म घशाच्या मांसपेशींना बळकट करतात.

हाडे आणि दातांसाठी आवळा - Amla for bones and teeth in Marathi

आवळ्याचे ऑस्टिओक्लास्टचे एक नियामक प्रभाव असते, ते आपल्या शरिरातील हाडांच्या ह्रासासाठी जवाबदार कोशिका असतात. आवळा ज्युस किंवा पूड घेतल्याने या कोशिकांच्या कार्याची गती मंदावल्याचे समजले जाते. म्हणून, हाडे अधिक वेळ ताकदवान राहतात. तसेच, आवळा शरिरातील कॅल्शिअम अवशोषण वाढवतो आणि कॅल्शिअम ते खनिज आहे, जे आपल्या हाडांना व दातांना अधिक घनत्त्व आणि शक्ती देतो. म्हणून, तुमच्या आहारात आवळा सामील केल्याने न केवळ वयसंबंधी हाडांची तूट थांबेल, तर त्या बळकटही होतील.

केसांसाठी आवळा - Amla for hair in Marathi

आवळा अगदी प्राचीन किंवा आपल्याला माहीत नसलेल्या काळापासून लोकांमध्ये वापरले जात आहे. आवळ्याचे लाभ अधिक पिग्मेंटेड आणि चकाकदार केस मिळण्यात आहे, पण ते अधिकतर लोकांपासून लपलेले नव्हे. आयुर्वेदिक वैद्यांनी केस झडण्यासाठी आवळा आणि खोबरेल तेलच्या मिश्रणाचा सल्ला दिला आहे.

नियमित आवळा वापरणें किंवा स्थानिकरीत्या आवळ्याचे तेल लावल्याने हेअर फॉलिकल्सला पोषण मिळतो, ज्याने अधिक निरोगी आणि चमकदार केसांची वाढ होते आणि त्याचे एंटीऑक्सिडेंट गुणधर्म केसांची क्षतीची लक्षणे काढून केसगळती थांबते. आवळा तेल पुरुषांतील टक्कल पडण्यासाठी एक सिद्धहस्त उपाय आहे. हल्लीच्या अभ्यासात दावा केला गेला आहे की आवळा तेल 5 अल्फा रिडक्टेझचा शक्तिशाली नियामक आहे, जे पुरुषांतील केसगळतीच्या प्रमुख कारणांपैकी आहे.

वयवाढीसाठी आवळा - Amla for anti-aging in Marathi

या जगात, कुणाला चांगल्या पद्धतीने हळुवारपणें वय वाढलेले नको असते. प्रत्येकाच्या मनाच्या कोपर्र्यात तशी कायम तरुण राहण्याचीच इच्छा असते. तरुण दिसणारी त्वचा प्राप्त करणें स्वप्न बघण्याएवढेच सहज असते, तर ते सोयीस्कर झाले नसते का? फ्री रॅडिकलची क्षती आपल्या शरिरात होणार्र्या वयवाढ प्रक्रियांच्या सर्वांत मोठ्या कारणांपैकी एक आहे आणि दुर्दैवाने, तिला थांबवता येत नाही कारण ती शरिराच्या सामान्य चयापचय कार्यांचे परिणाम असते. दैनंदिन तणाव आणि आधुनिक जीवनशैली न केवळ या समस्येत भर घालतात, तर हाताळण्यास अशक्य करेपर्यंत त्याला बिघडवतात. फ्री रॅडिकल्सला सामोरे जाण्याची एकमेव पद्धत म्हणजे एंटीऑक्सिडेंटची चांगली मात्रा आणि चांगली बातमी ही आहे की ते उपलब्ध आहे. आवळा एक पोषक आणि एंटीऑक्सिडेंट फळ म्हणून न केवळ एंटीऑक्सिडेंत क्षती कमी करतो, तर त्वचेला त्यांतील विटामिन आणि पोषक तत्त्वांद्वारे पोषित आणि पुनरुज्जीवितही करतो, ज्यामुळे ती अधिक निरोगी आणि तरुण दिसते.

मधुमेहासाठी आवळा - Amla for diabetes in Marathi

नियमितपणें आवळा ज्युस घेतल्याने शरिरातील इंसुलिन निर्माण करणार्र्या कोशिका संप्रेरित होऊन शरिरात अधिक इंसुलिन निर्माण होतो. तसेच, हे हार्मोन शरिरातील ग्लुकोझ काढून यकृतात साठवतो, ज्यामुळे रक्तशर्करा स्तरामध्ये एकूण कपात होते. दैनंदिन आवळेपूड घेण्याच्या प्रभावांवर झालेल्या एका संशोधनामध्ये दिसून आले आहे की, ते मधुमेहाचय रुग्णांची रक्तशर्करा कमी करण्यासारखेच आहे आणि सर्वांत सामान्य मधुमेहरोधी औषध आहे.

आवळा कॉलेस्टरॉल कमी करतो - Amla reduces cholesterol in Marathi

अभ्यास दर्शवतात की कच्चा आवळा किंवा आवळेपूड याचे शरिरातील कॉलेस्टरॉल स्तरावर शक्तिशाली नियामक प्रभाव होतो. अजून एका संबंधित अभ्यासामध्ये, असा दावा केला गेला होता की शरिरातील कॉलेस्टरॉल स्तर कमी झाल्याने यकृतातील तणाव कमी होतो आणि मद्यपान न करणार्र्यांमध्ये, फॅटी लिव्हर डिसीझची कमी शक्यता असते. आवळ्यामधील क्रोमिअम रक्तनलिकांमधील प्लाक ( जमलेली वसा) काढण्यास मदत करते, ज्यामुळे आर्टेरिअल ब्लॉकेजच्या कारणाने होणार्र्या हॄदयविकाराच्या झटक्याचा धोका टळतो.

 (अधिक वाचा: उच्च कॉलेस्टरॉलवर उपचार)

रक्त शुद्ध करण्यासाठी आवळा - Amla for blood purification in Marathi

रक्त शरिरात कशाचेही हस्तांतरण आणि संचार करण्याचे मूळभूत माध्यम आहे. ते शरिराच्या अंगांना प्राणवायू आणि पोषण देण्यासाठी जवाबदार आहे आणि शरिरातील विषारी पदार्थ नष्ट करण्यास साहाय्य करते. जीवनशैली, औषधे आणि खाण्यापिण्याच्या सवयींचे आपल्या रक्ताची शुद्धता राखून ठेवण्यावर शक्तिशाली प्रभाव आहे आणि मधुमेहासारखे अधिकतर जंक फूड, तणाव किंवा रोगांचे रक्ताच्या शुद्धतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा सर्व समस्यांमुळे रक्ताच्या आंतरिक स्वच्छता प्रक्रियेचा वेग कमी होतो, आणि ते विषारी पदार्थांपासून भरून पुरळ, स्किन ब्लेमिश किंवा वेळेपूर्वी वयवाढीसारख्या परिस्थिती निर्माण होतात. रक्तातील विषारी पदार्थांचे अधिक प्रमाण शरिराच्या सर्व अंगांच्या सामान्य कार्यांमध्येही हस्तक्षेप करू शकते, ज्याने तुम्हाला संक्रमणांचा अधिक धोका पोचतो. आवळा एक उत्कृष्ट विषहारक आहे, ज्याचे अर्थ आहे की ते रक्तात उपस्थित अशुद्धतांना स्वच्छ करण्यासाठी खूप चांगले कारक आहे. एक डाययुरेटिक म्हणून, ते शरिरातील सर्व अतिरिक्त मीठ स्वच्छ करण्यास स्वच्छ करून रक्त स्वच्छ ठेवतो. तसेच, त्याचे पोषक प्रभाव प्राणवायू वहन करणार्र्या लाल रक्तकोशिका आणी हीलोग्लोबिनचे प्रमाण वाढवतो, जे संपूर्ण शरिरात प्राणवायूच्या बेहत्तर संचारासाठी चांगले असते. जसे की तुम्ही आधीच जाणता, जेवढे रक्तात प्राणवायूचे प्रमाण चांगले , तेवढेच शरिरातील अशुद्धता कमी.

रोगप्रतिकारासाठी आवळा - Amla for immunity in Marathi

आवळ्याचे एंटीऑक्सिडेंट गुणधर्म त्याला एक चांगला प्रतिकाररूपांतरक (प्रतिकार प्रणालीच्या कार्यांमध्ये सुधार करणें)बनवतो. नियमित आवळा घेतल्याने शरिरातील पांढर्र्या रक्तकोशिकांची (शरिरात प्रवेश करणार्र्या जिवाणूंना मारण्यासाठी जवाबदार) संख्या वाढते आणि अधिक जलद व प्रभावी प्रतिकार प्रतिसाद मिळतो.

(अधिक वाचा: प्रतिकार कसे सुधारावे )

वजन कमी करण्यासाठी आवळा - Amla for weight loss in Marathi

पचनतंत्राचे अयोग्य कार्य वजन वाढण्याच्या सर्वांत सामान्य कारणांपैकी एक आहे. अतिरिक्त अन्न काढण्यास अक्षमता किंवा पोषक तत्त्वे शोषित घेण्यास अक्षमता असल्यास, कशामुळेही शरिरातील अत्यावश्यक वजन जमा होऊ शकतो. अशा अनेक पद्धती आहेत, ज्यामध्ये आवळा अतिरिक्त वजन कमी करण्यास आणि हलके व आरामदेह वाटण्यास मदत करते. प्रथम, हे एक डाययुरेटिक आहे, म्हणजेच तुमच्या शरिरातील अतिरिक्त पाणी आणि मीठ काढण्यास मदत करते, ज्यामध्ये अतिरिक्त वजनाचा एक मोठा भाग असतो. तसेच, आवळा तंतूंचे एक चांगले स्त्रोत आहे, ज्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते आणि जेवण कमी होतो. यामुळे, एकूण खाद्य पदार्थ ग्रहण करण्याचे प्रमाण कमी होते आणि जेवणांमधील वेळेचा अवधी वाढतो. शेवटी, ते तुमच्या पोटाला अन्न सहजपणें पचवण्यास मदत करते आणि रक्ताला पोषक अजून हस्तांतरित होतात, म्हणून तुमच्या शरिराला दैनंदिन कार्यासाठी अधिक पोषण देतो. मग तुम्ही कशाची वाट पाहत आहात? हे फळ तुमच्या आहारात सामील करा आणि अधिक त्रास न होता अतिरिक्त वजनापासून मुक्ती मिळवा.

 (अधिक वाचा: वजनी करण्यासाठी आहारतालिका)

आवळ्याने दृष्टी सुधारते - Amla improves eyesight in Marathi

तुम्ही तुमची धुळसर दृष्टी आणि जड चस्म्यापासून थकून गेलेले आहात का? तुमचे मित्र तुम्हाला कॉंटेक्ट लेंसेझचा सल्ला देत आहेत आणि लेझर तुम्हाला थोडे घाबरवतात का? आवळा कॅरोटॅनॉयड्स आणि विटामिन एचे एक चांगले स्त्रोत समजले जाते, जे एक चांगल्या नजरेसाठी जवाबदार खूप महत्त्वाचे घटक आहेत. तसेच, आवळ्यामधील विटामिन सीचे आपल्या डोळ्यांतील रेटिना कोशिकांवर संप्रेरक प्रभाव होते. म्हणून, यात काहीच आश्चर्य नाही की आवळ्यामधील विटामिन सी खराब नजरेवर उपचार करणें आणि डोळ्यांच्या समस्या टाळण्यासाथी आयुर्वेदिक वैद्यांद्वारे सुचवलेल्या सर्वोत्तम उपायांपैकी आहे. दिवसात दोनदा आवळ्या ज्युसमुळे नजर सुधारण्यावर लाभकारी प्रभाव झाल्याचे समजतात.

आवळा विटामिन सीचे समृद्ध स्त्रोत आहे - Amla is a rich source of Vitamin C in Marathi

आवळा विटामिन सीच्या सर्वोत्तम नैसर्गिक स्त्रोतांपैकी एक आहे. वास्तविक, त्यामध्ये संत्र्यापेक्षा  20-30 पट अधिक विटामिन सी असतो. मानवी शरिरामध्ये आपले स्वतःचे विटामिन सी उद्भवत नसल्याने, शरिरातील या विटामिनची गरज पूर्ववत करण्यासाठी आहारातील पूरक तत्त्व महत्त्वाचे आहे. स्कर्वीचे नियंत्रण, जी शरिरातील विटामिन सीच्या कमतरतेशी संबद्ध स्थिती आहे आणि त्यामध्ये हिरडे गडद आणि रक्तस्राव होणारे होतात, आवळा नियमितपणें घेतल्याने होऊ शकते.

आवळ्याच्या झाडाला वसंतामध्ये फळे लागतात. कच्ची फळे हिरवेसर पिवळे असतात, जे पिकल्यावर तपकिरी-सोनेरी रंग घेतात. हे फळ कच्चेसुद्धा खाता येते, पण कच्च्या अवस्थेत ते कडू असतात आणि त्याची चव प्रत्येकाला आवडत नाही. सुदैवाने, विविध आवळा उत्पादने व्यावसायिकरीत्या उपलब्ध असतात, पण तुम्ही विकत घेत असलेल्या कोणत्याही उत्पादनाची गुणवत्ता तपासण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शर्करा आणि सुगंधी टाकलेल्या असतात ज्यांच्या चांगल्यापेक्षा वाईट प्रभाव असतो. सर्वांत सामान्य स्वरूप ज्यामध्ये तुम्ही आवळा विकत घेऊ शकता, त्यामध्ये आवळा मुरब्बा, कॅंडी, टॅबलेट आणि कॅप्स्युल, आवळा ज्युस, चटणी, जॅम आणि तेल सामील आहेत. ते त्रिफळा आणि च्यवनप्राशामधील (दोन खूप सामान्य आयुर्वेदिक मिश्रण) प्रमुख घटकांपैकी एक आहे। तरीही, तुम्हाला स्वयंपाक आणि नैसर्गिक घरगुती उपायांची आवड असल्यास, तुम्ही अगदी शून्यातून घरी काही पदार्थ बनवू शकता. मज्जाच आहे ना.

आवळा वापरण्याच्या तीन सोप्या आणी लाभकारक पद्धती आपण पाहू:

  • आवळा ज्युस- 
    आवळा ज्युस बनवण्यासाठी, काही आवळ्यांमधून बिया वेगळे करून मिक्सरमध्ये दळून त्यांचा बारीक पेस्ट बनवा. मिक्सरमध्ये थोडे पाणी टाका ( तुमची चव आणि आवश्यक जाडीप्रमाणे) आणि परत दळा. छाननी करून त्याला एका जगमध्ये टाका. तुम्ही काळी मिरी, आले किंवा सिलॅंट्रो चवीसाठी टाकू शकता. शेफ म्हणतात की ताजे आवळा ज्युस कोणतेही जोडी प्रेसर्व्हेटिव्ह न टाकता आठवडाभर फ्रिजमध्ये ताजे राहतात. पण ताजेपणाची पुष्टी करण्यासाठी सुगंध किंवा कोणतीही अनियमित वाढ तपासून घ्या. एक महिन्यापर्यंत ज्ज्युस ताजे ठेवण्यासाठी सोडिअम लॅक्टेट नावाचे प्रेझर्व्हेटिव्ह सुरक्षितपणें वापरले जाऊ शकते.
  • आवळा चटणी -
    आवळा चटणी बनवणें आवळा ज्युस बनवण्यासारखेच असते. बॅरीमधून बिया परत केल्यानंतर, त्यांना ग्राइंडरमध्ये ठेवा आणि आले, मीठ चवीसाठी आणि सिलॅंट्रो टाका. पेस्ट बनवण्यासाठी त्याला दळा आणि एका जारमध्ये ठेवा. थोड्या तेलने कव्हर करून त्याला सुरक्षित आणि फ्रिजमध्ये ठेवा. आवळा चटणी  फ्रिजमध्ये अंदाजे एक महिना ताजी राहते.
  • आवळा तेल -
    पूर्ण एक आवळा खोबरेल तेलाने भरलेले कंटेनर/जारमध्ये टाकून आणि त्याला आठवडाभर सूर्याखाली ठेवून देऊन आवळा तेल घरी सहज बनवता येतो. पर्याप्त आवळे टाकून जवळपास जार भरले पाहिजे आणि तेल वरपर्यंत आले पाहिजे.  4-5 दिवसांनंतर तपासून घ्या, कि तिथे काही अनियमित किंवा बुरशीची वाढ तर झालेली नाही. त्याच पद्धतीने, आवळा योग्यपणें धुऊन त्याच्या थरावर स्थित धूळ किंवा जिवाणू काढण्यासाठी सुकवले पाहिजे. तेल बनवण्यासाठी आवळ्याची पूड आणि सुकलेला आवळा दोन्ही वापरता येतात. वांछित वेळेनंतर, तुम्ही आवळे वेगळे करायला तेलाची छाननी करू शकता किंवा वरून तेल वापरत राहू शकता. जोपर्यंत फळामध्ये पोषक तत्त्वे आणि तेल निघत राहतील, तेल बळकटही होत राहील.

पर्यायाने, तुम्ही खोबरेल तेलामध्ये आवळा ज्युस मिसळून ते हलक्या तापावर काही मिनिटे गरम करून दोन्ही द्रव्ये आपापसात मिसळू शकता. एखाद्या मिनटानंतर ताप थांबवा आणि थेट कातडी किंवा डोक्याच्या कातडीवर लावा/

आवळ्याचे फळ कच्चे घेतले जाऊ शकताता, पण आवळेपूड आवळा घेण्याच्या सर्वांत सामान्य आणि सहज पद्धतींपैकी एक आहे. सामान्यपणें, प्रतीदिन एक चहाचा चमचा मात्रा रिकामेपोटी घेण्याचा सल्ला दिला जातो. काही आयुर्वेदिक वैद्य प्रत्येक जेवणापूर्वी आवळा घेण्याचा सल्ला देतात. असे सांगितले जातेकी आवळ्या घेतल्याने जेवण चांगल्या पद्धतीने पचणें सोपे जाते. आवळा मधामध्ये मिसळला जाऊ शकतो किंवा आल्याबरोबर घेतल्यानेही घसेदुखी बरी होते. आवळा तेल केसवाढ आणि वेळेपूर्वी केसांची गळती थांबवण्यासाठी खूप चांगला असतो. आवळा तेल केसांसाठी अधिक लाभकारक बनवण्यासाठी शिकाकाई किंवा बादाम तेलाबरोबर मिसळले जाऊ शकते.

तरीही, आवळ्याची योग्य मात्रा व्यक्तीचे वय, लिंग आणि आरोग्य परिस्थितींवर अवलंबून असते. पर्यावरणीय घटकसुद्धा या फळाची मात्रा आणि खपतीमध्ये चांगली भूमिका निभावतात. म्हणून, उपाय म्हणून आवळा घेण्यापूर्वी आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेणें चांगले राहील. 

myUpchar doctors after many years of research have created myUpchar Ayurveda Kesh Art Hair Oil by using 100% original and pure herbs of Ayurveda. This Ayurvedic medicine has been recommended by our doctors to more than 1 lakh people for multiple hair problems (hair fall, gray hair, and dandruff) with good results.
Bhringraj Hair Oil
₹599  ₹850  29% OFF
BUY NOW
  • अत्यधिक प्रमाणात आवळा घेतल्याने बद्धकोष्ठतेत मदत मिळण्याऐवजी ती बळावू शकते आणि अधिक पाणी न घेतल्याने पोटाच्या आरोग्यावर अधिक विपरीत परिणाम होतात, कारण पाणी कमी असल्याने आवळ्यामधील तंतू कडक होऊन आतड्या चोक होतात.
  • विटामिन सी प्रचुर अन्नांना संवेदनशीलता आधीच असल्यास आवळा घेण्याचा सल्ला दिला जात नाही.
  • तुम्हाला सामान्यपणें कमी रक्तशर्करा असल्यास किंवा मधुमेहासाठी विहित औषधी तुम्ही घेत असल्यास, कोणत्याही स्वरूपात आवळा घेण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांकडून तपासणें बेहत्तर असते, कारण ते नैसर्गिक हायपोग्लायसीमिक ( रक्तशर्करा कमी करते) असतात आणि औषधाच्या कार्यात हस्तक्षेप करू शकतात.
  • सामान्यपेक्षा कमी प्रमाणात पाण्याबरोबर नियमित आवळा घेतल्याने आरोग्यावर विपरीत प्रभाव पडू शकतो, कारण आवळा एक नैसर्गिक डाययुरेटिक असते, म्हणजेच त्यामुळे तुमच्या शरिरातील पाणी त्वरित कमी होतो. म्हणून तुम्ही आहारात आवळा जोडल्यास तुमच्या शरिरात पाणी राखून ठेवण्यासाठी ते खूप चांगले आहे.
  • गरोदर महिलांवर आवळ्याच्या प्रभावाचे अद्याप कोणतेही प्रमाण नाही. म्हणून, तुम्ही गरोदर असल्यास, तुमच्या दिनक्रमामध्ये आवळा घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेतलेला चांगला.
  • आवळ्याच्या नैसर्गिक शीतक प्रभाव त्याला सामान्य पडशापासून पीडित लोकांच्या वापरासाठी अयोग्य असते.

Medicines / Products that contain Amla

संदर्भ

  1. UAB Department of Anthropology [Internet] Amla Fruit in India
  2. Manayath Damodaran, Kesavapillai Ramakrishnan Nair. A tannin from the Indian gooseberry (Phyllanthus emblica) with a protective action on ascorbic acid. Biochem J. 1936 Jun; 30(6): 1014–1020. PMID: 16746112
  3. Guy Drouin, Jean-Rémi Godin, Benoît Pagé. The Genetics of Vitamin C Loss in Vertebrates. Curr Genomics. 2011 Aug; 12(5): 371–378. PMID: 22294879
  4. Krishnaveni M1, Mirunalini S. Therapeutic potential of Phyllanthus emblica (amla): the ayurvedic wonder.. J Basic Clin Physiol Pharmacol. 2010;21(1):93-105. PMID: 20506691
  5. National Health Portal [Internet] India; Amla
Read on app