myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

सारांश

घसेदुखी मुले तसेच प्रौढांमध्ये आढळून येणारे असे एक लक्षण आहे. उपचार करणारे डॉक्टर बाह्य रुग्ण विभागात उपचार करतात, अशी ही सर्वांत सामान्य परिस्थितींपैकी एक आहे. घसे दुखण्याला कारणीभूत असणारे जिवाणू व तसेच विषाणू यांसारखे २०० पेक्षा अधिक सूक्ष्म जीव आहेत. तीव्र घसेदुखी संक्रमण किंवा पुनर्संक्रमण होण्याचा धोका खूप अधिक असलेल्या क्षेत्रांत राहणार्र्या मुलांमध्ये खूप सामान्य आहे. अशा जागांचे उदाहरण म्हणजे गर्दीच्या जागा किंवा खराब आवास परिस्थिती असलेले ठिकाण. घसेदुखीचे सर्वांत सामान्य कारण म्हणजे फ्लू किंवा सामान्य सर्दी. जिवाणू व विषाणू यांपासून होणारे संक्रमण वायूद्वारे, व त्यापुढे बहुतांशी संक्रामित व्यक्तीच्या नाकातील किंवा लाळेतील गळतींमुळे, एका व्यक्तीपासून दुसर्र्या व्यक्तीत पसरतात. गर्दीचे ठिकाण, घाण, अस्वच्छ पद्धतीने अन्न हाताळणें, रासायनिक पदार्थांना अनावरण, धूर आणि खाजकारक पदार्थ घसेदुखीची कारणे ठरू शकतात. घसेदुखीमध्ये गिळणें कठिन होणें यासह, ताप, ओरखडा किंवा डोकेदुखींसारखी लक्षणे सोबत दिसू शकतात.

घसेदुखीच्या वास्तविक कारणाचे मूल्यांकन करण्यासाठी विस्तृत वैद्यकीय इतिहास जाणून घेणें महत्त्वाचे असते, कारण तिची अनेकविध कारणे असू शकतात. घसेदुखीची अधिकतम प्रकरणे कोणत्याही औषधोपचाराशिवाय बरे होतात, पण अनेक व्यक्तींना जंतूनाशकांच्या क्रमाची गरज पडू शकते. स्ट्रेप्टोकॉकस जिवाणूमुळे होणार्र्या घसेदुखीचे उपचार पुढील जटिल समस्या टाळण्यासाठी गरजेचे असते. घसेदुखीच्या जटिलता १% प्रकरणांमध्ये दिसू शकते, जे यावर अवलंबून नसते, की रुग्णाने जंतूनाशकांचा क्रम (उपचाराकरिता) उपलब्ध होण्यास उशीर झाले आहे अथवा नाही.

 1. घसा दुखणे ची लक्षणे - Symptoms of Sore Throat in Marathi
 2. घसा दुखणे चा उपचार - Treatment of Sore Throat in Marathi
 3. घसा दुखणे काय आहे - What is Sore Throat in Marathi
 4. घसा दुखणे साठी औषधे
 5. घसा दुखणे चे डॉक्टर

घसा दुखणे ची लक्षणे - Symptoms of Sore Throat in Marathi

कारणाप्रमाणे, घसेदुखीची लक्षणे व चिन्हे वेगवेगळी असू शकतात, उदा. :

घसेदुखीच्या वर नमूद सामान्य तक्रारींसोबत, इतरही असू शकतात, उदा. :

घसा दुखणे चा उपचार - Treatment of Sore Throat in Marathi

 • वेदनाशामक आणि तापशामक
  जिवाणूंमुळे होणारी घसेदुखी ५ ते ७ दिवसांमध्ये कमी होते. काही वेळेस, वेदना व ताप यासारखी तीव्र लक्षणे सौम्य वेदनाशामक व तापशामकांद्वारे हाताळली जाऊ शकतात. मुलांमध्ये योग्य मात्रेबद्दल डॉक्टरांचा सल्ला घेऊन सहज उपलब्ध औषधे दिली जाऊ शकतात, जे मुलाचे वय, उंची व वजनावर आधारित असते. किशोरवयीन मुलांना घसेदुखी किंवा फ्लूसारखी लक्षणे असल्यास, एस्पिरिनसारखी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय देऊ नये, कारण त्यामुळे तीव्र जटिल समस्या निर्माण होऊ शकतात.
 • जंतूनाशक
  घसेदुखी जिवाणूजन्य संक्रमणामुळे झालेले असल्यास, जंतूनाशकांच्या क्रमाचा सल्ला डॉक्टराद्वारे दिला जाईल. संपूर्ण लक्षणे शमल्यानंतरही औषधांचे सबंध क्रम पूर्ण करणे हितावह असेल. औषधांना सूचनांप्रमाणें घेतले नसल्यास, संक्रमण परत घडू शकते किंवा शरिराच्या इतर भागांमध्ये पसरू शकते. विशेषकरून स्ट्रेप थ्रोट (स्टेप्टोकॉकल संक्रमणाद्वारे मुलांना झालेली घसेदुखी) असलेल्या मुलांचा जंतूनाशकांचा संपूर्ण क्रम मधेच सोडल्यास, मूत्रपिंडाचे आजार किंवा संधीवात होण्याचा धोका वाढतो.
 • अन्य औषधे
  अंतर्निर्हित वैद्यकीय परिस्थितीमुळे घसेदुखी झाल्यास, उपचार वेगवेगळे असू शकतात आणि विशिष्ट आजारावर अवलंबून असतात.

जीवनशैली व्यवस्थापन

 • औषधांसह, घसेदुखीपासून तात्काळिक आराम मिळण्यासाठी आजींच्या बटव्यातील या टिपण्या मदत करू शकतात:
 • भरपूर विश्रांती घ्या आणि तुमच्या आवाजालाही विश्रांती द्या.
 • घसा आर्द्र ठेवण्यासाठी भरपूर तरळ पदार्थ घ्या. कॉफी व मद्यामुळे कंठ सुकत असल्यामुळे, ते टाळा.
 • घसा मऊ ठेवण्यासाठी सूप, कढण आणि गरम पाण्यासारखे गरम तरळ पदार्थ घ्या.
 • कोमट मिठपाणीची गुळण्या दिवसातून  ३-४ वेळा केल्यासही मदत होते.
 • लक्षणे शमवण्यासाठी थ्रोट लोझेंजेस (हिर्र्याच्या आकाराच्या गोळ्या) चुषा, पण मुलांना ते देतांना काळजी घ्या आणि कारण ते घेतल्याने त्यांना गुदमरण्याचा धोका असतो.
 • घशात त्रास करू शकणारी पदार्थे उदा. सिगारेटचे धूर, ऊदबत्त्या आणि तीव्र वास असलेले पदार्थ टाळा.
 • पर्यायी उपचार उदा. वनस्पतीजन्य औषधे, चहा, लिकोराइस, मार्शमॅलोची मुळे आणि चिनी वनस्पतीही मदतशीर असतात. पर्यायी उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.        

घसा दुखणे काय आहे - What is Sore Throat in Marathi

घसेदुखी सर्व वयोगटांच्या मुलामध्ये आढळून येणारे एक खूप सामान्य लक्षण आहे. या परिस्थितीमध्ये घसा लालसर पडून त्यात जळजळ होते व त्यामुळे व्यक्तीला अन्न गिळणें कठीण होऊन बसते. घसेदुखीच्या तीव्रतेची कारणे विषाणू असू शकतात, तरी ते जिवाणू किंवा इतर संक्रामक घटकेही असू शकतील. घसेदुखीचे कारणीभूत जिवाणूचे एक महत्त्वपूर्ण समूह म्हणजे ग्रुप ए स्ट्रेप्टोकॉकस (गॅस), जे मुलांच्या १५ ते २०% प्रकरणांमध्ये दिसून येते. भारतातही, गॅसची प्रकरणे ११ ते ३४ टक्के असतात.

Dr. K. K. Handa

Dr. K. K. Handa

कान, नाक और गले सम्बन्धी विकारों का विज्ञान

Dr. Aru Chhabra Handa

Dr. Aru Chhabra Handa

कान, नाक और गले सम्बन्धी विकारों का विज्ञान

Dr. Yogesh Parmar

Dr. Yogesh Parmar

कान, नाक और गले सम्बन्धी विकारों का विज्ञान

घसा दुखणे की जांच का लैब टेस्ट करवाएं

H1N1 Test

20% छूट + 10% कैशबैक

CBC (Complete Blood Count)

20% छूट + 10% कैशबैक

CULTURE AEROBIC & SUSCEPTIBILITY, SPUTUM

20% छूट + 10% कैशबैक

घसा दुखणे साठी औषधे

घसा दुखणे के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Otorex खरीदें
Rite O Cef खरीदें
Extacef खरीदें
Ceftas खरीदें
Milixim खरीदें
Zifi खरीदें
Rite O Cef Cv खरीदें
Vitaresp Fx खरीदें
Throatsil खरीदें
Allegra खरीदें
Strepsils खरीदें
Gramocef Cv खरीदें
Taxim O खरीदें
Ritolide 250 Mg Tablet खरीदें
Revobacto खरीदें
Pid खरीदें
Traxof खरीदें
Qucef (Dr Cure) खरीदें
Vicocef O खरीदें
Quix खरीदें
Vilcocef O खरीदें
Alt FM खरीदें
Fexo खरीदें
Quix Cd खरीदें
Afix LB खरीदें

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. Nandi S, Kumar R, Ray P, Vohra H, Ganguly NK. Group A streptococcal sore throat in a periurban population of northern India: a one-year prospective study.. Departments of Experimental Medicine and Biotechnology, Postgraduate Institute of Medical Education and Research (PGIMER), Chandigarh, India. Bull World Health Organ. 2001;79(6):528-33. PMID: 11436474
 2. Am Fam Physician. 2004 Mar 15;69(6):1465-1470. [Internet] American Academy of Family Physicians; Pharyngitis.
 3. ENT Health [Internet]. American Academy of Otolaryngology–Head and Neck Surgery Foundation; Sore Throats.
 4. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Strep Throat
 5. The Merck Manual of Diagnosis and Therapy [internet]. US; Sore Throat
 6. Huang Y, Wu T, Zeng L, Li S. Chinese medicinal herbs for sore throat. Cochrane Database Syst Rev. 2012 Mar 14;(3):CD004877. PMID: 22419300.
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें