फॅटी लिव्हर - Fatty Liver in Marathi

Dr. Rajalakshmi VK (AIIMS)MBBS

January 27, 2019

March 06, 2020

फॅटी लिव्हर
फॅटी लिव्हर

सारांश

चरबीयुक्त यकृताचा विकार हा एक असा आजार आहे ज्यात यकृतामधे अती प्रमाणात चरबी जमा होते. हा दोन प्रकारांत विभागला गेला आहे.अत्यधिक मद्यापानाने यकृतात चरबी जमा होऊन झालेला आजार,आणि मद्यपान न करता ही यकृतात चरबी जमा होण्यामुळे झालेला आजार (एनएएफएलडी). एनएएफएलडीचे अचूक कारण अज्ञात आहेत.तथापि, ते इंसुलिन प्रतिरोधक आणि चयापचयनाच्या विकारांशी संबंधित आहे. एनएएफएलडी ही पाश्चात्य जगावर परिणाम करणारी सर्वात सामान्य यकृत अवस्था आहे. हा आजार वाढत्या यकृता व्यतिरिक्त इतर कोणत्याही लक्षणांशिवाय अस्तित्वात असू शकतो, किंवा अचानक गंभीर लक्षणे दिसू शकतात ज्यासाठी तत्काळ वैद्यकीय सेवा आवश्यक आहे.कधी कधी यकृत पूर्णपणे बंद होण्याचे संकेत मिळतात. आजाराच्या प्रगतीस प्रतीबंध,प्रगतीवरील ताबा मिळविण्यासाठी आणि पूर्वीच्या स्थितीत आणण्यासाठी, वेळेवर निदान आणि सेवा मिळणे महत्वाचे आहे. वर्तमानकाळात उपचारांचा हेतू वजन कमी करून आणि व्यायामाच्या मदतीने यकृताच्या आरोग्याचे व्यवस्थापन करण्याचा असतो. अनेक साहाय्यक औषधे येऊ घातले असून या आजारासाठी सध्यातरी कुठलेही मान्यताप्राप्त औषध नाही. अधिक गंभीर परिस्थितीत शस्त्रक्रिया आवश्यक आहे.

फॅटी लिव्हर काय आहे - What is Fatty Liver in Marathi

मद्य-रहित चरबीयूक्त यकृत आजाराचे (एनएएफएलडी), लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या अवस्थांमधील, वाढणे सामान्य आहे. हा आजार भारतीय लोकसंख्येच्या 9 ते 32%लोकांना प्रभावित करतो आणि लठ्ठ व मधुमेही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. वृद्ध  व्यक्तींमध्ये हा रोग अधिक आढळतो. भारतीय लोकसंख्येवर केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की, 61 ते 70 वर्षे वयोगटात मद्य-रहित यकृत आजार असलेली 61.8% रुग्णे आहेत. एनएएफएलडीचे व्यवस्थापन असे एकमेव आहे ज्यात सामान्यत:जीवनशैलीतील बदल सुचवले जातात उदा. वजन कमी करणे, शारीरिक क्रिया वाढवणे आणि आहारातील योग्य बदल. या अवस्थेसाठी कोणतीही ठराविक औषधे नाहीत. शारीरिक हालचाली थोड्याच  वाढवल्याने स्वागतार्ह बदल दिसून आला आहे. एरोबिक क्रिया आणि प्रतिरोध प्रशिक्षण किंवा बळकटी प्रशिक्षण देखील उपयुक्त आहेत.

चरबीयुक्त यकृत आजार काय आहे?

यकृत सर्वात मोठ्या आंतरिक अवयवांपैकी एक आहे. हे आपल्याला खाद्य पचविणे, आपल्या शरीरातून विष काढून टाकणे यात मदत करते आणि आपल्या शरीरात ऊर्जा साठविण्यास मदत करते. यकृतात चरबी तयार होणे हे चरबीयुक्त यकृत आजार नावाच्या अवस्थेला कारणीभूत ठरते. सामान्यत: आपल्या यकृतामध्ये थोडी चरबी असते ज्याची लक्षणे दिसून येत नहीत. तथापि, यकृतामधे चरबीचा अतिरिक्त संचय झाल्यास सूज येऊ शकते. या अवस्थेस चरबीयुक्त यकृत आजार असे म्हणतात.

फॅटी लिव्हर ची लक्षणे - Symptoms of Fatty Liver in Marathi

चरबीयुक्त यकृत हा एक सुप्त आजार आहे आणि यामध्ये कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत.ही अवस्था असलेल्या व्यक्तीमधे सामान्यपणे थकवा येण्याची आणि पोटाच्या वरच्या उजव्या बाजूला थोडासा त्रास असण्याची शक्यता असते. बहुतेक लोकांमध्ये, हा आजार दर्शविणारी स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत.

जेव्हा चरबीयुक्त यकृत, सूज आणि क्षतीची चिन्हे दिसण्यास सुरुवात होते तेव्हाच या अवस्थेची लक्षणे दिसू शकतात. ही लक्षणे सिरोसिस आजाराची (यकृताच्या अपरिवर्तनीय व्रणांमुळे झालेली यकृतक्षती), जसे काविळाची चिन्हे असतात तशी दर्शवू शकतात. त्वचा आणि डोळ्याचे पांढरे भाग पिवळे होऊ शकतात, जे आजार दर्शविते. यकृताच्या क्षतीचे आणखी एक लक्षण म्हणजे एसायटीस आणि एडीमा, जे शरीराच्या तंतूंमधे द्रवपदार्थांचे असामान्य संग्रह असते.

शारिरिक तपासणीदरम्यान आपल्या डॉक्टरांना यकृताचा ताठरपणा देखील लक्ष्यात यईल. ताठरपणा हे फायब्रोसिसचे किंवा यकृताच्या व्रणांचे सूचक असू शकते.

यकृताला झालेल्या क्षतीने आजार बळावतो आणि मानसिक गोंधळ वाढतो.

फॅटी लिव्हर चा उपचार - Treatment of Fatty Liver in Marathi

वेगवेगळ्या प्रकारांनुसार चरबीयुक्त यकृत आजाराचे व्यवस्थापन खालील प्रमाणे आहे:

मद्यरहीत चरबीयुक्त यकृत आजार

मद्य-रहीत स्टीटोहेपाटायटीस (नॅश) किंवा मद्य-रहित चरबीयुक्त यकृताच्या आजारासाठी(एनएएफएलडी) कोणतेही अंतिम औषधोपचार नाही.

 • या अवस्थेचे निदान झालेल्यांना वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो. वजन कमी होण्याने यकृतातील चरबीचा संचय कमी होण्यात मदत होते ज्याने सूज आणि फायब्रोसिस कमी होते.
 • शारीरिक क्रिया वाढवल्याने यकृतातील चरबी सहित संपूर्ण शरीरातील चरबी कमी होते आणि म्हणूनयाआजाराच्या अवस्थेतही मदत होते. अभ्यासात असे दिसून आले आहे की क्रियाशीलता  सुचवीलेली असेल त्याहून थोडी कमी असली तरीही,केवळसक्रिय असणेहा,NALDF वर उपयुक्त प्रभाव टाकते.
 • डॉक्टरतुम्ही घेत असलेल्या औषधांचे मूल्यांकन करून तुम्हाला काही औषधे बदलण्याचे किंवा थांबविण्याचे सुचवू शकतात. आपल्या डॉक्टरांच्या परवानगीशिवाय, स्वत: कोणतेही औषधे घेणे थांबवू नका कारण त्याने इतर गंभीर अवस्था संभावतात आणि हे आपल्या आरोग्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते.
 • (एनएएफएलडी)वर उपचार करण्यासाठी कोणतेही मान्यताप्राप्त औषधनाही परंतु हे समजणे आवश्यक आहे की मधुमेह आणि जीवनसत्त्वाच्या उपचारांसाठी वापरल्या जाणारी काही औषधे या अवस्थेत मदत करू शकतात. तथापि, कोणताही निष्कर्ष काढण्यापूर्वी पुढील संशोधन आवश्यक आहे.

मद्यामुळे होणारा चरबीयुक्त यकृताचा आजार

 • मद्यामुळे होणारा चरबीयुक्त यकृताच्या आजारात सर्वात महत्वाचा उपचार म्हणजे मद्यपान पूर्णपणे सोडणें. मद्यपान थांबविण्यातही समस्या असलेल्या लोकांसाठी उपाय सुचविले जाऊ शकतात.
 • काही औषधे,मद्यपान करीत असताना तुम्हाला आजारी असल्यासारखा अनुभव देऊन किंवा मद्यपानाची तीव्र इच्छा कमी करून मद्यपान थांबविण्यास मदत करतात.

जीवनशैली व्यवस्थापन

चरबीयुक्त यकृत रोगाचे निदान झाल्यास, जीवनशैलीतील काही बदल तुम्हाला ही अवस्था अधिक प्रभावीपणे हाताळण्यात मदत करू शकतात. यात समाविष्ट आहेत:

 • आपल्या आहाराचे तीन-चतुर्थांश भाग ताजी फळे आणि भाज्या असायला हवे. अधिक प्रमाणातील साखर आणि मीठ टाळा आणि प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थां ऐवजी संपूर्ण धान्य निवडा.
 • संतृप्त चरबीयूक्त आणि ट्रान्सचरबीयूक्त खाद्यपदार्थांचे सेवन कमी करा आणि एनएएफएलडीशी संबंधित हृदयरोगांच्या शक्यता कमी करण्यासाठी त्यांच्या ऐवजी एकल संतृप्त चरबी आणि बहुसंतृप्त चरबी, विशेषत: ओमेगा -3 फॅटी एसिड घ्या.
 • तुमचे वजन कमी करण्यासाठी आणि यकृतातील संचयित चरबी कमी करण्यासाठी नियमितपणे व्यायाम करा.
 • जर तुम्ही जीवनसत्वे किंवा वैकल्पिक वनस्पतीजन्य औषधे सारख्या पूरक खाद्याचा आहार घेत असाल तर त्याबद्दल आपल्या डॉक्टरांशी बोलणे आणि त्यांचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे. काही वनस्पतीजन्य औषधाने आपल्या यकृताला क्षती होऊ शकते.
 • यकृताची क्षती झालेले लोक काही विशिष्ट संक्रमण आणि न्यूमोकोकल आजारास बळी पडतात. फॅटी यकृत रोग असलेल्या लोकांना हिपॅटायटीस ए आणि बी, फ्लू आणि न्यूमोकोकल रोगांकरिता टीका करणे महत्वाचे आहे. चरबीयुक्त यकृत असलेल्या व्यक्तींसाठी हिपॅटायटीस अतीशय घातक असू शकते आणि त्यामुळे, यकृत निकामीही पडू शकते.


संदर्भ

 1. Leon A. Adams, Paul Angulo, and Keith D. Lindor. Nonalcoholic fatty liver disease. CMAJ. 2005 Mar 29; 172(7): 899–905. PMID: 15795412.
 2. Kalra S, Vithalani M, Gulati G, Kulkarni CM, Kadam Y, Pallivathukkal J, Das B, Sahay R, Modi KD. Study of prevalence of nonalcoholic fatty liver disease (NAFLD) in type 2 diabetes patients in India (SPRINT). J Assoc Physicians India. 2013 Jul;61(7):448-53. PMID: 24772746.
 3. Min-Sun Kwak, Donghee Kim. Non-alcoholic fatty liver disease and lifestyle modifications, focusing on physical activity. Korean J Intern Med. 2018 Jan; 33(1): 64–74. Published online 2017 Dec 6. PMID: 29202557.
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Fatty Liver Disease
 5. Better health channel. Department of Health and Human Services [internet]. State government of Victoria; Liver - fatty liver disease
 6. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Eating, Diet, & Nutrition for NAFLD & NASH
 7. American Liver Foundation [Internet]. New York: American Association for the Study of Liver Diseases; The Progression of Liver Disease.

फॅटी लिव्हर साठी औषधे

फॅटी लिव्हर के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

translation missing: mr.lab_test.sub_disease_title

translation missing: mr.lab_test.test_name_description_on_disease_page

translation missing: mr.lab_test.test_names