myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

सारांश

वेळेवर लक्ष दिले नाही, तर हृदय विकाराचा झटका सामान्यपणे रुग्णासाठी जीवघेणी आणीबाणीची म्हणजेच तातडीची स्थिती निर्माण करतो, जी रुग्णाच्या कुटुंबीयांना व जवळच्या मित्रांसाठीही त्रासदायक व तणावकारक असते. अनेक लोकांना हृदय विकाराचा झटका या शब्दाचीच धास्ती असते. रुग्णाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्याने त्याच्या हृदयाच्या स्नायूंना रक्त पुरवठा होण्यात अचानक बाधा येऊ शकते. हृदय विकाराच्या झटक्याचे मुख्य कारण असते धमन्यांच्या भिंतींवर आतून जमा झालेली चरबी. अशा चरबीला 'प्लाक' असे म्हणतात. धूम्रपान, पोषक नसलेला आहार, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, कोलेस्टोरलची अधिक मात्रा, मद्य सेवन, बैठ्या कामाची जीवनशैली या सर्वांचा मिळून झालेला एकत्रित परिणाम हृदय विकाराच्या झटक्याला आमंत्रण देतो. ईसीजी आणि हृदयरोगाची लक्षणे हृदय विकाराच्या झटक्याचे निदान करू शकतात. तीव्र स्वरूपाच्या झटक्याचे उपचार रक्तवाहिनीद्वारे अँजिओप्लास्टी करून केले जातात तसेच पोटातून औषधे दिली जातात. आणि कधी कधी रुग्णावर बाय पास शस्त्रक्रिया करावी लागते. 
 

 1. हार्ट अटॅक (हृदयविकाराचा झटका) ची लक्षणे - Symptoms of Heart Attack in Marathi
 2. हार्ट अटॅक (हृदयविकाराचा झटका) चा उपचार - Treatment of Heart Attack in Marathi
 3. हार्ट अटॅक (हृदयविकाराचा झटका) काय आहे - What is Heart Attack in Marathi
 4. हार्ट अटॅक साठी औषधे

हार्ट अटॅक (हृदयविकाराचा झटका) ची लक्षणे - Symptoms of Heart Attack in Marathi

हृदय रोगाचे प्रकार आणि तीव्रता व्यक्तीगणिक बदलत जाते. काही रुग्णांना छातीत  दुखत नाही तर काहींना छातीत खूप वेदना होतात. काही लोकांना हृदयाचा झटका येण्यापूर्वी काही आठवडे किंवा काही दिवस आधी वारंवार छातीत दुखते, थकवा येतो, किंवा त्यांना श्वासोछ्वासाच्या अनेक समस्या जाणवतात.

रुग्णामध्ये सहसा प्रथम जी लक्षणे दिसतात ती शरिराच्या डाव्या बाजूला सुरू होणार्र्या वेदनेच्या स्वरूपात असतात, जे नंतर  डाव्या बाहाकडे, जबड्याकडे, खांद्याकडे, सरकत जाते. अशी वेदना बराच काळ टिकते आणि रुग्णामध्ये पुढील लक्षणेही दिसतात.

 • दीर्घ श्वास घेता येत नाही.
 • मळमळ.
 • उलटी: काही लोकांचा असा गैरसमज होतो की अपचनामुळे उलट्या होत आहेत व एकदा उलटी झाली, वा पित्तनाशक घेतले की बरे वाटेल.
 • अशक्तपणा
 • त्वचा निस्तेज होणे
 • ठोके कमी होणे.
 • रक्तदाबातील चढ उतार होणें
 • अस्वस्थता वाटणें 
 • हरपून गेल्यासारखे वाटणे किंवा खूप उत्तेजित होणे. 

हार्ट अटॅक (हृदयविकाराचा झटका) चा उपचार - Treatment of Heart Attack in Marathi

हृदयाचे आजार फक्त रुग्णालयातच ठीक होऊ शकतात. यावरील उपचाराच्या खालील मार्ग हृदयविकाराच्या झटक्याच्या बाबतीत अवलंबले जातात.

औषधोपचार
औषधांमध्ये रक्ताच्या पेशी न गोठू देणारी औषधे सामील असतात जी हृदयाच्या धमन्यांच्या भिंतींवर रक्ताच्या पेशींचे जमा होणे थांबवते, रक्ताची तरळता रोखणारी औषधे असतात, गोठलेले रक्त मोकळे करणारी औषधे, प्राणवायूचे उपचार, आणि हृदयरोगाच्या झटक्याची लक्षणे दिसत असल्यास वेदनाशामक औषधे असतात. रक्तदाब कमी करणारीं, कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणारी औषधेही दिली जातात, ज्यामुळे हृदयावर कमी भार येतो आणि प्राणवायूची गरज सुद्धा भागते.

शल्यचिकित्सा
वरील औषधोपचारांसोबतच खालील शस्त्रक्रिया करण्याची सुद्धा गरज पडू शकते:

 • कोरोनरी अँजिओप्लास्टी
  कोरोनरी अंजिओग्राफी सोबतच अंजिओप्लास्टी सुद्धा केली जाऊ शकते ज्या प्रक्रियेद्वारे बुजलेल्या रक्तवाहिनीत स्टेंट टाकला जातो. स्टेंटमुळे बुजलेली धमनी खुलते आणि रक्तप्रवाह पुन्हा सुरू होतो.
 • कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी 
  बायपास सर्जरी करतांना डॉक्टर शरीराच्या दुसऱ्या भागातून निरोगी अवयव घेऊन ते बुजलेल्या धमनीच्या जागी शिवतात व निर्धोक रक्तप्रवाहासाठी वेगळा मार्ग निर्माण केला जातो.

जीवनशैलीचे उपाययोजन
निरोगी हृदयाच्या आरोग्यसाठी जीवनशैलीत बदल करणे हा सर्वोत्तम उपाय आहे. रुग्णात हृदयाचे आजार बळावू नयेत म्हणून पुढील पावले उचलायला हवीत:

 • धावणे, जॉगिंग, पोहणे, योगासने, प्राणायाम यासारखे शरीराला भरपूर स्वच्छ प्राणवायूचा पुरवठा करणारे व रक्तदाब कमी करणारे व्यायाम रोज करायला हवेत. पण रुग्णाच्या छाती व श्वसननलिकेत दाब होत असल्यामुळे अशा व्यायामांना सुरुवात करण्यापूर्वी नेहमीच  आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
 • हृदय विकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी शरिराचे योग्य ते वजन राखणे आवश्यक आहे.
 • धूम्रपान सोडून द्या, तसेच धूम्रपान करणाऱ्यांची संगत सुद्धा सोडून द्या. सिगारेटच्या धुरामुळे धूर निघत असलेल्या जागीची आजूबाजूची हवा प्रदूषित होतच असते. धूम्रपान करणार्र्या लोकांच्या आजूबाजूला उभे राहणें टाळा. तसेच प्रदूषित ठिकाणी जाणेंही टाळावे.
 • 14 नग एवढ्या पेगच्या वर मद्यपान करू नका.
 • कमी चरबी आणि कमी मिठ असलेले पोषक व निरोगी आहार घेणें हितावह असते. ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, आणि तंतूयुक्त आहार अधिक प्रमाणात घ्या 
 • नियमित आरोग्य तपासणी कराच आणि तसेच आपले रक्तदाब सुद्धा नियमित तपासून घ्या.
 • कामाच्या ठिकाणी आणि आपल्या घरी सुद्धा, म्हणजेच सर्वत्र तणाव मुक्त व आनंदी रहा.

हार्ट अटॅक (हृदयविकाराचा झटका) काय आहे - What is Heart Attack in Marathi

हृदय रोगाच्या झटक्याला ऍक्युट मायोकार्डिअल इन्फेक्शन देखील म्हटले जाते. अशा प्रकारचा झटका रक्त पुरवठा करणार्र्या वाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे हृदयाला रक्त पुरवठा न होऊ शकल्याने येतो. अचानक थांबलेल्या रक्तपुरवठ्यामुळे हृदयाच्या स्नायूंना अन्न पुरवठा व प्राणवायूचा पुरवठा होत नाही ज्यामुळे हृदयात दुखायला लागते. या अवस्थेला अनिग्मा म्हटले जाते.

हृदयरोग हा जगात वेगाने वाढत चाललेला आजार आहे. रक्तवाहिन्या आणि हृदय यांतील रोग यांमुळे आज जगात सर्वाधिक मृत्यू होत आहेत. 2016 साली 1. 79 लाख लोकांचे मृत्यू हृदयरोगामुळे झाले, ज्यातील तीन चतुर्थांश मृत्यू मध्यम उत्पन्न आणि विकसनशील देशांमधील होते. सामाजिक  व व्यक्तिगत जीवनशैलीतील बदल आणि शहरीकरण यामुळे हृदयाशी निगडित समस्या वाढल्या आहेत. भारतातील 5 लाख मृत्यू दरवर्षी होतात ज्यातले 20% केवळ हृदय रोगामुळे होतात. 

हार्ट अटॅक की जांच का लैब टेस्ट करवाएं

Troponin - I (Trop - I)

20% छूट + 10% कैशबैक

हार्ट अटॅक साठी औषधे

हार्ट अटॅक के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
TelmichekTelmichek 40 Mg Tablet51
ClopitorvaClopitorva 10 Mg/75 Mg Capsule143
Clopitab ACLOPITAB A 150MG CAPSULE 10S60
TetanTETAN 20MG TABLET 10S45
Rosave TrioRosave Trio 10 Mg Tablet112
Atorfit CvATORFIT CV 10MG TABLET 10S167
ArbitelArbitel 20 Mg Tablet30
TelsartanTELSARTAN 20MG ACTIV TABLET 28S0
ClavixCLAVIX GOLD 10MG CAPSULE 15S0
ClopitabClopitab 150 Mg Tablet78
Rosutor GoldROSUTOR GOLD 20/150MG CAPSULE207
AtenAten 100 Mg Tablet39
LonopinLonopin 20 Mg Injection248
TelmikindTELMIKIND 20MG TABLET 30S44
Amlokind AtAmlokind At 5 Mg/50 Mg Tablet18
Ecosprin Av CapsuleEcosprin-AV 150 Capsule36
BetacardBetacard 100 Mg Tablet46
ClexaneClexane 20 Mg Injection346
Rosave CRosave C 10 Mg/75 Mg Capsule116
Rosufit CvROSUFIT CV 10MG TABLET 10S187
Deplatt CvDEPLATT CV 10MG CAPSULE 10S51
Ecosprin GoldECOSPRIN GOLD 10MG CAPSULE 10S84
EcosprinEcosprin 150 Mg Tablet6
Deplatt ADEPLATT A 150MG TABLET 15S49
Telma TabletTelma 40 MG Tablet165

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; Cardiovascular diseases
 2. MSDmannual professional version [internet].Acute Myocardial Infarction (MI). Merck Sharp & Dohme Corp. Merck & Co., Inc., Kenilworth, NJ, USA
 3. Gupta R, Mohan I, Narula J. Trends in Coronary Heart Disease Epidemiology in India. Ann Glob Health. 2016 Mar-Apr;82(2):307-15. PMID: 27372534.
 4. inay Rao, Prasannalakshmi Rao, Nikita Carvalho. Risk factors for acute myocardial infarction in coastal region of india: A case-control study . Volume 2, 2014. Department of Community Medicine, Father Muller Medical College, Mangalore; DOI: 10.4103/2321-449x.140229.
 5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Heart Disease Risk Factors
 6. National Heart, Lung, and Blood Institute [Internet]: U.S. Department of Health and Human Services; Heart Attack
 7. National Health Service [Internet]. UK; Complications - Heart attack
और पढ़ें ...