myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

जीवनसत्त्व बी 8 वसा-घुलनशील जीवनसत्त्वांचे एक समूह आहे, जे कोशिका चयापचयामध्ये एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. ते रासायनिकरीत्या व जीवशास्त्राच्या दृष्टीने विशिष्ट असतात,पण ते अनेक खाद्यपदार्थांमध्ये सहअस्तित्वामध्ये असतात. यापैकी प्रत्येक जीवनसत्त्वांचे कार्य, प्रभाव आणि सहप्रभाव वेगळे आहेत, आणि म्हणून त्याची मात्रा व कमतरता वेगवेगळी असतात. त्यापैकी प्रत्येकावर आपण दृष्टिक्षेप करू या.

 1. जीवनसत्त्व बीचे प्रकार - Types of Vitamin B in Marathi
 2. जीवनसत्त्व बी अन्नस्त्रोत - Vitamin B Food Sources in Marathi
 3. जीवनसत्त्व बी कॉंप्लेक्सचे फायदे - Benefits of Vitamin B complex in Marathi
 4. जीवनसत्त्व बीची मात्रा - Vitamin B Dosage in Marathi
 5. जीवनसत्त्व बी सहप्रभाव - Vitamin B side effects in Marathi

जीवनसत्त्व बीच्या प्रत्येक घटकाचे कार्य व कमतरतेची लक्षणे पाहू या

जीवनसत्त्व बीचे प्रकार कार्य कमतरता
बी1 थिआमिन डीएनए आणि आरएनएचे योग्य नसाचे कार्य व संश्लेषणामध्ये साहाय्य करते. बेरी बेरी (एडेमा, वजन कमी करणें, पायांमध्ये वेदना, भावनिक अडचणी, अनियमित हृदयगती)
बी2 रिबोफ्लॅव्हिन शरिरात ऊर्जेचे उत्सर्ग एरिबोफ्लॅव्हिनोसिस (क्रॅक्ड लिप्स, जिभेत सूज, घसा सुजणें, तोंडात सूज)
बी3 निआसिन शरिरात ऊर्जा हस्तांतरणात सामील पॅलॅग्रा (त्वचेमध्ये सूज, झोप येण्यास अडचण, अशक्तता, मानसिक भ्रम)
बी5 पॅंटोथेनिक एसिड एमिनो एसिड (प्रोटीन) , कॉलेस्टरॉल आणि हार्मोनचे संश्लेषण पुरळ आणि त्वचेत झिणझिण्या येणें किंवा शिथिलता
बी6 पायरोडिक्सिन न्युरोट्रांसमिटरचे संश्लेषण त्वचेत दाह, पिंक आय, लकव्याचा धोका आणि इतर तंत्रिकासंबंधी विकार
बी7 बायोटिन तंत्रिकाप्रणालीच्या निरोगी कार्य व ऊर्जा निर्माण होण्यास आवश्यक शिशूंमध्ये वाढ खुंटणे आणि तंत्रिकासंबंधी विकार
बी8 इनॉझिटॉल गरोदरपणा आणि शैशवावस्थेसारख्या जलद विभाजन व विकासाच्या अवधींमध्ये महत्त्वपूर्ण रक्तक्षय; गरोदरपणादरम्यान कमतरतेमुळे जन्मदोष होऊ शकतात
बी12 कॉबॅलॅमिन लाल रक्तकोशिकांचे उत्पादन, डीएनए संश्लेषण आणि नसांच्या कोशिका व रक्तकोशिकांसाठी महत्त्वपूर्ण रक्तक्षय; कमी झालेल्या अवशोषणामुळे वयस्कर लोकांमध्ये स्मृतीची क्षती व संज्ञानात्मक दोष होऊ शकतात

कोष्ठक 1

जीवनसत्त्व बीच्या सर्व प्रकारांच्या अन्नस्त्रोत निम्नलिखित आहेत.

जीवनसत्त्व बीचे प्रकार जीवनसत्त्व बी अन्नस्त्रोत
बी1 थिआमिन यीस्ट, यकृत, मासे, बींस, सोयाबीन, वटाणे, ट्यूना, बटाटे, मशरूम, सूर्यफुलाच्या बिया, टॉमॅटो, वांगी
बी2 रिबॉफ्लेव्हिन मेंढीचे मांस, दूध, दुधाची उत्पादने, ताक, बदाम, हिरव्या पालेदार भाज्या, अंडी, नट, तांदूळ, होल ग्रेंस
बी3 निआसिन मांस, पॉल्ट्री, सॅल्मॉन आणि ट्युनासारखे मासे, धान्ये, मसूर, बिया, शेंगदाणे
बी5 पॅंटोथेनिक एसिड अंडी, मासे, मांस, टर्की, ताजी फळे व भाज्या, विशेष करून मशरूम, होल ग्रेंस, मध
बी6 पायरोडिक्सिन धान्ये, बीन्स, कुक्कुट, मासे, फळे आणि भाज्या, हिरव्या पालेभाज्या
बी7 बायोटिन अंड्याची जर्दी, दूध, ब्रोकोली, केळी, बटाटे, एवोकॅडो, बियाणे, सोया, चीज, दाणे, डुकराचे मांस, पालेदार हिरव्या भाज्या
बी8 इनॉझिटॉल फळे, भाज्या, होल ग्रेंस, बीन्स
बी12 कॉबॉलॅमिन बीफ, पॉर्क, हॅम, पोल्ट्री, मेंढी, मासे, डेअरी, अंडी

कोष्ठक 2

जीवनसत्त्व बी कॉंप्लेक्सच्या प्रत्येक घटकांपैकी एकाच्या वैय्यक्तिक आरोग्य फायद्यांची चर्चा करू या.

 • बी1: जीवनसत्त्व बी1 मध्ये पार्किन्संसविरुद्ध तंत्रिकासंरक्षक प्रभाव असतात आणि ते मेंदूच्या कोशिका (न्युरॉन्स)भोवती एक सुरक्षात्मक आवरण मायलिन शीथ बनण्यात साहाय्य करते. ते एक वेदनाशामक म्हणून कार्य करते आणि डायस्मिनॉरिआमध्ये वेदना कमी करण्यासाठीही वापरले जाते.
 • बी3: ते हृदयाला ऑक्सिडेटिव्ह हानी क्षती कमी करणें आणि कॉलेस्टरॉल स्तर कमी करण्याद्वारे हृदयरोगांचा धोका कमी करते.
 • बी5: त्याला पॅंटोथेनिक एसिडही म्हणत असल्याने, जीवनसत्त्व बी5ची आरबीसी निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका असते आणि अशा प्रकारे रक्तक्षयाविरुद्ध एक निवारणात्मक कार्य होतो. या जीवनसत्त्वाची कमतरता हृदयाघात आणि स्ट्रोकसारख्या हृदयरोगाच्या समस्यांचा धोका वाढवते.
 • बी6: जीवनसत्त्व बी6 एक नैसर्गिक वेदनाशामक आहे. ती चयापचयाला शक्ती देते आणि अंगांचे कार्य सुधारण्यात मदत करते.
 • बी7: हे शास्त्रीयरीत्या सिद्ध झाले आहे की या जीवनसत्त्वाचे सप्लिमेंटेशन केल्याने केसगळती टळण्यात मदत होते आणि नखांची ताकद व संरचना सांभाळली जाते.
 • बी8: जीवनसत्व बी8 विशेषकरून महिलांसाठी लाभकारक असल्याची माहिती असून ते पीसीओएसच्या उपचारामध्ये वापरले जाते आणि महिलांमध्ये वजन कमी करण्यास वाव मिळतो. ते गेस्टेशनल डायबेटीझचा धोकाही कमी करतो.
 • बी12: जीवनसत्त्व बी12चे शरिरासाठी अनेक कार्य व फायदे आहेत.तो त्वचा, नख आणि केसांच्या आरोग्याला सांभाळतो व सुरक्षित ठेवतो, रक्तक्षय टाळतो आणि हायपरपिग्मेंटेशनचा धोका कमी करतो.हे जीवनसत्त्व डिमेंशिआ टाळतो आणि अवसाद व चिंता यांना लांब ठेवतो.

जीवनसत्त्वबीची दैनंदिन मात्रा खाली दिली गेली आहे. तरीही, तुम्ही नोंद घेतली पाहिजे की या किंमती अंदाजी आहेत आणि या जीवनसत्त्वाची वास्तविक मात्रा तुमचे वय, लिंग आणि इतर शारीरिक गुणांवर अवलंबून आहे. या जीवनसत्त्वाचे बाह्य पूरक तत्त्व घेण्यापूर्वी तुमच्या चिकित्सकाचा सल्ला दिला पाहिजे. नैसर्गिक किंवा आहारात्मक स्वरूपामध्ये घेत असतांना, आम्ही आरडीए ( सल्ला दिलेली दैनिक अनुमत मात्रा) किंमतींना न ओलांडण्याची विनंती करतो.

जीवनसत्त्व बीचे प्रकार आरडीए पुरुष आरडीए महिला
बी1 थिआमिन 1.2 एमजी 1.1 एमजी
बी2 रिबोफ्लॅव्हिन 1.3 एमजी 1.1 एमजी
बी3 निआसिन 16 एमजी 14 एमजी
बी5 पॅंटोथेनिक एसिड 5 एमजी 5 एमजी
बी6 पायरॉडिक्सिन 1.3 एमजी 1.3 एमजी
बी7 बायोटिन 30 एमजी 30 एमजी
बी8 इनॉझिटॉल 400 एमजी 400 एमजी
बी12 कॉबॅलॅमिन 2.4 एमजी 2.4 एमजी

जीवनसत्व बी जल घुलनशील असल्याने, आहारातील खप किंवा बी कॉंप्लेक्स सप्लिमेंट्सबद्दल सहप्रभाव होण्याची शक्यता कमी असते.तरीही, जीवनसत्त्वाच्या कोणत्याही घटकाची अतिरिक्त मात्रा सल्ला दिलेल्या दैनिक खपेपेक्षा अधिक असल्याने त्याने थोडी हानी होते.

 • जीवनसत्व बी1 किंवा थिआमिनचे कोणतेही ज्ञात सहप्रभाव नाही, कारण शरिरामधून जलद गळती होते. दुर्लभ परिस्थितींमध्ये, त्यामुळे त्वचेत खाज किंवा अलर्जिक प्रतिक्रियाही होऊ शकतात.
 • जीवनसत्त्व बी3 किंवा निआसिनची अतिरिक्त मात्रा यामुळे उलटी, स्किन फ्लश ( त्वचा गरम होणें आणि लालसर होणें) किंवा अत्युच्च रक्तशर्करा होऊ शकते. अत्यधिक उच्च मात्रांमुळे निआसिनचा विषारीपणा होतो, ज्याने गंभीर विकार जसेही यकृत (हॅपॅटिक) किंवा एकाधिक अंग निकामी पडणें असे होते आणि ते प्राणघातक ठरू शकते. चिकित्सकाने विहित केल्याशिवाय ते घेऊ नये.
 • जीवनसत्त्व बी5चे अतिरिक्त स्तर अतिसार यासारख्या जीआयटी अडचणींशी निगडीत असतात.
 • अत्यधिक मात्रेत विटामिन बी6  घेतल्याने डोळे, त्वचा किंवा श्वसनतंत्राला खाज होऊ शकते. जीवनसत्त्व बी8 मुळे ही खाज होण्याचे प्रसिद्ध आहे.
 • सिंथेटिक स्वरूपात जीवनसत्त्व बी12 दिल्याने, अतिसार, स्नायूमधील वेदना किंवा मसल क्रॅंप, थकवा, डोकेदुखी किंवा घेरी येणें यासारखे अनेक सहप्रभाव होण्याची शक्यता असते. इंजेक्शनद्वारे दिले जाणारे स्वरूप अधिक गंभीर एनॅफिलॅटिक प्रतिक्रियांशी निगडीत जसे की व्हीझिंग, खाज, गिळण्यात कठिनता, हृदयाचे ठोके जलद पडणें किंवा चट्टे विकसित होणें. (अधिक पहा:  दमा)
और पढ़ें ...