धमनीकाठिण्यजन्य रेटिनोपथी - Arteriosclerotic Retinopathy in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS

November 27, 2018

July 31, 2020

कधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो
धमनीकाठिण्यजन्य रेटिनोपथी
कधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो

धमनीकाठिण्यजन्य रेटिनोपथी म्हणजे काय?

धमनीकाठिण्यजन्य रेटिनोपथी आजारात डोळ्यांच्या रेटिनामध्ये ऑक्सिजन पुरवणाऱ्या रक्तवाहिन्या खराब झाल्या असतात. रेटिना हे आपल्या डोळ्याच्या मागच्या बाजूला पातळ त्वचा/झिल्ली असते. यामुळे आपण आपल्या आसपास बघतो ती इमेज काय आहे हे समजू शकतो. अशा प्रकारे, ते एक प्रकाश-संवेदनशील त्वचा आहे. डोळ्याची धमनी संकुचित झाल्यामुळे रेटिनाच्या ऑक्सिजन पुरवठ्यात व्यत्यय येतो ज्यामुळे धमनीकाठिण्यजन्य रेटिनोपथी आजार होतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

रेटिनोपॅथीच्या सुरुवातीला, कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. पण, ते डोळ्याच्या तपासणी दरम्यान लक्षात येऊ शकतात.

रेटिनोपॅथीच्या काही लक्षणांमध्ये हे समाविष्ट आहेत:

 • अस्पष्ट दिसणे.  
 • डोळे दुखणे.
 • बघताना डाग (काळे स्पॉट्स) दिसणे.
 • अकस्मात आणि अचानक दिसणे बंद होणे.
 • दुहेरी दृष्टी.
 • डोळ्यांसमोर चमकणे.
 • दृष्टिक्षेत्रात गडद भाग दिसणे.

ही लक्षणे अवस्था अधिक बिघडल्यावर लगेच दिसून येतात. रेटिनोपॅथी अधिक बिघडल्यामुळे अंधत्वसारखा गंभीर विकार होऊ शकतो.

याचे मुख्य कारणं काय आहेत?

जरी रेटिनोपॅथी वेगवेगळ्या कारणामुळे होत असली, तरी धमनीकाठिण्यजन्य रेटिनोपॅथी धमनीकाठिण्यजन्य मुळे होते. ज्यामध्ये रेटिनाच्या धमन्यांच्या आतील बाजूस प्लेक म्हणून ओळखल्या जाणारी चरबी जमा झाली तर हा रोग होतो. यामुळे रेटिनल धमन्यांमध्ये  कडकपणा किंवा बदलाव येतो.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

निदान प्रामुख्याने लक्षणांवरून केले जाते. पण, नियमित डोळे तपासणी रेटिनोपॅथीचे निदान सुरुवातीच्या काळात करण्यात एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. निदानासाठी तपशीलवार वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक तपासणी सोबत आय रिडींग चार्ट्स मदत करतात. निस्थापनाची पुष्टी करण्यासाठी ओप्थाल्मोस्कोप, रेटिनल डिजिटल इमेजिंग आणि फ्लुरेसेसीन एंजियोग्राफी वापरून रेटिनाची तपासणी केली जाऊ शकते.

रेटिनोपॅथीचे उपचार प्रामुख्याने अंतर्भूत स्थितीचे कठोर व्यवस्थापन आणि रेटीनोपॅथीची नियोजन यावर लक्ष केंद्रित करतात. रेटिनाचे नुकसान कायमस्वरुपी असू शकते, म्हणून धमनीकाठिण्यजन्य असलेल्या व्यक्तीने नियमितपणे डोळे तपासायला जाणे आवश्यक आहे आणि अंतर्निहित, कारणास्तव आरोग्यविषयक स्थितीसाठी उपचारांच्या नियमिततेचे अनुसरण करणे गरजेचे आहे (धमनीकाठिण्यजन्य असल्यास).

जर रीटिनोपॅथी आधीच झाली असेल, तर उपचार त्याची तीव्रता, लक्षणे आणि व्यक्तीच्या वयावर अवलंबून असतात. प्रगत अवस्थेतमध्ये दृष्टि पुनर्संचयित करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाऊ शकते.संदर्भ

 1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Diabetic Eye Problems Also called: Diabetic retinopathy
 2. National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases [internet]: US Department of Health and Human Services; Retinopathy
 3. National Institute of Health and Family Welfare. Hypertensive Retinopathy. Health and Family Welfare. [internet]
 4. National Organization for Rare Disorders. Rare Disease Database. [internet]
 5. Fatouh. Arteriosclerotic retinopathy.. Bull Ophthalmol Soc Egypt. 1968;61(65):45-6. PMID: 5744654

धमनीकाठिण्यजन्य रेटिनोपथी साठी औषधे

धमनीकाठिण्यजन्य रेटिनोपथी के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

दवा का नाम

कीमत

₹314.2

20% छूट + 5% कैशबैक


₹84.7

20% छूट + 5% कैशबैक


₹21.0

20% छूट + 5% कैशबैक


₹322.0

20% छूट + 5% कैशबैक


₹45.0

20% छूट + 5% कैशबैक


₹36.8

20% छूट + 5% कैशबैक


₹46.2

20% छूट + 5% कैशबैक


₹50.0

20% छूट + 5% कैशबैक


Showing 1 to 10 of 147 entries