myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

ब्लास्टोमायकॉसिस काय आहे?

ब्लास्टोमायकॉसिस हा एक दुर्मिळ आजार आहे जो ब्लॅस्टोमायस डर्मटायटिडीस नावाच्या बुरशीने म्हणजेच फंगसमुळे होतो. ओल्या मातीतल्या बुरशीत आढळणारे हे स्पोरद्वारे श्वास घेतांना ही बुरशी शरीरात जाते. ब्लास्टोमायकॉसिस शरीराच्या सर्व अवयवांवर परिणाम करते, विशेषत: फुफ्फुस आणि त्वचेवर, त्यानंतर मूत्र प्रणाली, हाडं आणि मज्जासंस्थेवर. रोगाची लक्षणे फ्लू सारखीच असतात. नंतरच्या टप्प्यात त्वचेवर परिणाम होतो (गळू आणि वार्ट सारखी पुरळ येणे).

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

बुरशीच्या स्पोर्सचे श्वसनाद्वारे शरीरात गेल्यानंतर 3 आठवडे ते 3 महिन्यांच्या दरम्यान ब्लास्टोमायकोसिसची मुख्य लक्षणे दिसतात. लक्षणे फ्लूसारखी असतात आणि काही दिवसात आराम पण मिळतो. बऱ्याच संसर्गित व्यक्तींमध्ये लक्षणे दिसून येत नाही. पण, जेव्हा शरीराच्या वेगवेगळ्या भागात बुरशी पसरते तेव्हा लक्षणे दिसून येतात, विशेषत: कमकुवत प्रतिकार शक्ती असलेल्या लोकांमध्ये.

 • ताप.
 • रात्रभर घाम येणे किंवा गरमी होणे.
 • खोकला, संसर्ग फुफ्फुसांपर्यंत पोहोचल्यास कफमधून रक्त पडणे.
 • छातीत दुखणे.
 • सांधे दुखी, आणि स्नायू दुखणे.
 • खूप थकवा आणि अस्वस्थता जाणवणे.
 • विनाकारण वजन कमी होणे.
 • फुफ्फुसाच्या ब्लास्टोमायकोसिसच्या गंभीर प्रकरणांमध्ये न्युमोनिया आणि श्वसनविकार सिंड्रोम सामान्य असतात.
 • वार्ट किंवा चामखीळ सारख्या दिसणार्‍या किंवा करड्या किंवा जांभळा रंगाच्या त्वचेवरील जखमांशी संबंधि लक्षणे. हे तोंडात किंवा नाकात ही होऊ शकतात आणि सामान्यतः दुखत नाही. पण फोड असल्यास त्यातून रक्तस्त्राव होऊ शकतो.
 • संसर्ग हाडांपर्यंत पोहोचल्यास हाडांच्या उतांचे नुकसान होणे आणि हाडात पस जमा होणे.
 • टेस्ट्स, प्रोस्टेट आणि एपिडिडायमिस देखील  ब्लास्टोमायकोसिसमुळे प्रभावित होतात.
 • ब्लास्टोमायकोसिसमध्ये मज्जासंस्था प्रभावित झाल्याने मेनिनजायटिस होतो.

याचे मुख्य कारणं काय आहेत?

ब्लास्टोमायकॉसिस ब्लास्टोमायस नावाच्या बुरशीमुळे होतो. ते साधारणपणे ओलसर मातीत, सडणारे लाकूड किंवा कोरड्या पानांमध्ये होते. अशा वातावरणात श्वास घेतल्यानंतर, बुरशी शरीरात प्रवेश करते आणि वेगवेगळ्या भागांमध्ये पसरते. ब्लास्टोमायस साधारणपणे अमेरिका, कॅनडा आणि आफ्रिकामध्ये आढळतात .

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डॉक्टर इतिहास, लक्षणे, शारीरिक तपासणी आणि वेगवेगळ्या चाचण्यांच्या आधारे ब्लास्टोमायकॉसिसचे निदान करतात.

खालील लॅबोरेटरी चाचण्यां सांगितल्या जाऊ शकतात:

 • त्वचेची स्क्रॅपिंग किंवा घशातून घेतलेल्या स्वॉबपासून घेतली बुरशीचे कृतिमरित्या कल्चर किंवा ती वाढवणे.
 • स्पुटम टेस्टने स्पुटममध्ये विशिष्ट रासायनिक (10% पोटॅशियम हायड्रॉक्साईड) मिसळून बुरशी शोधणे.
 • मायक्रोस्कोप खाली प्रभावित ऊतकाच्या नमुन्या मध्ये बुरशीचे अस्तित्व शोधण्यासाठी हिस्टोलॉजिकल तपासणी केली जाते.
 • संसर्ग झाल्यामुळे फुफ्फुसातील असामान्यता शोधण्यासाठी छातीचा एक्स-रे.
 • मेरुदंड आणि मेंदूतील बुरशीचा शोध घेण्यासाठी सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचे विश्लेषण.

ब्लास्टोमायकॉसिससाठी सामान्यपणे अँटीफंगल औषधे दिली जातात. ब्लास्टोमायकॉसिसच्या उपचारांसाठी रोगाच्या तीव्रतेवर अवलंबूनइट्राकोटनॅझोल आणि ॲम्फोटेरिसिन बी ही अँटीफंगल औषधे सामान्यतः वापरली जातात. व्यक्तीच्या प्रतिकार शक्ती आणि संसर्गाची तीव्रता यानुसार उपचारांकरिता 6 महिन्यापासून एक वर्षापर्यंतचा वेळ लागतो.

(अधिक वाचा: फंगल संसर्गाचा उपचार).

 1. ब्लास्टोमायकॉसिस साठी औषधे

ब्लास्टोमायकॉसिस साठी औषधे

ब्लास्टोमायकॉसिस के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
CanditralCANDITRAL 100MG CAPSULE 4S72.0
SyntranSyntran 100 Mg Capsule157.0
Candiforce CapsuleCandiforce 100 Capsule38.0
OnitrazONITRAZ 100MG CAPSULE 10S195.0
Onitraz ForteOnitraz Forte Capsule182.0
PanitraPanitra 200 Mg Capsule0.0
SiditraSiditra 100 Mg Capsule33.0
SporanoxSporanox 100 Mg Capsule260.0
TinitrazTINITRAZ 100MG CAPSULE 10S156.0
TitraTitra 100 Mg Capsule0.0
Traco GoldTraco Gold 100 Mg Capsule87.0
CanditzCanditz 100 Mg Capsule28.0
Ceastra XlCeastra Xl 100 Mg Tablet73.0
EntozoleEntozole Eye Drops72.0
FixtralFIXTRAL 200MG CAPSULE 10S280.0
FungeehealFungeeheal 100 Mg Capsule102.0
IntranilIntranil 100 Mg Capsule270.0
ItaproITAPRO 200MG CAPSULE 10S336.0
ItasporITASPOR SR 400MG TABLET159.0
ItrabondITRABOND 100MG CAPSULE 7S81.0
ItracutisITRACUTIS 200MG CAPSULE 10S240.0
Itraderm DsItraderm Ds Capsule88.0
ItranoxITRANOX 200MG CAPSULE 4S140.0
ItratufITRATUF 200MG CAPSULE178.0

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Blastomycosis
 2. U.S. Department of Health & Human Services. Symptoms of Blastomycosis. Centre for Disease and Prevention
 3. Miceli A, Krishnamurthy K. Blastomycosis. Blastomycosis. StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-
 4. Michael Saccente, Gail L. Woods. Clinical and Laboratory Update on Blastomycosis. Clin Microbiol Rev. 2010 Apr; 23(2): 367–381. PMID: 20375357
 5. Michael Saccente, Gail L. Clinical and Laboratory Update on Blastomycosis. American Society of Microbiology
और पढ़ें ...