मेनिंजाइटिस - Meningitis in Marathi

Dr. Nabi Darya Vali (AIIMS)MBBS

April 25, 2019

March 06, 2020

मेनिंजाइटिस
मेनिंजाइटिस

मेनिंजाइटिस काय आहे?

मेनिंजाईज हा टिशुची एक थर आहे जो मेंदू आणि मेरू दंड (स्पायनल कॉर्ड) यांना व्यापतात आणि त्यांच्या संरक्षणासाठी जबाबदार असतात. या थराच्या आणि आसपासच्या द्रवपदार्थाच्या संसर्गामुळे डोक्याची कवटी फुगते आणि त्यावर सूज येते. जर या स्थितीचे निदान वेळेवर झाले नाही, तर ही स्थिती जीवघेणी ठरू शकते.

त्याची मुख्य चिन्हं आणि लक्षणं काय आहेत?

या रोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताठरलेली मान, ताप आणि मळमळ, उलट्या आणि डोकेदुखी यासह गोंधळाचा समावेश असतो.

  • इतर लक्षणांमध्ये प्रकाशासमोर संवेदनशीलता, चिडचिडेपणा आणि भूक कमी होते.
  • बदललेली चेतना, कमकुवत मेंदूचे कार्य आणि झटके येणे हे आणखी प्रगत होऊ शकते.
  • बॅक्टेरियल मेनिंजाइटिस हे मेनिंजाइटिसचे गंभीर आणि संसर्गिक रूप आहे. त्वचेचे पुरळ (स्किन रॅशेस) हे बॅक्टेरियल मेनिंजाइटिसचे उशिरा दिसून येणारे एका प्रकारचे चिन्ह आहे. मेंदूचे नुकसान, बहिरेपणा आणि दृष्टी नष्ट होणे हे मेनिंजाइटिसशी संबंधित दीर्घकालीन लक्षणे आहेत.
  • व्हायरल मेनिंजाइटिस हे क्वचितच जीवघेणे आणि संसर्गिक आहे परंतु डोकेदुखी आणि मेमरी (स्मृती) च्या समस्येसारख्या दीर्घकालीन लक्षणांसोबत प्रभावित करू शकते.
  • फंगल मेनिंजाइटिस दुर्मिळ आहे आणि हे त्या लोकांमध्ये बघायला मिळते ज्यांमध्ये अत्यंत कमी रोगप्रतिकारक शक्ती आहे म्हणजे असे व्यक्ती ज्यांना कर्करोग किंवा एड्स(AIDS) आहे.

याची मुख्य कारणं काय आहेत?

मेनिंजाइटिस हा संसर्गिक किंवा असंसर्गिक असू शकतो.

संसर्गिक मेनिंजाइटिस सूक्ष्मजीवांमुळे होतो जे रक्तप्रवाहात पसरतात आणि मेंदू किंवा मेरूदंडा (स्पायनल कॉर्ड) पर्यंत पोहोचतात. हे सूक्ष्मजीव मेनिंजाईजला प्रभावित करतात आणि त्यांच्या सभोवतालच्या द्रवांवर फुगवटा आणि सूज उत्पन्न करतात. मेनिंजाइटिससाठी कारणीभूत असलेले काही सूक्ष्मजीवः

  • बॅक्टेरिया - स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनि, निसेरि मेनिंगजायटाइड्स.
  • व्हायरस - इन्फ्लुएंझा व्हायरस, गोवर विषाणू, एचआयव्ही (HIV) आणि इकोव्हायरस
  • फंगी - कॅन्डिडा ॲल्बिकन्स, क्रिप्टोकोक्चस न्यूफॉर्मन्स आणि हिस्टोप्लाझ्मा.

असंसर्गीक कारणांमध्ये समावेश असतो:

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

या स्थितीचे लवकर निदान आणि उपचार केल्याने मेंदूचे नुकसान आणि मृत्यू टाळता येते.

मेनिंजाइटिसचे निदान करण्यासाठी खालील चाचण्या आवश्यक आहेत:

  • लंबर पंक्चर - बॅटेरियल मेनिंजाइटिस ओळखायला आणि त्याची पुष्टी करण्यास मदत करण्यासाठी सेरेब्रोस्पायनल फ्लूइड मायक्रोबियल कल्चर, सीबीसी (CBC), प्रथिने आणि ग्लूकोज पातळी आणि सी-रीॲक्टिव्ह प्रोटीन (संसर्ग चिन्हक) साठी पाठविला जातो.
  • उंचावलेला पांढऱ्या रक्त पेशीची गणना (व्हाईट ब्लड सेल काऊंट).
  • डोक्याचा सिटी (CT) स्कॅन.
  • मेनिंजाइटिसच्या रॅश साठी सकारात्मक ग्लास चाचणी (पोसिटीव्ही ग्लास टेस्ट).

उपचारांमध्ये खालील उपाय समाविष्ट आहेत:

  • बॅक्टेरियल मेनिंजाइटिसचा उपचार शिरेच्या आत दिल्या जाणाऱ्या अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो जो प्रणालीवरील संसर्गीय बॅक्टेरियाला दूर करण्यात प्रभावी असतो.
  • फंगल मेनिंजाइटिसचा उपचार अँटीटिफंगल एजंटच्या साहाय्याने केला जातो.
  • व्हायरल मेनिंजाइटिस स्वतःच बारा होतो तरी त्याचा उपचार शिरेच्या आत दिल्या जाणाऱ्या अँटी-व्हायरल औषधांनी केला जातो.
  • मॅनिंगोकोकल लस आणि हिमोफिलस इन्फ्लूएंजा प्रकार बी लस यासारख्या लसी विशिष्ट प्रकारच्या मेनिंजाइटिसच्या विरोधात देखील संरक्षण करू शकतात.
  • या रोगाची शक्यता दर्शविणाऱ्या भागात प्रवास करण्यापूर्वी चांगली वैयक्तिक स्वच्छता राखणे आणि लसीकरण करणे हे मेनिंजाइटिस रोखण्यात मदत करेल.



संदर्भ

  1. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Non-Infectious Meningitis.
  2. Runde TJ, Hafner JW. Meningitis, Bacterial. [Updated 2019 May 5]. In: StatPearls [Internet]. Treasure Island (FL): StatPearls Publishing; 2019 Jan-.
  3. Meningitis. Paediatr Child Health. 2001 Mar;6(3):126-7. PMID: 20084221
  4. Department of Public Health [Internet]; Illinois, US; What is meningitis?
  5. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Meningitis.

मेनिंजाइटिस साठी औषधे

Medicines listed below are available for मेनिंजाइटिस. Please note that you should not take any medicines without doctor consultation. Taking any medicine without doctor's consultation can cause serious problems.