ब्रूसेलॉसिस - Brucellosis in Marathi

Dr. Ajay Mohan (AIIMS)MBBS

November 29, 2018

March 06, 2020

ब्रूसेलॉसिस
ब्रूसेलॉसिस

ब्रूसेलॉसिस काय आहे?

ब्रूसेलॉसिसचे नाव हे त्याला कारणीभूत ब्रुसेला नावाच्या जिवाणूंच्या समूहावरून मिळाले आहे. हा एक दुर्मिळ आजार आहे आणि आणखी काही कॉम्प्लिकेशन नसल्यास जीवाला धोकादायक नसतो. ब्रूसेलॉसिस हा एक संसर्ग आहे जो माणसांना आणि प्राण्याला प्रभावित करतो. हा जिवाणू दूषित अन्नामुळे तसेच हवेमधून आणि उघड्या जखमेतून पसरतो.

याची प्रमुख चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

ब्रुसेलोसिस ची लक्षणे ही इन्फ्लुएंझाच्या लक्षणांसारखी असतात. ती खालील प्रमाणे आहेत:

ब्रूसेलॉसिस ची प्रमुख कारणं काय आहेत?

या आजारासाठी कारणीभूत असलेला जिवाणू ब्रुसेला, बहुतेकदा कच्चे मांस आणि अनपाश्चराइज्ड (योग्य प्रक्रिया न झालेले) दूधात आढळतात. याचा संसर्ग सामान्य जिवाणूजन्य हवेत श्वास घेणे, दूषित अन्न खाणे किंवा संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या खुल्या जखमांचा संपर्क झाल्यामुळे होतो. जरी कॉमन नसले तरी लैंगिक संपर्काद्वारे आणि स्तनपान केल्यामुळे देखील यांचा प्रसार होऊ शकतो. बागेत आणि शेतात काम करणारे आणि प्राण्यांशी जवळून संपर्कात असलेल्या लोकांना या रोगाची लागण होण्याचा जास्त धोका असतो.

याचे उपचार आणि निदान कसे केले जातात?

सतत इन्फ्लुएंझा सारखी स्थिती जी उपचारानेही कमी होत नाही किंवा त्यांना प्रतिसाद देत नाही, ब्रूसेलॉसिसचे चिन्ह असू शकते. याचे निदान थोडे जटिल असू शकते कारण कधीकधी याची लक्षणे दिसायला काही महिन्यांपेक्षा जास्त काळ लागतो.

रोगनिदानामध्ये हे समाविष्ट आहे:

  • रक्त तपासणी.
  • मूत्र तपासणी.
  • सेरेब्रोस्पायन्सल /मेंदू व मज्जारज्जू यांची तपासणी.
  • अस्थिमज्जा (बोन मॅरो) कल्चर.

ब्रूसेलॉसिससाठी योग्य औषधोपचार घेणे हा मुख्य उपचार आहे. डॉक्सिसायक्लिन आणि रिफाम्पिन यांचे मिश्रण असलेले अँटीबायोटिक सामान्यत:दिले जातात. लक्षणीय सुधारणा दिसून येण्यासाठी  काही आठवडे लागू शकतात. पण हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की याच्या पुनरावृत्तीची शक्यता असते. त्यामुळे प्राण्यांशी संपर्क कमी करणे महत्वाचे आहे, त्यांच्या जवळ असताना सावध राहणे आणि कच्चे मांस आणि अनैसुरयुक्त (अनपाश्चराइज्ड) डेअरी उत्पादनांचा वापर टाळावा.

हा रोग तसा प्राणघातक नाहीये, पण याचा सतत संसर्ग धोकादायक ठरू शकतो. यामुळे मेंदू आणि त्याच्या सभोवतालच्या भागामध्ये सूज येऊ शकते. शिवाय हृदयाचे अस्तर आणि सांधे, हाडं यांच्या जखमांमध्ये संसर्ग देखील होऊ शकते.



संदर्भ

  1. Center for Disease Control and Prevention [internet], Atlanta (GA): US Department of Health and Human Services; Brucellosis
  2. Center for food security and public health. Brucellosis. Iowa State University of Science and Technology, United States. [internet].
  3. World Health Organization [Internet]. Geneva (SUI): World Health Organization; Brucellosis (human)
  4. Department of Health. Brucellosis. New York State. [internet].
  5. Center for health protection. Brucellosis. Department of health: Government of Hong Kong special administration region. [internet].