बुर्सिटिस - Bursitis in Marathi

Dr. Ayush PandeyMBBS,PG Diploma

November 29, 2018

March 06, 2020

बुर्सिटिस
बुर्सिटिस

बुर्सिटीस म्हणजे काय?

बुर्सिटीस म्हणजे बुर्सा ला वेदनायुक्त सूज येणे, बुर्सा हि एक द्रव-भरलेली पिशवी असते, जी स्नायू आणि सांध्यांमध्ये एक कुशन तयार करते. खांद्या, कोपर, हिप, आणि गुडघ्यातील जॉइन्ट्स, आणि टाचेतील ॲचिलीस स्नायूबंधामध्ये घर्षण कमी करण्यासाठी बुर्से आवश्यक असतात. यामुळे त्यांची हालचाल अतिशय लवचिक बनते. बुर्सिटिसमुळे तात्पुरती वेदना आणि अस्वस्थता येऊ शकते पण कायम विकृती निर्माण होत नाही.

कुठली बुर्सा सूजली आहे त्यावर अवलंबून बुर्सिटिस चे खालील प्रकार आहेत:

 • रेट्रोमॅलिओलर टेंडन बुर्सिटीस.
 • हिप बुर्सिटिस.
 • गुडघ्याचे बुर्सिटिस.
 • गुडघ्याच्या कॅपचे बुर्सिटिस.
 • पोस्टिरीअर ॲचिलीस टेंडन बुर्सिटीस.
 • कोपराचे बुर्सिटीस.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

बुर्सिटीसची कॉमन चिन्हे आणि लक्षणे अशी आहेत:

 • वेदना-हे बुर्सिटीसचे सर्वात सामान्य लक्षण आहे. बुर्सामध्ये कॅल्शियम जमा झाल्यास हे अधिक त्रासदायी होऊ शकतं.
 • खांदा कडक होऊन दुखल्यावर जशा मर्यादित हालचाली होतात तशाच प्रभावित सांध्यांमध्ये होणे.
 • प्रभावित सांधे नाजूक होणे.
 • दीर्घ काळ टिकणारा बुर्सिटिस हालचालींमध्ये अडचण निर्माण करु शकतो.

बुर्सिटिसची मुख्य कारणं काय आहेत?

सांध्यांना झालेल्या दुखापतीमुळे बुर्सिटिस होऊ शकतो. सांध्यांचा अति वापर झाल्यामुळे सूज येणाची शक्यता जास्त असते.

बुर्सिटिस अनेकदा मधुमेह, संधिवात, गाउट, सिस्टेमिक ल्यूपस एरिथेमॅटोसस (एसएलई), प्रतिकारशक्तीची कमतरता आणि स्कोलियोसिसशी संबंधित असल्याचे मानले जाते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जाते?

सखोल मेडिकल हिस्टरी आणि संपूर्ण शारीरिक तपासणी केल्यानंतर, आपले डॉक्टर काही चाचण्या करण्याचा सल्ला देऊ शकतात जसे की-

 • एक्स- रे.
 • एमआरआय.
 • सिटी स्कॅन.
 • अल्ट्रासाऊंड.
 • बुर्सा मधून निघणाऱ्या द्रव्यांचे संवर्धन आणि विश्लेषण.
 • रक्त तपासणी जसे की संपूर्ण ब्लड काउंट, सी-रिऍक्टिव्ह प्रोटीन, यूरिक ॲसिड आणि इतर.

जोपर्यंत सांध्यांवरील दबाव कमी होत नाही तोपर्यंत, बुर्सिटिस वारंवार होत राहील. पण, बुर्सिटिसचा खालील मार्गांनी उपचार केले जाऊ शकतात-

 • वेदनांपासून आराम देणारे औषधं.
 • शारीरिक आराम.
 • ज्या सांध्यांवर परिणाम झाला आहे त्यांना स्प्लिंट बसवून ठीक करणे.
 • बुर्सामधील वेदना आणि सूज कमी करण्यासाठी कॉर्टिकोस्टिरॉईड इंजेक्शन.
 • संसर्ग झाल्यास,अँटीबायोटिक्स.
 • बर्सेक्टॉमी प्रक्रियेद्वारे सर्जिकल ड्रेनेज आणि संसर्ग झालेला बुर्सा काढणे.

आपण नियमित व्यायाम सुरू करावा आणि बुर्सिटिस टाळण्यासाठी हळूहळू आपली ताकत वाढवावी. जर आपल्याला वेदना होत असेल तर जास्त शारीरिक क्रियांमध्ये गुंतू नका, विशेषत: ज्यात प्रभावित सांध्यांचा समावेश असेल. प्रभावित क्षेत्रावर बर्फ लावल्यास वेदना आणि सूज नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते. शारीरिक उपचार हा प्रभावित सांध्यांच्या हालचाली वाढविण्यासाठी अजून एक पर्याय आहे. बुर्सिटिसचा उपचाराचा विशिष्ट कालावधी नसतो.संदर्भ

 1. University of Rochester Medical Center. Bursitis. Rochester, New York. [internet].
 2. Stanford Health Care [Internet]. Stanford Medicine, Stanford University; What is bursitis?
 3. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Bursitis
 4. National institute of aging. [internet]: US Department of Health and Human Services; Bursitis
 5. Healthdirect Australia. Bursitis. Australian government: Department of Health

बुर्सिटिस साठी औषधे

बुर्सिटिस के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।