myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत

क्राउप काय आहे?

क्राउप हा श्वासोच्छवासाचा आजार आहे जो साधारणपणे सहा महिने ते तीन वर्षांच्या वयोगटातील मुलांना प्रभावित करतो. स्वरयंत्र, श्वासनलिका आणि लघुश्वासनलिका यांना आलेल्या सुजेमुळे वरच्या वायुमार्गाची होणारी ही स्थिती आहे. ही सूज वायुमार्गात अडथळा निर्माण करते आणि अखेरीस खोकला होतो.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

क्राउपच्या लक्षणांमुळे रात्रीच्या वेळी जास्त त्रास होतो. मुल शांत आहे किंवा चिडले आहे यावर अवलंबून ते वेगाने बदलतात.

 • प्रारंभिक लक्षणे:
 • नंतर दिसणारी लक्षणे:
  • आवाजात घोगरेपणा.
  • असह्य खोकला (सील्स बार्क म्हणून ओळखला जातो).
  • श्वास घेताना मोठ्याने आवाज येणे.
  • वेगवान किंवा कष्टमय श्वसन.
 • गंभीर प्रकरणांतील लक्षणे:
  • गोंधळलेली आणि सुस्त वागणूक.
  • आहार घेण्यात आणि पिण्यात समस्या.
  • बोलत असताना अडचण.
  • छातीचा आत जाणे (श्वास घेताना खालच्या छातीच्या भिंत्तीत आतील हालचाली).
  • तोंडाभोवती निळसर रंगाची छटा.

याची मुख्य कारणं काय आहेत?

क्राउपचे सर्वात सामान्य कारण पॅराइनफ्लुएंझा व्हायरसद्वारे होणारा व्हायरल संसर्ग आहे. हे प्रामुख्याने संसर्गग्रस्त व्यक्तीच्या खोकला किंवा शिंका याद्वारे हवेत पसरणाऱ्या सूक्ष्म बिंदूंमुळे प्रसारित होतो.

श्वसनमार्गाच्या संसर्गामुळे एडेमा आणि श्वसनमार्ग आणि लॅरेनजील म्यूकोसा वरच्या भागात जळजळ आणि परिणामी फुफ्फुसांतील हवेचा मार्ग अरुंद होतो. यामुळे श्वास घेण्यात अडचण येते.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

क्राउपचे निदान करण्यासाठी वैद्यकीय इतिहास आणि क्लिनिकल तपासणीची मदत होते.

आपले चिकित्सक तपासणीसाठी चाचणीची शिफारस देखील करू शकतात, ज्यात खालील चाचण्यांच्या समावेश आहे:

 • छाती आणि मानेचा एक्स-रे.
 • संसर्ग तपासण्यासाठी आणि खात्री करण्यासाठी रक्त तपासणी.

उपचार हा रुग्णाचे वय, आरोग्य आणि पूर्वेइतिहासावर अवलंबून असतो.

उपचारांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे:

 • श्वासनातील अडचण दूर करायला हुंगण्यासाठी औषधे.
 • स्टेरॉईड्स (इंजेक्शन किंवा तोंडी).
 • ॲलर्जी किंवा रिफ्लक्ससाठी औषधे.

स्वत:ची काळजी कशी घ्याल:

 • हे आपल्या मुलाला शांत ठेवण्यास मदत करते. अस्वस्थ असल्यास श्वास घ्यायला त्रास होतो.
 • छोट्याछोट्या घोटात मुलाला भरपूर प्रमाणात द्रव द्या.
 • श्वास घेणे सुलभ करण्यासाठी मुलाला सरळ बसवावे किंवा बेडवर उशीच्या साहाय्याने उभे ठेवावे.
 • घरी धुम्रपान करणे टाळा. धुम्रपान क्राउपची लक्षणे वाढवू शकते.
 1. क्राउप साठी औषधे

क्राउप साठी औषधे

क्राउप के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine NamePack SizePrice (Rs.)
FormonideFormonide 20 Mcg/0.5 Mg Respules38
BudamateBudamate 400 Inhaler296
ForacortForacort 100 Rotacap107
BudecortBudecort 200 MCG Inhaler271
Airtec FbAirtec Fb 6 Mcg/100 Mcg Capsule109
BudetrolBudetrol 12 Mcg/200 Mcg Inhaler248
Combihale FbCOMBIHALE FB 100 REDICAPS 30S72
SymbicortSymbicort 4.5 Mcg/160 Mcg Turbuhaler440
Vent EcVent Ec Capsule13
Vent FbVENT FB 100MG EASE CAPSULE 30S0
Budamate ForteBudamate Forte 12 Mcg/400 Mcg Transcaps233
Budetrol ForteBudetrol Forte 12 Mcg/400 Mcg Capsule202
Digihaler FbDigihaler Fb 6 Mcg/200 Mcg Inhaler284
Fomtide NfFomtide Nf 12 Mcg/100 Mcg Inhaler175
FomtideFOMTIDE 400MG DISK TABLET 8S0
Peakhale FbPEAKHALE FB 100MG DPI CAPSULE 30S0
Quikhale FbQuikhale Fb 6 Mcg/200 Mcg Inhaler237
SymbivaSymbiva 100 Mcg Capsule146
IbinideIBINIDE 200 NEXHALER 240MD281
Ibinide RIBINIDE R 0.5MG NEXPULES 2ML320
Budamate Neb RespulesBudamate Neb 1mg Respules 2ml287
BudesalBudesal 0.5 Mg/1.25 Mg Respules26
BudateBudate 0.5 Mg/2 Ml Respules118

तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय? कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा

References

 1. St. Louis Children's Hospital. [Internet]. Washington University, St. Louis, Missouri. Croup
 2. Dustin K. Smith. et.al. Croup: Diagnosis and Management. American Academy of Family Physicians. [Internet]
 3. Candice L. Bjornson. Croup in children. CMAJ. 2013 Oct 15;185(15):1317-23. PMID: 23939212
 4. Batra P. An evidence-based approach to evaluation and management of the febrile child in Indian emergency department. Int J Crit Illn Inj Sci. 2018 Apr-Jun; 8(2): 63–72. PMID: 29963408
 5. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Croup
और पढ़ें ...