myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -

डिस्टोनिया काय आहे?

डिस्टोनिया हे एक सर्वसामान्य नाव आहे जे विविध स्नायूंच्या विकारांना दिले जाते. यामुळे अनैच्छिक स्नायूंच्या हालचालींची पुनरावृत्ती होते आणि आसन मुद्रा ॲबनॉर्मल होते. स्नायूंच्या हालचालींमध्ये एकच स्नायू, त्यांचा समूह किंवा सर्व शरीराच्या स्नायूंचा समावेश असू शकतो. हालचालींची पुनरावृत्ती होते आणि  ती पेटके येणे चमक येणे अशा वेगवेगळ्या प्रकारे असू शकते.

याची मुख्य चिन्हे आणि लक्षणे काय आहेत?

स्नायूंच्या अति हालचाली हे डिस्टोनियाचे मुख्य लक्षण होय. तुमच्या शरीराच्या कोणत्याही भागात आणि कोणत्याही वयात कोणतेही लक्षणे उद्भवू शकतात. या रोगात सामान्यत: स्थिती स्थिर राहते किंवा खराब होऊ शकते, परंतु स्थिती क्वचितच ठीक होऊ शकते. डिस्टोनियाशी संबंधित सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत:

 • पायात पेटके येणे आणि पाय खेचले जाणे.
 • मानेची हालचाल करण्यास त्रास होणे.
 • एक किंवा दोन्ही डोळे मिचकावणे किंवा त्यांची उघडझाप करण्यास त्रास होणे.
 • हाताच्या अनैच्छिक झटपट हालचाली.
 • बोलण्यात आणि चावण्यात अडचण.

या लक्षणांचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे ते सुरुवातीला थोडे सौम्य असून तणाव किंवा थकवा यामुळे लक्षात येतात. पण त्रास जितका वाढतो तितकेच ते वारंवार होऊ लागतात आणि लक्षात येतात. ते अगदी असाधारण स्थितीतही होऊ शकतात.

याची मुख्य कारणं काय आहेत?

डिस्टोनियाच्या क्लिनिकल लक्षणांमुळे कारणे ओळखण्यास मदत होते. एकदा अचूक कारण ओळखले की  उपचार सुचविले जाऊ शकतात. पण, बऱ्याच बाबतीत, अचूक कारण कळत नाही. डिस्टोनियाच्या वाढीला खालील घटक कारणीभूत असू शकतात:

 • अनुवांशिक कारणे: सदोष जीन्समुळे 1-2% प्रकरणात डिस्टोनिया होऊ शकतो.
 • पार्किन्सन्स रोग, सेरेब्रल पाल्सी आणि मल्टीपल स्क्लेरोसिस सारख्या परिस्थिती.
 • ऑक्सिजनची कमतरता.
 • कार्बन मोनोऑक्साइडची विषबाधा.

याचे निदान आणि उपचार कसे केले जातात?

डिस्टोनियाच्या निदानानुसार विचारात घेतलेले जाणारे घटक म्हणजे कौटुंबिक इतिहास, रुग्णांचे वय, शरीराचा भाग आणि डायस्टोनियाशी संबंधित किंवा दुसऱ्या हालचालीच्या विकृतीसह एकत्र येणे. प्रभावित क्षेत्राच्या शारीरिक तपासणीमुळे डिस्टोनिया लक्षात येतो. पण, समान लक्षणे असलेल्या रोगांचे निदान करण्यासाठी आणि इतर रोगांची शक्यता तपासण्यासाठी खालील चाचण्या आवश्यक आहेतः

 • एमआरआय(MRI) वापरुन न्यूरोइमेजिंग.
 • अनुवांशिक चाचणी.
 • न्यूरोफिजियोलॉजिकल चाचण्या जसे नर्व्ह चलन चाचणी आणि सोमाटोसेंसरी संभाव्य विकसित चाचणी.
 • ओप्थाल्मोलॉजिकल परिक्षण.
 • रक्त तपासणी.
 • टिश्यू बायोप्सी.

एकदा डिस्टोनियाचे निदान झाल्याची खात्री झाल्यास, उपचारांचा निर्णय घेतला जाऊ शकतो. डिस्टोनियाच्या  उपचारात खालील गोष्टींचा समावेश होतो:

 • शारीरिक आणि व्यावसायिक उपचार: रुग्णांसाठी सानुकूल व्यायाम उपयुक्त ठरू शकतात.
 • तोंडावाटे औषधे:
  • अँटीकॉलिनर्जिक्स.
  • स्नायू शिथिल करण्यासाठी औषधे.
  • डोपामिनर्जिक्स.
  • गॅबॅरिक्स (गामा-एमिनोब्युट्रीक ॲसिड-एर्गिक्स).
 • बोट्युलिनम न्यूरोटॉक्सिन: बोट्युलिनम टॉक्सिन इंजेक्शनचे परिणाम 3-4 महिन्यांपर्यंत टिकतात, त्यानंतर तुम्हाला पुन्हा ट्रीटमेंटसाठी क्लिनिकमध्ये जाण्याची आवश्यकता भासू शकते.
 • सर्जिकल मदत:
  • न्यूरोमोड्यूलेशन.
  • अवलंबी दृष्टीकोन.
  • गौण शस्त्रक्रिया.
 • शिक्षण आणि कॉऊन्सिलिंग: वरती नमूद केलेले बरेच उपचार पूर्णपणे नाहीत, म्हणूनच स्थितीबद्दल शिक्षण व कॉऊन्सिलिंग उपयुक्त ठरू शकतात.
 1. डिस्टोनिया साठी औषधे

डिस्टोनिया साठी औषधे

डिस्टोनिया के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं। नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं। लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें। बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है।

Medicine Name
Swidril खरीदें
Kufma CR Syrup खरीदें
Becoryl खरीदें
Bjain Lolium temulentum Dilution खरीदें
Schwabe Lolium temulentum CH खरीदें
Tuspel खरीदें
Caladryl खरीदें
Meladryl खरीदें
Coryl Tablet खरीदें
Exil खरीदें
Cofryl खरीदें
Dif खरीदें
Gercodryl खरीदें
Zendryl खरीदें
Aldryl खरीदें
Kuffdryl Syrup खरीदें
Endryl खरीदें

References

 1. H. A. Jinnah. Diagnosis and treatment of dystonia.. Neurol Clin. 2015 Feb; 33(1): 77– 100.doi: [10.1016/j.ncl.2014.09.002]
 2. Victor S C fung et al. Assessment of patients with isolated or combined dystonia: an update on dystonia syndromes.. Mov Disord. 2013 Jun 15; 28(7): 889–898. doi: [10.1002/mds.25549
 3. H.A.Jinnah. The Focal Dystonias: Current Views and Challenges for Future Research. Mov Disord. 2013 Jun 15; 28(7): 926–943. doi: [10.1002/mds.25567]
 4. MedlinePlus Medical Encyclopedia: US National Library of Medicine; Dystonia
 5. National Institutes of Health. [Internet]. U.S. Department of Health & Human Services; Dystonia.
और पढ़ें ...
ऐप पर पढ़ें